पर्यटन विशेष
आज जगभरात आलिशान क्रूझ जहाजावरून समुद्र पर्यटन हा सर्वात लोकप्रिय प्रकार ठरला आहे. भारतातही समुद्र पर्यटनाचा हा नवा ट्रेण्ड रुजावा यासाठी प्रयत्न व्हायला सुरुवात झाली आहे.

मुंबईचा पूर्वेकडचा किनारा अखेर मोकळा होतोय जलसफरींसाठी. देशांतर्गत सफर करणारी पहिली क्रूझ येत्या महिनाअखेरीस मुंबईतून प्रवाशांना घेऊन कोचीनला रवाना होईल. साडेसात हजार किलोमीटरचा अथांग समुद्रकिनारा आणि अनेक पाचूची बेटे असलेल्या भारताला उशिराने का होईना परंतु समुद्र पर्यटनाच्या संधीचे गमक ध्यानात आलेले दिसून येते. मुंबईतील बॅलार्ड इस्टेटस्थित आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल या प्रवासातील महत्त्वाचा मलाचा दगड ठरेल.

चहुबाजूंनी तापलेला निळाशार समुद्र, उफाळणाऱ्या लाटा आणि थमान वाऱ्याचा गुंजारव याला वैश्विक पर्यटनाच्या पटलावर महत्त्वाचे स्थान आहे. समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांच्या मनात कायम स्वप्न दडलेले असते. समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरण स्वत:ची श्रीमंती नौका घेऊन सफरीला जाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षी मनीषा असतेच. क्रूझ जहाजे अशी मनीषा असणाऱ्यांची स्वप्नपूर्तीच करतात. किंबहुना आज जगभरात आलिशान क्रूझ जहाजावरून समुद्र पर्यटन हा सर्वात लोकप्रिय प्रकार बनला आहे. तुलनेने महागडय़ा असलेल्या या सफरीत भारतीय अभावानेच दिसत असले तरी हळूहळू हे चित्रही बदलत आहे. देशांतर्गत समुद्र पर्यटनाच्या अधिकाधिक संधी आणि सुविधा विकसित करण्याचे सरकारचे धोरण तरी तसेच सूचित करीत आहे.

समुद्रातील अलौकिकता समजून येते, त्यांना समुद्र तटांचे नंदनवन लुभावणारे निश्चित ठरते. क्रूझ पर्यटन हा सफरीचा तीन ते १० दिवसांचा ऐषारामी कार्यक्रमच असतो. शिवाय, महाकाय क्रूझ जहाज म्हणजे अचाट अभियांत्रिकी साहसाचा नमुनाच असतो. अनेकानेक आरामदायी सोयी असलेले आणि बहुमजली (अनेक डेक) असलेले ते जहाजावर उभे केलेले तारांकित रिसॉर्टच असते. ते पर्यटकांना जलसफरीबरोबरच, खानपान, खेळ, मनोरंजन, ऐषाराम, बाजारहाट असा रिझविणारा सारा ऐवज पेश करीत असते. विलासी, सुखासीन, आरामदायी पर्यटनासाठी युरोप-ऑस्ट्रेलियाला जाण्याइतक्याच किंवा त्यापेक्षा कमी खर्चात क्रूझ पर्यटन शक्य असल्याचे हळूहळू अनेकांच्या ध्यानात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसह आता भारतीयही समुद्री-पर्यटनाचा लाभ घेऊ शकतील. या धर्तीचे पहिले राष्ट्रीय क्रूझ धोरण आकाराला आले आहे. जहाज मंत्रालयाचा कारभार हाती असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील पाच वर्षांत भारतात क्रूझ पर्यटकांची संख्या सध्याच्या  एक लाख ८० हजारांवरून ४० लाखांवर, तर त्यातून महसुली उत्पन्न हे सध्याच्या ७०० कोटींवरून ३५ हजार कोटींवर जाणे अपेक्षित असल्याचे अलीकडेच म्हटले आहे. देशांतर्गत पर्यटनवाढीचा दर वार्षिक १३ टक्क्यांच्या घरात असताना, क्रूझ पर्यटनात वाढ १०० टक्क्यांहून अधिक अपेक्षिली जावी, हे बरेच काही सांगून जाणारे आहे.

