18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

बालकलाकार ते नायक..

१९४०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या बऱ्याच धार्मिक चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.

लोकसत्ता टीम | Updated: December 5, 2017 2:01 AM

अभिनेते शशी कपूर यांनी हिंदी रुपेरी पडद्यावर बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. १९४०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या बऱ्याच धार्मिक चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.

१९६१ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘धर्मपुत्र’ चित्रपटाच्या माध्यमातून शशी कपूर यांनी हिंदूी रुपेरी पडद्यावर आपली नायक म्हणून कारकीर्द सुरू केली. १९६० ते १९८०च्या दशकातील ते एक लोकप्रिय अभिनेते होते.

१९८०च्या सुमारास शशी कपूर यांनी स्वत:ची निर्मिती संस्था सुरू केली. ‘जुनून’, ‘कलयुग’, ‘३६ चौरंगी लेन’, ‘विजेता’, ‘उत्सव’ हे त्यांच्याच निर्मिती संस्थेचे चित्रपट. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्याबरोबर त्यांनी ‘अजुबा’ या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहंमद अली जिना यांच्या जीवनावरील ‘जिन्ना’ या चित्रपटात काम केले होते. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

शशी कपूर यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तर १९७९ मध्ये ‘जुनून’ या त्यांच्या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर १९९४ मध्ये ‘मुहाफिज’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले. २०१४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमिताभ कनेक्शन

शशी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत १२ चित्रपटांमध्येच काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘रोटी कपडा और मकान’ हा होता. अमिताभ १४ वर्षांचे असताना शशी कपूर यांची पत्नी जेनिफर यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले होते. यामुळे शशी कपूर हे अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास होते.

First Published on December 5, 2017 2:01 am

Web Title: shashi kapoor life from childhood bollywood star shashi kapoor