शब्दार्त
चैतन्य प्रेम – response.lokprabha@expressindia.com

तारकमंत्र सांगतो की, स्वामी समर्थ हे अतक्र्य आहेत, अवधूतही आहेत! ‘अवधूत’ हा शब्द दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदायाच्या परंपरेचं स्मरण करून देतो. आता स्वामी समर्थ हे अवधूत आहेत, असं म्हणण्याचा अर्थ त्यांचा बा वेश हा नाथपंथातल्या अवधूताप्रमाणे होता, असं नव्हे, तर त्यांची आंतरिक स्थिती ही अवधूताप्रमाणे होती, हे अभिप्रेत आहे.

Hindutva of Congress and BJP on the occasion of Ram Navami
रामनवमीचे औचित्य साधून हिंदुत्व काँग्रेसचे अन् भाजपचे…
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Baba Ramdev and Acharya Balkrishna in Supreme Court Unreservedly and unconditionally apologized
रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..

भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेल्या ‘अवधूत गीते’च्या आठव्या अध्यायात ‘अवधूत’ या शब्दाची फोड सांगितली आहे. भगवान दत्तात्रेयांनी त्यातून अवधूतांची लक्षणंच विलक्षणरीत्या प्रकट केली आहेत. अवधूत हा शब्द ‘अ’, ‘व’, ‘धू’ आणि ‘त’ या चार अक्षरांच्या संयोगानं बनला आहे, हे वेगळं सांगायला नको. पण यातलं प्रत्येक अक्षर हे अवधूतांच्या आंतरिक स्थितीवर प्रकाश टाकतं.

‘अ’ची उकल करताना दत्तात्रेय म्हणतात :
आशापाशविनिर्मुक्त आदिमध्यान्तनिर्मल:।
आनन्दे वर्तते नित्यम् अकारं तस्य लक्षणम्॥

म्हणजे, जो आशारूपी पाशातून मुक्त आहे, आदि-मध्य आणि अंत या तिन्ही स्थितीत जो निर्मळच आहे आणि जो सदैव आनंदातच मग्न आहे तो अवधूत आहे. आशामुक्त, अनादि अनंत काळ निर्मळ आणि आनंदमग्न; असे तीन ‘अ’कार यात आले. म्हणजेच ‘अमुक व्हावं’ आणि ‘अमुक होऊ नये,’ अशी कोणतीही आशा अवधूताच्या मनात नाही. उलट जे हवं ते घडविण्याची शक्ती योगबळानं स्वतमध्ये असूनही तो सत्याला बाधा येत नाही तोवर शांत, अविचलच राहतो! अमुक व्हावं-अमुक होऊ नये, ही इच्छा मनात कधी येते? जोवर भूतकाळाचं स्मरण आणि भविष्यकाळाची चिंता असते तेव्हाच ना? पण जीवनाचे भूत, वर्तमान आणि भविष्य असे तीन तुकडेच ज्याच्या मनात नाहीत त्याचा आदि-मध्य आणि अंत निर्मळच असणार ना? आता हा आदि मध्य आणि अंत नुसता दैहिक जीवनकार्याचाच नाही, बरं का! स्वामी समर्थाच्या प्रत्येक लीलाप्रसंगाची पाश्र्वभूमीही मधुर आहे, प्रत्यक्ष प्रसंगही मधुर आहे आणि त्या प्रसंगाची फलश्रुतीही मधुर आहे! आणि प्रसंग कसाही असो, स्वामी वरकरणी कितीही उग्र भासोत, पण त्यांच्या मूळ आनंदमय स्थितीत कणमात्रही बदल झालेला नाही. हिरण्यकशपूसाठी झालेला उग्र नरसिंहावतार प्रल्हाद समोर येताच कोमल आणि कृपावंत झाला होता!

मग ‘व’ची फोड करताना दत्तात्रेय म्हणतात :
वासना वर्जतिा येन वक्तव्यं च निरामयम्।
वर्तमानेषु वत्रेत वकारं तस्य लक्षणम्॥

म्हणजे, ज्यानं वासनेचा त्याग केला आहे, ज्याची वाणी आणि व्यक्त होणं विकाररहित आहे आणि जो सदैव वर्तमानातच राहतो, तो अवधूत आहे! अर्थात वासनामुक्त, विकारमुक्त आणि वर्तमान स्थित; असे तीन ‘व’कार अवधूतात आहेत. स्वामींच्या चरित्रात तर याचा प्रत्यय येतोच. नदी सतत फक्त वाहात असते, तसं स्वामींचं लीलाचरित्र प्रवाही आहे.