भारताच्या पर्यटनक्षेत्रासाठी नवचतन्य ठरलेले आणि नव्या पर्यटन अर्थव्यवस्थेची नांदी बनलेले हे क्रूझ पर्यटन नेमके असते तरी काय? उत्तर अमेरिकेनंतर, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या हाँगकाँगच्या समुद्र पर्यटन बाजारपेठेला, तेथील सुविधांना त्यासाठी समजून घेतले पाहिजे. आता कुठेशी साधारण पावणेदोन लाखांच्या घरात भारतीयांनी क्रूझ पर्यटन केले असेल, तर चीन-हाँगकाँगमध्ये २४ लाखांच्या घरात लोकांनी २०१६ सालात क्रूझवारी केल्याचे दिसून येते.

मुंबई बंदरातून समुद्र पर्यटनाच्या शक्यतांना चालना देण्यासाठी विशेष आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या स्थापनेची आणि त्यासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा नितीन गडकरी यांनी गेन्टिंग ड्रीम क्रूझच्या साक्षीने केली होती. हाँगकाँगच्या ड्रीम क्रूझेस या समुद्र पर्यटन क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठय़ा कंपनीचे हे जहाज जर्मनीवरून रवाना होत असताना त्याने त्या वेळी मुंबईत थांबा घेतला होता. जर्मनीपासून जिब्राल्टरची सामुद्रधुनी, भूमध्य सागर, सुएझ कालवा पार करीत हे जहाज मुंबईत २९ ऑक्टोबर २०१६ रोजी दाखल झाले. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविल्यानंतरच गेन्टिंग ड्रीम क्रूझ हाँगकाँगच्या दिशेने रवाना झाले. पत्रकारांशी बोलताना, गडकरी यांनी भविष्यातील नियोजन मांडले. सध्या असलेल्या ७० जहाजांची संख्या पुढील काही वर्षांत दसपटीने वाढून ७०० वर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मुंबईसह गोवा, मंगळुरू, चेन्नई, कोचीन येथील बंदरांच्या सुविधादेखील या दृष्टीने वाढविण्यात येत आहेत.

जागतिक पाच महत्त्वाच्या समुद्री पर्यटन स्थळांपकी एक आणि ‘गेट वे ऑफ क्रूझ टूरिझम’ अशी मुंबईची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने आणखी बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. तथापि या निमित्ताने राज्य शासनाकडून राज्यातील बंदरांचा विकास करण्याचे काम हाती घेतले जात असेल तर त्याचे स्वागतच. पर्यटनासह तुलनेने सर्वात स्वस्त आणि पर्यावरणस्नेही अशा जलप्रवासी वाहतुकीच्या सुविधाही मग आपोआपच विकसित होतील.

गेिन्टग ड्रीम सारे काही स्वप्नवतच!

