पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार आल्यानंतर शंभर स्मार्ट शहरे वसवण्याचा संकल्प सोडला होता. vv02आता शहर विकास खात्याने या शंभर स्मार्ट शहरांची यादीही जाहीर केली आहे. या शहरांमध्ये सर्व प्रश्नांवर स्मार्ट उत्तरे असतील ती सुविधांच्या माध्यमातून. स्मार्ट शहर याचा अर्थ जिथे कुठल्याही पायाभूत सुविधेची कमतरता नाही असे स्वच्छ, सुंदर शहर. त्यात शाश्वत विकासाला प्राधान्य असेल व प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील. स्मार्ट शहरासाठी शहरातीलच एक विशिष्ट भाग निवडून त्यात या स्मार्ट सुविधा दिल्या जातील.

पायाभूत सुविधा कोणत्या?
पाणी, वीज  पुरवठय़ाचा तुटवडा नसतो, सांडपाणी व्यवस्थापन, मैलापाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलेले असते. तिथे वाहतुकीचे यांत्रिक नियोजन असल्याने वाहतूक कोंडी वगैरे भानगडी नसतात. माहिती तंत्रज्ञानातील उत्तम सुविधा त्यात दिल्या जातात. वेगवान इंटरनेट तिथे असते. सरकारचा कारभार हा इ- गव्हर्नन्स पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालतो. नागरिकांचा सहभाग, सुरक्षा यांना महत्त्व दिले जाते.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Threats from leaders of India Alliance Allegation of Prime Minister Narendra Modi
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

स्मार्ट उत्तरे
स्मार्ट शहरात हॅलो. हॅलो . ला उडवाउडवीची उत्तरे मिळत नाहीत, तेथील लोकमाहिती व्यवस्था, तक्रार निवारण व्यवस्था चांगली असते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सगळे व्यवहार होतात. नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात ठेवले जाते. कचऱ्यापासून ऊर्जा व इंधन बनवतात. कचऱ्यापासून कंपोस्ट खत करतात. पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाते. स्मार्ट मीटर्स वीज व पाणी पुरवठय़ासाठी असतात. विजेचा कार्यक्षम वापर असतो. पर्यावरण स्नेही इमारतींना महत्त्व असते. वाहतूक नियोजन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते. पार्किंगही स्मार्ट म्हणजे नियोजनबद्ध असते.

पुढे काय करणार?
सरकारने १०० स्मार्ट शहरे विकसित करण्याचे जाहीर केले तरी ती लगेच होणार नाहीत. त्यात ब्लूमबर्ग आव्हान स्पर्धा या नियोजित शहरांसाठी घेतली जाते. सध्या तरी २० शहरे विकसित केली जातील व पुढील दोन वर्षांत चाळीस शहरांचा विकास केला जाईल.

स्मार्ट सिटीज कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना
‘स्मार्ट सिटीज कौन्सिल फॉर इंडिया’ ही संस्था अमेरिकेच्या स्मार्ट सिटीज कौन्सिलची सदस्य राहील. स्मार्ट सिटीचे नियोजक, तज्ज्ञ असे १०० सदस्य व संस्था त्यात असतात. १४० देशात ही संस्था काम करते. प्रत्येक राज्यात एक स्मार्ट शहर विकसित केले जाईल. गुजरातमधील ढोलेरा हे त्यापैकी एक.

करार आवश्यक
स्मार्ट शहरासाठी विशेष कृती आराखडा असतो व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात स्मार्ट शहर विकासासाठी करार केला जातो.

सिटी चॅलेंज स्पर्धा
सरकारने स्मार्ट शहरांची यादी जाहीर केली, की ती शहरे सिटी चॅलेंज स्पर्धेसाठी सिद्ध होतात. त्यात जी निवडली जातील त्यांना केंद्राकडून दरवर्षी १०० कोटी रुपये पाच वर्षे मिळतात.

स्मार्ट शहराची निवड कशी करतात?
स्मार्ट शहराची निवड ही शहर व पालिका भाग बघून केली जाते. त्यात क्षेत्रनिहाय विकास केला जातो. साधारण पाचशे एकर जागा निवडून तिचा फेरविकास केला जातो, त्यात पालिकेचा वॉर्डही असू शकतो, नागरिकांचा सहभाग असतो. (उदा. दिल्लीतील कनॉट प्लेस, मुंबईतील भेंडी बझार) २५० एकरात हरितक्षेत्र असते पण त्यात मोकळ्या जागेचा वापर अभिनव पद्धतीने केला जातो. उदा. बाह्य़ दिल्ली व गुजरातमधील गिफ्ट सिटी. ५० एकर क्षेत्राचा पुनर्विकास केला जातो, त्यात सध्याचा बांधणी केलेला भाग बदलून तिथे नवीन आराखडय़ानुसार त्याची रचना करतात व जमिनीचा मिश्र वापर केला जातो. (उदा. दिल्लीतील किडवई नगर)
(संकलन – राजेंद्र येवलेकर)