मग ‘धू’चा मागोवा घेताना दत्तात्रेय सांगतात :
धूलिधूसरगात्राणि धूतचित्तो निरामय।
धारणाध्याननिर्मुक्तो धूकारस्तस्यलक्षणम्॥

म्हणजे, ज्याचा देह वैराग्याच्या धुळीत लोळत आहे, ज्याचं चित्त साधनेनं धुतलं गेलेलं आहे, जो धारणाध्यानाने मायामुक्त झाला आहे तो अवधूत आहे. आता इथं किंचित बदल करायला हवा. स्वामी म्हणजे मूर्तिमंत वैराग्य होतेच, पण ते मूलत अवतारच होते. त्यामुळे साधनेने त्यांचं चित्त धुतलं गेलं, ते मायामुक्त झाले, असं नाही. ते तसेच सहजपणे होते. इथं हा अर्थ घेतला पाहिजे की स्वामी स्मरणाने आपलं चित्त धुतलं जातं आणि मायेचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते.

आता ‘त’काराची उकल करत भगवान दत्तात्रेय सांगतात :
तत्त्वचिन्ताधृता येन चिन्ताचेष्टाविवर्जति।
तमोऽहंकारनिर्मुक्त तकारतस्यलक्षणम्॥

म्हणजे, ज्याच्या अंतकरणात केवळ तत्त्वचिंतनच सुरू असतं आणि त्यामुळे जो सारतत्त्वाचीच निवड करतो, जो चिंतेच्या धडपडीत अडकलेला नाही तमरूपी अहंकारात भरकटलेला नाही, तो अवधूत आहे! स्वामींच्या चरित्रातील अखंड अंतर्मुखता, निश्चतता आणि निरहंकारिता पाहता ही उकल समजणं सोपंच जातं.

‘एकनाथी भागवता’त संत एकनाथ महाराजांनीही यदु आणि अवधूत संवादात अवधूतांची काही लक्षणं सांगितली आहेत आणि ती स्वामी समर्थाच्या अवताराशी तसंच अवतारकार्याशी सुसंगत अशीच आहेत. यदु वनात गेला असताना त्याने या अवधूताला येताना पाहिलं. तो कसा येत होता? एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘कोणी एक अवधूतु। निजतेजे प्रकाशवंतु। ब्रह्मानंदे डुल्लतु। यदूनें येतु देखिला॥’’ हा अवधूत स्वयंप्रकाशमान होता आणि ब्रह्मानंदात डुलत होता. तसाच तो ‘‘निर्भय निशंक वर्ततु,’’ देखील होताच! स्वामी समर्थानी जे दीर्घ भारतभ्रमण केलं तेव्हा त्यांची स्वारी अगदी नाथांनी वर्णन केल्याप्रमाणे स्वयंतेजाने तळपणारी आणि ब्रह्मानंदात निमग्न तसंच निर्भय आणि नि:शंक दिसत असली पाहिजे! मग, ‘‘नवल तयाचें पाहणें। दृश्य दृश्यत्वें देखों नेणे। झाला सर्वागें देखणें। देखणेंपणें पाहातसे॥’’ त्याचं पाहणं, त्याची दृष्टी मोठी नवलाईची होती, विलक्षण होती. जणू सदैव अंतर्दृष्टीनंच तो जगाकडे पाहात होता. इथं स्वामी समर्थाच्या आरपार न्याहाळत असतानाही निíलप्त असलेल्या दृष्टीचं स्मरण घडल्यावाचून राहात नाही.

त्या अवधूताने अंगाला त्यानं राख फासली होती. ती कसली होती? तर, ‘‘संकल्प-विकल्परहित। शुद्ध सर्वागी विभूत। यालागीं बोलिजे ‘अवधूत’।’’ संकल्प-विकल्प म्हणजे अमुक व्हावं किंवा अमुक होऊ नये या इच्छाच त्याने जाळून भस्मसात केल्या होत्या. जे घडत आहे त्याकडे तो केवळ हसतमुखाने पाहात होता. समर्थ अक्कलकोटी होते तेव्हा त्यांच्याभोवती जमलेल्यांचे मनातले भाव कधी कधी आसक्तीने बरबटून जात. समर्थाना लोकांनी अर्पण केलेल्या चीजवस्तू आपल्या कब्जात ठेवणाऱ्या आणि नंतर ते उघडकीस येताच इतर भक्तांनी हाकलून दिलेल्या सुंदराबाईची कथा आठवते ना? ती सर्वप्रथम आश्रयाला आली तेव्हाही समर्थ हसले होते, कल्पवृक्षाखाली बसूनही एखाद्याने पूर्ण कल्याणाची इच्छा न धरता, आज भीक मागायला जाईन तेव्हा चांगली भीक मिळू दे, अशी इच्छा धरावी; त्याप्रमाणे स्वामीचरणी येऊनही तिचा भौतिकाचा मोह सुटत नव्हता, तेव्हाही समर्थ नुसते हसले होते. अखेरीस भक्तांनी तिला धक्के मारून हाकलले तेव्हा ती स्वामींची करुणा भाकत असतानाही ते हसत होते! तळपत्या उन्हात झाडाखाली आलं की सावली आपोआप मिळते. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. त्या कृपाछायेचं मोल माणसाला उमगत नाही आणि आत्मसत्तेचं चक्रवíत पद गमावून तो स्वतच रणरणत्या संसारतापाचाच धनी होतो, या वेदनेतून उमटलेलं ते हसू होतं!