‘ड्रीम क्रुझेस’ ही समुद्रपर्यटन क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी हाँगकाँगस्थित कंपनी आहे. भारतात कार्यरत स्टार क्रूझेसची ही पालक कंपनी होय. आशियातील सर्वात मोठे आणि ऐसपस असे गेिन्टग ड्रीम हे आलिशान जहाज याच कंपनीच्या मालकीचे आहे. जहाजावरील वेगवेगळ्या श्रेणींच्या जवळपास १७०० खोल्यांमध्ये सामावून घेऊ शकतील अशा ३४०० (कमाल क्षमता) पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी एकूण २,०१६ इतका कर्मचारी वर्ग हे या ‘गेिन्टग ड्रीम’चे वैशिष्टय़ आहे. अगदी सप्ततारांकित हॉटेलांमध्येही प्रत्येक तीन अतिथींमागे दोन कर्मचारी असे सरस म्हणता येईल असे अतिथी-कर्मचारी प्रमाण नसते, ते येथे आहे. पाच रात्र – सहा दिवस आणि सप्ताहाअखेरीचे दोन रात्र – तीन दिवस अशी छोटेखानी सफरीचे दोन पर्याय येथे पर्यटकांना उपलब्ध आहेत. समुद्रमाग्रे आंतराराष्ट्रीय सीमा ओलांडत जहाजाची सफर होत असल्याने विमान प्रवासाआधी करावे लागणारे चेक इन, सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन असे सर्व सोपस्कार जहाजावर प्रवेशाच्या वेळीही करावे लागतात. तथापि जहाजावरील वेगवेगळ्या सोयीसुविधांचा व्याप इतका प्रचंड आहे की, रात्रीचा दिवस केला तरी सफरीचा हा कालावधी पुरा पडत नाही. मनोरंजनासाठी एक हजार आसनी भले मोठे प्रेक्षकगृह, साहसी खेळ, स्वििमग पूल, जाकुझ्झी, वॉटर स्लाइड्स, बोिलग अ‍ॅलीज्, मिनी गोल्फ क्लब, अत्याधुनिक जिम्नॅशियम, क्लब्स, लाइव्ह बॅण्ड, बठय़ा खेळाचे अनेक प्रकार, कॅसिनो आणि उंची-अभिजात ब्रॅण्ड्सच्या शॉिपगची एक ना अनेक दालने असे सारे सामावून घेणाऱ्या या जहाजाने समुद्रपटलावर एक न्यारी दुनियाच वसविली आहे. शिवाय बाहेरच्या जगाशी संपर्कासाठी जहाजावर वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट जोडणी आहेच. येथील वास्तवाच्या काळात दिवसभराच्या घडामोडी आणि कार्यक्रमांचे एक स्वतंत्र वार्तापत्रही अतिथींपर्यंत प्रत्येक पहाटे पोहोचते.

अर्थवृद्धीचा महत्त्वाचा स्रोत

 

भारताला लाभलेल्या किनारपट्टीमुळे क्रूझ पर्यटन विकसित होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. यासाठी गृहबंदर (होम पोर्ट) म्हणून मुंबईची निवड करण्यात आली आहे. तशी तयारी म्हणून मुंबईचा सध्या नौदल आणि गोदीने व्यापलेला ११ किलोमीटर लांबीचा पूर्व किनारा विकसित आणि मुख्य म्हणजे खुला केला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केल्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे लगेज ट्रॉलीज, इमिग्रेशन काऊंटर्स, डय़ुटी फ्री शॉप्स, एक ना अनेक खानपानगृहे अशा एरवी विमानतळांवर दिसणाऱ्या गोष्टींची येथे लवकरच रेलचेल दिसून येईल. या माध्यमातून परकीय चलन मिळेल, तसेच रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. क्रूझ पर्यटनाबद्दल निर्माण होणारे आकर्षण लक्षात घेऊन इटली येथील ‘कोस्टा क्रूझ’ने मुंबई ते मालदीव या मार्गावर ‘कोस्टा निओक्लासिका’ ही क्रूझ सेवा देण्याचा निर्णय घेतला असून, नोव्हेंबर सन २०१७ पासून या प्रवासाला सुरुवात झाली आहे. नजीकच्या काळात मुंबई-गोवा अशा क्रूझद्वारे दैनंदिन फेऱ्याही येथून सुरू होणार आहेत. कोस्टाचे जहाज हे १७०० प्रवासी क्षमता असलेले असून ८५८ केबिनचा त्यात समावेश असेल. आतापर्यंत क्रूझ पर्यटन वाढतच गेले आहे आणि आíथक वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक झाले आहे.
सचिन रोहेकर – response.lokprabha@expressindia.com