16 November 2019

News Flash

आहारशास्त्रातील करिअर

माणसाचं स्वास्थ्य त्याच्या आहारावर आणि जीवन शैलीवर अवलंबून असतं.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराच्या आरोग्यदायी सवयींकडे दुर्लक्ष होऊन अनेक आजार उद्भवत असल्याने आहारतज्ज्ञ म्हणून काम करायला भरपूर वाव आहे.

पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराच्या आरोग्यदायी सवयींकडे दुर्लक्ष होऊन अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे आहारतज्ज्ञ म्हणून काम करायला भरपूर वाव आहे.

आहार आणि पोषणशास्त्र या विषयात सध्या क्रिकेटसारखं वातावरण आहे. मॅच सुरू असते तेव्हा एखाद्या खेळाडूने कसं खेळायला हवं यावर प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं. पण गम्मत अशी आहे की मदानात खेळण्याचं कौशल्य हे त्या निवडक प्रशिक्षित खेळाडूंकडे असतं. तसंच वेगवेगळ्या समाजमाध्यमांमधून निरनिराळ्या आहारशैलींचा होणारा भडिमार, गुगलने उपलब्ध करून दिलेलं माहितीचं मायाजाल यांतून विविध गोष्टींची माहिती कळते खरी, पण एखाद्या व्यक्तीसाठी, तिच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तिला योग्य आहाराचा सल्ला देणं हे प्रशिक्षित आहारतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञ यांचं काम असतं.

माणसाचं स्वास्थ्य त्याच्या आहारावर आणि जीवन शैलीवर अवलंबून असतं. याच विषयांवर केंद्रित असणारं एक क्षेत्र म्हणजे आहार आणि पोषणशास्त्र. एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर येणं हा कमी ऊर्जेचं अन्न खाल्ल्याचा किंवा आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचा परिणाम असू शकतो. धकाधकीच्या जीवनात आजार उद्भविण्याआधी केवळ खाण्याच्या सवयींमध्ये अनुकूल बदल करून स्वास्थ्य सुधारू शकते. मधुमेह, रक्तदाब यांसारखे विकार चाहूल लागण्याआधी योग्य आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने रोखता येऊ शकतात.

वेगवगेळ्या हवामानात, ऋतुमानात उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थाबद्दलची योग्य माहिती आणि त्या माहितीचे तुमच्या आहारातील महत्त्व समजवून देण्याचे काम आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ करतात. पूर्वापार चालत आलेली खाद्यसंस्कृती आणि तिचं होत असलेलं पाश्चात्त्यीकरण यातून प्रत्यक्ष व्यक्तीचा आहार समजून घेणं आणि योग्य मार्गदर्शन करून पूरक आहाराची रचना करणं यांत आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात.

क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंच्या फिटनेसचं रहस्य त्यांच्या आहारावर अवलंबून असतं. आणि त्याचं श्रेय त्यांच्या आहारतज्ज्ञांना जातं. स्पध्रेचा वेळ, स्वरूप, उपलब्ध खाद्यपदार्थ यांची योग्य सांगड घालून स्पध्रेच्या तयारीपासून ते स्पध्रेच्या दिवसापर्यंत एक मोठा प्रशिक्षित समूह एखाद्या खेळाडूच्या स्वास्थ्यासाठी झटत असतो त्यात आहारतज्ज्ञांचे योगदान मोठे आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच खाद्यसंस्कृती! याचा समन्वय साधण्याचं आणि पूरक आहाराद्वारे निरोगी जीवन जगण्याचं गमक प्रशिक्षित आहारतज्ज्ञांना किंवा पोषणतज्ज्ञांना उत्तम जमतं. दुर्दैवाने आज वजन कमी करून दाखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आहारतज्ज्ञ म्हटलं जातं. प्रभावशाली आणि प्रशिक्षित या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे.

ल्ल    आहारतज्ज्ञाची व्यावसायिक पात्रता :

’ १२ वीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण

’ १२ वीनंतर खालील विषयात तीन वष्रे पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम

’ अन्न : विज्ञान (फूड सायन्स)

’ अन्न आणि पोषण विज्ञान

(फूड अ‍ॅण्ड न्यूट्रिशन सायन्स )

किंवा खालील विषयातील पूर्ण वेळ पदवीनंतर

’ दीड किंवा दोन वर्षांचा पूर्ण वेळ पदविका

’ किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम :

’ प्राणिविज्ञान (झुऑलॉजि )

’ सूक्ष्मजैवतंत्रज्ञान (मायक्रोबायॉलॉजि)

’ औषधशास्त्र (मेडिसिन)

’ होम सायन्स

पदव्युत्तर पदवी :

’ एमएसस्सी : आहारशास्त्र

’ एमएस्सी : क्रीडापोषण शास्त्र

’ एमएस्सी : पब्लिक न्यूट्रिशन

इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी :

’ डिप्लोमा इन स्पोर्ट्स न्यूट्रिशन

(दोन वर्ष दूरस्थ शिक्षण)

यात ठरावीक ग्रेड मिळविल्यास  पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) प्रदान केली जाते.

यासाठी पदव्युत्तर इंग्रजी प्रथम भाषा नसल्यास भाषेची परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. (TOEFL, IELTS इत्यादी) पोषणतज्ज्ञांसाठी ही पदविका किंवा यानंतर मिळणारी पदव्युत्तर पदवी जगात सर्वोत्तम शिक्षण मानली जाते.

आजकाल विविध छोटेखानी संस्थांमध्ये आहारविषयक मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन म्हणजे माहितीचा एक स्रोत आहे. सर्टििफकेट कोर्स म्हणजे मान्यताप्राप्त आहारतज्ज्ञ/ पोषणतज्ज्ञ म्हणून काम करण्याचा परवाना नव्हे.