पण जे खरा शुद्ध भाव मनात ठेवून जवळ आले त्यांना स्वामींनी परमलाभच दिला. त्यांचा अहं पूर्ण पष्ट करून त्यांना ‘आपल्यासारिखे’ केलं होतं. ‘एकनाथी भागवता’तील अवधूत वर्णनातही नाथ महाराज म्हणतात की, भवतालच्या जनांच्या मनातला जगमोहाचा प्रपंचही त्याने धुवून टाकला होता, म्हणून तो अवधूत होता! (सभोंवता समस्तु। प्रपंच निजबोधें असे धूतु। यालागीं बोलिजे ‘अवधूत’।). त्यानं समस्त ‘अहं’ धुऊन टाकला होता (अहं धुई तो ‘अवधूतु’).

नाथांनी सांगितलेलं आणखी एक महत्त्वाचं लक्षण असं की, तो अवधूत अनंत वष्रे जगत असूनही वयानुसारच्या वार्धक्यानं त्याच्या देहाला स्पर्शही केला नव्हता! (वार्धक्य यावें देहासी। तंव देहपण नाहीं देहापासीं। रिगमु नव्हेच जरेसी। तारुण्यासी तें मूळ॥). निजज्ञानाच्या सत्तेने त्याने द्वैतमय जगाला जिंकलं होतं आणि तो असा निशंक विचरण करीत होता की जणू साकार निर्भयताच! (निजबोधाचिया सत्ता। द्वैत जिंतिलें तत्त्वतां। ऐसा निशंकु विचरतां। भय सर्वथा त्या नाहीं॥). समर्थाचं आयुर्मान ५०० ते ७०० वर्षांचं सांगितलं जातं. अक्कलकोटमधील अवतारकार्य दोन दशकांचं आहे. ते वयानं वृद्ध होते, पण तरीही त्यांचं रूप नित्यनूतनच होतं. अतुलनीय ऊर्जेचा ते स्रोतच होते. त्यांच्या दृष्टीत, हालचालीत आणि नुसत्या स्वस्थ बसण्यातही मोठी शक्ती, निर्भयता सहजतेनं विलसत असे.

मग यदुने जी अवधूताची स्तुती केली आहे, त्या स्तुतीतूनही अवधूत लक्षणं प्रस्फुटित होतात. यदु म्हणतो, हे स्वामी तुमच्या ठायी अपूर्व बुद्धी आहे! (अपूर्व बुद्धि हे स्वामी। तुमचे ठायीं देखों आम्ही।). पुढे यदु म्हणतो की, ‘‘दिसतोसी सर्वार्थी कुशळ। परी कांहीं न करूनि निश्चळ। अकर्तात्मबोधें तूं केवळ। जैसें बाळ अहेतुक॥ तूं बालाऐसा वर्तसी। परी बालबुद्धि नाहीं तुजपासीं। सर्वज्ञ सर्वथा होसी। ऐसें आम्हांसी दिसतसे॥’’ म्हणजे, आपण सर्व कर्मामध्ये कुशल दिसता, परंतु तरीही वरकरणी काहीही न करता निश्चळ असता! आत्मज्ञानाने अकर्तात्मबोध अंगी कसा बाणतो, हे प्रत्यक्ष आचरणातून दाखवता. अहेतुक बालकाप्रमाणे आपली स्थिती आहे. आपण बालकाप्रमाणे वागता, पण बालबुद्धी मात्र आपल्यापाशी नाही. आपण सर्वथा सर्वज्ञच आहात! समर्थही कधी बालवत् वर्तन करीत, पण त्यांची सर्वज्ञता कोणत्याही क्षणी लोपत नसे.

पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांची, अवधूत महिमा गाणारी अनेक पदंही प्रसिद्ध आहेत. पण त्यांचं एक पद जणू स्वामी समर्थाच्या आंतरिक सहजस्थितीचं स्मरण करून देतं. यात पंतमहाराज म्हणतात :

झालों फकीर नाहीं फिकीर॥
निरंजनवासी ॥ ध्रु.॥
आलों नाहीं गेलों नाहीं॥
सदा सर्ववासी ॥१॥
सगुण निर्गुण स्वरूप माझें॥
रमतों प्रेमरसीं ॥२॥
दत्तावधूत नेति नेति॥ निगमागमासी ॥३॥

फिकीर नसलेली फकिरी, नित्य बोध प्रकट करून अंजन घालणारं आचरण, सदासर्वदा सर्वत्र चतन्यमय अस्तित्व, साकार आणि निराकार स्वरूप असूनही भक्तप्रेमरसात रम्यमान असे दत्तावधूत अक्कलकोटी नांदत आहेतच! ज्याने ज्याने आपल्या संकुचित अकलेचा कोट म्हणजे संकुचित धारणेचा किल्ला बांधला आहे तो तोडत आहेत!!