मोदी सरकार आल्यानंतर मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण अडवाणी हे मार्गदर्शक मंडळाच्या रूपाने अडगळीत पडले आहेत, पण एक काळ असा होता, की  वाजपेयी, मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण अडवाणी या त्रिकुटाशिवाय पक्षाचे पान हलत नव्हते. हे तीनही नेते वेगवेगळय़ा मार्गाने राजकारणात आले. काँग्रेसला पर्याय म्हणून त्यांनी भाजपची बांधणी केली. सुरुवातीला भाजपने लोकसभेत दोन खासदारांपासून सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकारण पुढे नेणारे वाजपेयी व अडवाणी यांची एकेकाळी खूप चर्चा होती. त्या वेळी मुरली मनोहर जोशी यांचे नाव त्या दोघांमध्ये येऊ दिले जात नव्हते. मुरली मनोहर यांना दुर्लक्षित केले जात होते. त्यावर एका वृत्तवाहिनीने अटलबिहारी वाजपेयी यांना असा प्रश्न केला, की मुरली मनोहर जोशींना तुमच्यामध्ये का येऊ देत नाही. त्यावर ते म्हणाले, की दोन नावे असली तरच घोषणा व्यवस्थित देता येतात, त्यामुळे जोशींचे नाव घेतले नाही. ते आमच्या त्रिमूर्तीत आहेतच. त्यावर अँकर म्हणाला, की त्रिमूर्ती बनली आहे तर मग.. त्यावर हसून अटलजी म्हणाले, की त्रिमूर्ती तुम्ही प्रसारमाध्यमांनी बनवली आहे. त्या वेळी एक घोषणा अशी होती, की बीजेपी की तीन धरोहर- अटल, अडवाणी, मुरली मनोहर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात प्रवेश

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayee murli manohar joshi and lk advani
First published on: 17-08-2018 at 02:55 IST