हिरवे हिरवे गार गालिचे,

हरित तृणांच्या मखमलीचे..

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

कोकण म्हटलं की हे हिरवे गालिचे डोळ्यांचे पारणे फेडतात. कोकणावर पर्जन्यराजाची कृपा आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिन्यापासून भरपूर पाऊस पडतो आणि श्रावण महिन्यापर्यंत सगळीकडे हिरवाईचा साज चढतो. त्या हिरवळीवर छान छान रंगीबेरंगी फुलं डोलायला लागतात आणि श्रावणातल्या ऊन-पावसाच्या खेळानं तर त्यांचं सौंदर्य अधिकच खुलतं.

निसर्गाच्या या साज-शृंगाराबरोबरच श्रावण महिना घेऊन येतो सणांची मांदियाळी. कोकणात सण म्हटलं की खाद्यपदार्थाची रेलचेल. डावी- बाजू, उजवी बाजू, निरनिराळ्या प्रकारचे भात, भाज्या, चटण्या, कोशिंबीर, विविध प्रकारची पक्वान्नं असं सारं करून ताट सजवायचं हे ठरलेलं. मग जे आपल्याकडे विपुल प्रमाणात आहे, आपल्याकडे पिकतं त्या गोष्टींपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ गृहिणी अगदी मनापासून बनवतात.

कोकण म्हटल की प्रामुख्यानं इथं पिकतो तो तांदूळ. त्यामुळे तांदळापासून खूप प्रकारचे खाद्यपदाथ कोकणात बनवले जातात. नारळ हेही कोकणचं वैशिष्टय़. त्यामुळे प्रत्येक पदार्थात भरपूर खोबरं घालायची कोकणातल्या गृहिणींना सवय. खोबऱ्याशिवाय पदार्थाना जणू चव येतच नाही. आणि तिसरा घटक पदार्थ गूळ. गुळाची गोडी, गुळाच्या वापरानं  पदार्थ खमंग होतात. त्यामुळे कोकणात तांदूळ, खोबरं आणि गूळ घालून बरेच पदार्थ बनवले जातात. उदा. गुळभात, मोदक, खांडवी, पातोळे, पानगी.

नागपंचमीपासून श्रावणातल्या सणांना आणि पक्वान्नांना सुरुवात होते. नागपंचमीच्या दिवशी तळायचं नाही, तव्यावर भाजायचं नाही, चिरायचं नाही, जमीन खणायची नाही. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उकडून केलेले खाद्यपदार्थ बनवतात. नागपंचमीला कोकणात उकडीचे मोदक बनवले जातात. पण नागपंचमीच्या दिवशी मोदकाला नाक म्हणजेच टोक काढायचं नाही. याची बाकी सर्व कृती ही आपल्या नेहमीच्या मोदकांसारखीच असते. फक्त आकार वेगळा.

साहित्य- सारणासाठी दोन नारळांचा चव म्हणजे खवलेलं खोबरं, एक मोठी वाटी गूळ, वेलची पावडर.

सारण बनवताना दोन नारळांचं खोबरं आणि गूळ एकत्र करून कढईत चांगलं शिजवून घ्यावं. शिजवल्यावर त्यात वेलची पूड घालावी.

उकडीचे साहित्य-  तांदळाचं पीठ दोन वाटय़ा, एक चमचा लोणी, पाणी, चिमूटभर मीठ.

एका पातेल्यात दोन वाटय़ा पाणी उकळत ठेवावे. त्यात चिमटीभर मीठ घालावे. उकळताना त्यात चमचाभर लोणी घालावं. पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालून गॅस बंद करावा आणि चांगले ढवळावे. थोडा वेळ घट्ट झाकण ठेवून द्यावं. नंतर उकड चांगली मळून घ्यावी आणि मग त्याची पारी केळीच्या पानावर थापावी. पारीवर नारळाचं पुरण (सारण) ठेवून त्याची चौकोनी घडी करावी आणि मोदकपात्रात उकडून घ्यावी. वाढताना त्यावर गरम गरम साजूक तूप घालावं.

श्रावणातल्या सोमवारांनाही कोकणात महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी श्रावणातल्या सोमवारी नैवेद्य घालण्याची प्रथा आहे. त्यामुळे प्रत्येक सोमवारी नवा पदार्थ केला जातो. त्यात अगदी आयते आणि दुधापासून घारकुटाच्या वडय़ांचाही समावेश असतो.

खांडवी

तांदूळ धुऊन वाळवून त्याची जाडसर भरडी काढून घ्यावी. ही भरडी चांगली तांबूस होईपर्यंत कडल्यात भाजून घ्यावी.

साहित्य – दोन वाटय़ा तांबूस भाजलेली भरडी, पाणी, गूळ, आलं, मीठ, किंचित हळद. एक वाटी नारळाचा चव.

कृती – भरडीच्या दीडपट पाणी घ्यावं. ते एका मोठय़ा पातेल्यात उकळत ठेवावं. त्यात जेवढी भरडी तेवढाच गूळ घालावा. (म्हणजे दोन वाटय़ा भरडी असेल तर दोन वाटय़ा सपाट गूळ घ्यावा.) मूठभर खोबरं घालावं, पाण्यात थोडंसं आलं किसून घालावं. किंचित हळद घालावी आणि चवीपुरतं मीठ घालावं. पाणी चांगलं उकळल्यावर त्यात भरडी घालावी

आयते

तांदळाच्या पिठाची धिरडी म्हणजेच आयते. आयत्यांसाठी तांदूळ धुऊन वाळवून मग त्याचं पीठ करावं. अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेऊन त्यात ते पीठ भिजवावं आणि त्याचे काहिलीवर पातळ आयते घालावे. नारळाचं दूध काढून त्यात थोडासा गूळ घालावा. (नारळाचं दूध जरा घट्टसर काढावं.) आणि त्या दुधातून हे आयते खावेत.
सोनाली कानिटकर – response.lokprabha@expressindia.com