एजाजहुसेन मुजावर
सोलापूर म्हटले, की केवळ दुष्काळ आणि ज्वारी, बाजरीसारखी दुष्काळी पिके डोळय़ांपुढे येतात. याच सोलापुरात आता सफरचंद, निळय़ा रंगाची केळी, काजू, सुपारीच्या बागा अशी अन्य पिकेही येतात. सोलापूरच्या मातीने साधलेल्या या विविधतेत आता पिस्ता शेतीची भर पडली आहे.

एकेकाळी दुष्काळाचा शाप ठरलेल्या आणि अलीकडे काही वर्षांत साखर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात शेतकरी दररोज नवनवीन धाडशी शेतीप्रयोग करीत आहेत. यातून अनेक यशकथांची निर्मिती होत आहे. वाळवंटात पिकणाऱ्या खजुरापासून काश्मिरातील सफरचंद, व्हेनिलासारख्या आईस्क्रिमचा स्वाद देणारी निळय़ा रंगाची केळी, कोकणातील काजू, सुपारीच्या बागा ते पारंपरिक ज्वारीपासून असंख्य प्रक्रियामालापर्यंत शेतीची विविधता सोलापूरच्या मातीने साधली आहे. यातच एका शेतकऱ्याने नवनिर्मितीचा ध्यास घेत सफरचंदाबरोबरच सुक्या मेव्यापैकी महत्त्वाचा घटक असलेल्या चक्क पिस्त्याची शेती यशस्वी केली आहे. यातून मजूर टंचाईवर मात करताना त्यावरील वाढत्या खर्चाला उत्तरही शोधले आहे. स्थानिक आणि आसपासच्या शेतकऱ्यांसाठी ही पिस्ता शेती जणू प्रयोगशाळा ठरली आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful experiment of pistachio farming in solapur amy
First published on: 09-04-2024 at 05:29 IST