ही गोष्ट १९३८ची आहे. स्वातंत्र्यसंग्राम ऐन भरात असलेला हा काळ होता. अटलबिहारी वाजपेयी हा कवीमनाचा स्वप्नाळू तरुण त्यावेळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील राम मंदिराच्या मागे लक्ष्मीगंज भागात राहायचा. मूळचे नागपूरकर असलेले नारायणराव तरटे ग्वाल्हेरमध्ये त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांनी अटल नावाच्या या तरुणाच्या डोळ्यात दिसणारी राष्ट्रभक्तीची ऊर्जा अचूक हेरली व त्याला संघाच्या शाखेत आणले. याच काळात लक्ष्मीगंज भागात संघाची पहिली शाखा सुरू झाली. १९३९ मध्ये अटलजी पहिल्यांदा शाखेत गेले आणि आयुष्यभरासाठी संघाचे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायणरावांबद्दल अटलजींना प्रचंड आदर होता. १९४० मध्ये नागपूरला  रेशीमबागमध्ये संघ शिक्षा वर्ग होता. या वर्गाच्या समारोपाला अटलजी आले होते. संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची प्रकृती त्यावेळी ठीक नव्हती, तरीही त्यांनी समारोपाला भाषण केले आणि त्यावेळेचे भाषण ऐकून अटलजी भारावून गेले. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी १९४१ मध्ये अटलजी संघाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गात नागपुरात सहभागी झाले. ते वर्ष अटलजींचे हायस्कूलमधील शेवटचे वर्ष होते. संघ शिक्षा वर्गासाठी पुन्हा नागपूरला आले होते. ते संपवून ग्वाल्हेरला गेले आणि त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्याच काळात अटलजींवर संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी संघाचे काम सुरू केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram bhakare article about atal bihari vajpayee from his jana sangh days
First published on: 17-08-2018 at 03:12 IST