करोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस), फुप्फुसातील फायब्रोसिस, हृदय किंवा मूत्रपिंडातील समस्या, रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे, न्यूमोनिया आणि अगदी अशक्तपणा यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांत दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात हे पचनक्रियेसंबंधी त्रास असणाऱ्यांचे आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असून मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे आणि वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतही त्याच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. दीर्घकालीन परिणामांमध्ये पचनसंस्थेसंबंधित विकारही उद्भवू शकतात, असे निदर्शनास आले असून कोविडमधून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना भूक न लागणे किंवा भूक वाढणे, ओटीपोटात वेदना होणे, आंबटपणा, अतिसार आणि उलटय़ा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ  शकते. वेळीच निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच औषधोपचाराने या विकारांवर मात करता येऊ  शकते, अशी माहिती पोटविकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona and digestive disorders zws
First published on: 30-09-2020 at 01:34 IST