News Flash

सेना सनावळी

१९६६, १९ जून - सेनेची स्थापना सभा. १९६६, ३० ऑक्टो. - सेनेची रीतसर स्थापना. १९६७ - कृष्णमेनन यांस विरोध. काँग्रेसला पािठबा. १९६८ - प्रजा समाजवादी पक्षाशी युती. मुंबई

| June 21, 2015 12:10 pm

१९६६, १९ जून – सेनेची स्थापना सभा.
१९६६, ३० ऑक्टो. – सेनेची रीतसर स्थापना.
१९६७ – कृष्णमेनन यांस विरोध. काँग्रेसला पािठबा.
१९६८ – प्रजा समाजवादी पक्षाशी युती. मुंबई पालिका निवडणूक. ४२ जागांवर विजय.
१९६९, ८ फेब्रु. – सीमा प्रश्नावरून मुंबईत तीन दिवस दंगल. बाळासाहेब ठाकरे यांना अटक.
१९७० – कम्युनिस्ट कचेऱ्यांवर हल्ले. कॉ. कृष्णा देसाई यांचा खून.
१९७२ – मुंबई पालिकेत ३९ जागा. विधानसभेत प्रमोद नवलकर विजयी.
१९७३ – सीमाप्रश्नी मुंबई बंद. स्थानीय लोकाधिकार समिती स्थापन. गिरणी कामगार संप अयशस्वी करण्यास हातभार.
१९७४ – रेल्वे कामगार संप अयशस्वी करण्यास हातभार.
१९७५ – गुप्ते-जोशी बंड अयशस्वी. आणीबाणीस पािठबा.
१९७८ – विधानसभेत धुव्वा. मुंबई पालिकेत २१ जागा.
१९८० – संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर मुंबई बंदमध्ये पुढाकार.
१९८३ – प्रॅक्टिकल सोश्ॉलिझमचा पुरस्कार.
१९८४ – िहदुत्वाचा पुरस्कार. मुंबई, भिवंडी दंगल. इंदिरा हत्येनंतर शिखांना संरक्षण.
१९८५ – ‘आता घोडदौड महाराष्ट्रात’ घोषणा. विधानसभेत छगन भुजबळ विजयी. मुंबई पालिकेत ७४ जागा.
१९८६ – सीमाप्रश्नी मुंबई बंद. िहदू महासंघ स्थापनेचा असफल प्रयत्न.
१९८७ – औरंगाबाद पालिकेत ६० पकी २७ जागा.
१९८८ – रिडल्सविरोधी मोर्चा. शिखांना बहिष्काराची धमकी.
१९८९ – लोकसभेत चार जागा.
१९९० – २४ जाने. – दै. सामना सुरू. विधानसभेत ५२ जागा.
१९९१ – १२ आमदार फुटले. अयोध्या आंदोलनास पािठबा. भारत-पाक सामन्यास विरोध. वानखेडे खेळपट्टीची नासधूस.
१९९२ – मुंबई पालिकेत ७२ जागा. जिल्हा परिषद निवडणुकीत अपयश. बाबरी मशीद उद्ध्वस्त. महाराष्ट्रात दंगल.
१९९५ – महाराष्ट्रात सेना-भाजप युतीची सत्ता. मनोहर जोशी मुख्यमंत्री. (१४ मार्च), मीनाताई ठाकरे यांचे निधन (६ सप्टें.)
१९९६ – निवडणूक आयोगाची पक्षांतर्गत निवडणुका घेण्यासंबंधीची नोटीस. बाळासाहेब ठाकरे तहहयात अध्यक्ष. लोकसभेत शिवसेनेचे १५ खासदार.
१९९७ – सेना-भाजप युतीला मुंबई पालिका निवडणुकीत १६९ पकी १०८ जागा.
१९९८ – शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा वाजपेयी मंत्रिमंडळात समावेश.
१९९९ – विधानसभा निवडणुकीत युतीचा पराभव. लोकसभेत सेनेला १५ जागा.
२००१ – सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे निधन.
२००२ – भारतीय कामगार सेनेचे दत्ताजी साळवी यांचे निधन. (११ फेब्रु.), मनोहर जोशी लोकसभाध्यक्षपदी. मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूरमध्ये भगवा.
२००३ – महाबळेश्वर अधिवेशन. कार्यकारी प्रमुख या नव्या पदावर उद्धव ठाकरे यांची निवड.
२००४ – लोकसभा निवडणुकीत युतीला २५ जागा. विधानसभेत युतीला ११६ जागा. आघाडीची सत्ता.
२००५ – नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी. (१४ एप्रिल)
२००५ – राज ठाकरे यांचे बंड.
२००६ – नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन (२७ जुल)
२००७ – मुंबई पालिका निवडणुकीत सेनेला ८३, तर ठाण्यात ४८ जागा. प्रमोद नवलकर यांचे निधन (२० नोव्हें.)
२००९ – लोकसभेत सेनेचे ११ खासदार. विधानसभेत ४४ जागा.
२०१० – आदित्य ठाकरे युवासेना प्रमुखपदी.
२०११ – शिवसेना-आरपीआय (आठवले गट) युती. (२३ जाने.)
२०१२, १७ नोव्हें. – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.
२०१३ – उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड. (२३ जाने.)
२०१४ – लोकसभेसाठी पाच पक्षांची महायुती. लोकसभेत शिवसेनेला लढविलेल्या २० पकी १८ जागांवर विजय. राज्यात महायुतीला ४२ जागा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2015 12:10 pm

Web Title: shiv sena important events
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 शिवसेना आणि ग्रामीण महाराष्ट्र
2 शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ
3 दहावी-बारावीचा ‘निकाल’
Just Now!
X