या क्षेत्रातील व्यावसायिक संधी :

ल्ल    क्लिनिकल न्यूट्रिशियन :

( नोंदणीकृत आहारतज्ज्ञ म्हणून नावनोंदणीसाठी इंडियन डाएटेटिक असोसिएशनद्वारे प्रत्येक वर्षी एक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षाप्रक्रिया अद्याप शासकीय अखत्यारीत नाही. त्यासाठी आयडीए (IDA) द्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत.)

’ इस्पितळात आहारतज्ज्ञ /पोषणतज्ज्ञ

’ किचन डाएटिशिअन

’ वैद्यकीय क्लिनिकमध्ये आहारतज्ज्ञ

’ रेल्वे / सरकारी खात्यातील आहारतज्ज्ञ

’ मधुमेह सल्लागार (डायबिटीस एज्युकेटर )

ल्ल    क्रीडा पोषणतज्ज्ञ :

’ विविध खेळांसाठी आहारतज्ज्ञ म्हणून संधी उपलब्ध असतात (कबड्डी लीग, बॅडिमटन लीग, क्रिकेट लीग)

’ क्रीडा केंद्रे (बॉिक्सग, जलतरण, ऐरोबिक्स, मल्लखांब इत्यादी खेळांतील खळाडूंसाठी क्रीडा पोषण तज्ज्ञ काम करतात)

’ तसेच भारतीय सेनेमध्येदेखील क्रीडा पोषणतज्ज्ञांची आवश्यकता आहे

’ व्यायामशाळा / जिम्स / योग केंद्रे

ल्ल    फूड ऑडिटर

वर लिहिल्याप्रमाणे पदव्युत्तर शिक्षणांनंतर एफएसएसएआय (FSSAI) चा फूड ऑडिटरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास संबंधित व्यक्ती अन्न आणि खाद्यविज्ञान संस्थेमध्ये ऑडिटर म्हणून काम करू शकते यासाठी एफएसएसएआयची परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करून फूड ऑडिटरचा परवाना असणे आवश्यक आहे.

ल्ल    ब्लॉगर :

अन्न ही माणसाची केवळ गरज नाही तर संस्कृतीचा भाग आहे. केवळ खाद्यसौंदर्य, चव आणि खाद्यसंस्कृतीत वैविध्याबद्दल प्रचलित असणाऱ्या या क्षेत्राला अनेक आहारतज्ज्ञ वेगळे आयाम देत आहेत. शब्दांवर प्रभुत्व असलेला प्रशिक्षित आहारतज्ज्ञ एक उत्तम ब्लॉगर होऊ शकतो. आजकाल फूड ब्लॉगरची वाढती संख्या पाहता आहारतज्ज्ञांसाठी हे नक्कीच उत्तम क्षेत्र आहे. असे ब्लॉग आवडीने वाचलेही जातात.

कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी :

’      कॉर्पोरेट्समधील कर्मचाऱ्यांसाठी आहारतज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी

कॉर्पोरेट्समध्ये असणारं कामाचं स्वरूप, ताण पाहता त्यांच्यासाठी पूरक आहार कसा असावा याबद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत.

मोबाइल अ‍ॅप्स आणि आर्टििफशिअल इंटेलिजन्स :

’      आहारतज्ज्ञांसाठी एखादे अ‍ॅप तयार करताना उत्तम करिअर संधी उपलब्ध आहेत.  रोबोटिक माहितीमध्ये मानवी मेंदूच्या वापरासाठी म्हणून आहारतज्ज्ञांना मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील संधी :

’      हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या मेनूसाठी अनेकदा आहारतज्ज्ञांना बोलावले जाते.

संशोधन क्षेत्रातील संधी:

’ संशोधन करण्यात रस आहे त्यांना या क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीनंतर अनेक रोजगार  पर्याय उपलब्ध आहेत.

पीएचडी नंतरच्यासंधी :

’ संशोधन, प्राध्यापक

’ औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये संशोधक

’ खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये संशोधक

 

’ अर्थार्जन :

प्रत्येक क्षेत्रात अर्थार्जन महत्त्वाचे आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लेखात दिल्यापकी ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्यावर आहारतज्ज्ञांचा रोजगार अवलंबून आहे. सध्या आहारतज्ज्ञांचे मासिक उत्पन्न किमान २० ते ५० हजार रुपयांदरम्यान आहे. स्वतंत्रपणे काम करणारे आहारतज्ज्ञ महिना एक लाखांपर्यंत अर्थार्जन करू शकतात. एक उत्तम आहारतज्ज्ञ योग्य शिक्षण घेऊन, नवनवीन संशोधनाबाबत सतत सजग राहून स्वत:ला प्रस्थापित करू शकतो.

क्रीडा पोषणतज्ज्ञांसाठी परदेशातदेखील उत्तम करिअर संधी उपलब्ध आहेत.

भारतात न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन या दोन समांतर गोष्टी आहेत. महत्त्वाचा फरक आहे तो ‘आहारशास्त्र’ विषयातील अभ्यास आणि प्रशिक्षणाचा. यासाठी कालावधी खालीलप्रमाणे :

’      आहारतज्ज्ञ(डाएटिशिअन) :

५ वष्रे पूर्ण वेळ

’      पोषणतज्ज्ञ (न्यूट्रिशनिस्ट) : १.५ ते ४ वष्रे पूर्ण वेळ/ त्याहून अधिक कालावधी मात्र दूरस्थ शिक्षण संस्थांमधून शिक्षण.

First Published on June 7, 2019 1:04 am

Web Title: career in food science food technology