फोर जीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विविध कंपन्या एकापेक्षा एक आधुनिक स्मार्टफोन बाजारात आणताना दिसत आहेत. याचंच ताजं उदाहरण म्हणजे एलजीचे आगामी फोर जी हँडसेट. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने एलजी स्पिरिट एलटीई आणि एलजी जीफोर स्टायलस हे फोर जी हँडसेट भारतात आणण्याचे जाहीर केले. या फोर जी हँडसेटमध्ये व्हीओएलटीई (VoLTE) म्हणजे ‘व्हॉइस ओव्हर लाँग टर्म इव्होल्युएशन’ आणि व्हीओवाय-फाय (VoWi-Fi) म्हणजे ‘व्हॉइस ओव्हर वाय-फाय’ ही वैशिष्टय़ं आहेत. या वैशिष्टय़ांमुळे इंटरनेटच्या साहाय्याने हायस्पीड संभाषण होऊ शकतं. देशभरातील विविध ब्रॅण्डेड दुकानांमध्ये हे हँडसेट उपलब्ध असतील.

व्हीओएलटीई ही सुविधा आयपी मल्टीमीडिया सबसिस्टीम नेटवर्कवर आधारित असून त्यातून ग्राहकांना व्हॉइस सव्‍‌र्हिसची सेवा उपलब्ध होणार आहे.

व्हीओएलटीईमुळे आवाज आणि इंटरनेटची क्षमता थ्रीजी नेटवर्कच्या तिप्पट तर टूजी जीएसएमच्या सहापट वाढते. वाय-फाय आणि मोबाइल कंपनीची इंटरनेट सुविधा या दोहोंमधील बदलाची आंतरसक्रियता/पारस्परिकता व्हीओवाय-फायमुळे शक्य होते हे या हँडसेटचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. घरामध्ये मोबाइल इंटरनेटची रेंज फारशी मिळत नाही अशा ग्राहकांसाठी व्हीओवाय-फाय हा घटक नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com