पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सरकार आल्यानंतर शंभर स्मार्ट शहरे वसवण्याचा संकल्प सोडला होता. आता शहर विकास खात्याने या शंभर स्मार्ट शहरांची यादीही जाहीर केली आहे. या शहरांमध्ये सर्व प्रश्नांवर स्मार्ट उत्तरे असतील ती सुविधांच्या माध्यमातून. स्मार्ट शहर याचा अर्थ जिथे कुठल्याही पायाभूत सुविधेची कमतरता नाही असे स्वच्छ, सुंदर शहर. त्यात शाश्वत विकासाला प्राधान्य असेल व प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील. स्मार्ट शहरासाठी शहरातीलच एक विशिष्ट भाग निवडून त्यात या स्मार्ट सुविधा दिल्या जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायाभूत सुविधा कोणत्या?
पाणी, वीज  पुरवठय़ाचा तुटवडा नसतो, सांडपाणी व्यवस्थापन, मैलापाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलेले असते. तिथे वाहतुकीचे यांत्रिक नियोजन असल्याने वाहतूक कोंडी वगैरे भानगडी नसतात. माहिती तंत्रज्ञानातील उत्तम सुविधा त्यात दिल्या जातात. वेगवान इंटरनेट तिथे असते. सरकारचा कारभार हा इ- गव्हर्नन्स पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालतो. नागरिकांचा सहभाग, सुरक्षा यांना महत्त्व दिले जाते.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is a smart city
First published on: 04-05-2015 at 12:54 IST