08 March 2021

News Flash

आँखो से बाते…

आय लायनर, काजल, आयशॅडो, मस्कारा आता न्यू नॉर्मल झालं आहे.

-जय पाटील
‘मी मेकअप करत नाही, फक्त लिपस्टिक लावते…’ असं सांगणाऱ्या अनेकजणी असतात… लिपस्टिक एवढी रुळली होती, की ती लावणं म्हणजे मेकअप हे त्यांना मान्यच नसतं. पण एक साथ आली आणि लिपस्टिकचा सगळा तोराच उतरला. ओठ मास्कने झाकले गेले आणि लिपस्टिक, लिप ग्लॉस, लिपलायनर इत्यादी अत्यंत प्रिय, महागडी, ब्रँडेड उत्पादनं ड्रेसिंग टेबलच्या कोपऱ्यात धूळ खात पडली. चेहऱ्याचा अर्धाअधिक भाग मास्कने झाकून टाकला, केसही स्कार्फमध्ये बंद झाले. उरता उरले फक्त डोळे. आता नजरा तिथेच अडकून पडू लागल्यामुळे ललनांनीही डोळ्यंच्याच रंगरंगोटीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आय लायनर, काजल, आयशॅडो, मस्कारा आता न्यू नॉर्मल झालं आहे.

परिस्थिती कितीही कठीण असो, स्त्रिया स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात रंग भरण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करतात हेच खरं. आय मेकअपचे सध्याचे ट्रेंड्स पाहिल्यावर हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. डोळ्यांच्या मेकअप काळं काजळ आणि आयलायनरच्या पलिकडे कधीच गेला आहे. कपड्यांना साजेशा रंगाचं निळं, हिरवं काजळ आता ट्रेनच्या गर्दीपासून चहाच्या टपरीपर्यंत कुठेही सहज नजरेस पडतं. त्यापुढे जात आता निऑन आयशॅडोचा ट्रेंड आला आहे. केशरी, हिरवा, नीळा, लाल, पिवळा अशा विविध रंगांनी पापण्यांना वेढा घातल्याचे दिसू लागले आहे. अर्थात रस्तोरस्ती अद्याप असे प्रयोग नजरेस पडत नसले, तरी समाजमाध्यमांवर अशा आयमेकअपमधली छायाचित्रं पोस्ट करण्यात येऊ लागली आहेत. काही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स अशी नवनवी उत्पादनं वापरून डोळ्यांवर विविध कलाकृती साकारल्याची छायाचित्रं पोस्ट करून ट्रेंड वाढता ठेवत आहेत. काहींनी कलिंगड, मोर, वाघ यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या रंगछटांत आकर्षक कलाकुसर केली आहे.

बराच काळ बंद असलेली ऑफिसेस आता हळूहळू उघडू लागली आहेत. पण अनेक ठिकाणची ब्युटी पार्लर्स मात्र बंदच आहेत. ऑफिसमध्ये प्रेझंटेबल दिसण्यासाठी हलका मेकअप तर हवाच! पण जिथे तो करायचा, तो चेहरा मात्र झाकलेलाच असणार. त्यामुळे डोळे अधिक आकर्षक करण्याच्या आणि रोजच्या रटाळ दिनक्रमात थोडसं नाट्य आणण्याच्या प्रयत्नांत समाजमाध्यमांवरचे ट्रेंड लवकरच ऑफिसात, बाजारात किंवा रस्त्यांवर दिसू लागण्याची शक्यता आहे. सणावारांच्या काळात स्मोकी लूक, शिमर, ग्लॉस, पेस्ट ऑन आय टॅटूजचा प्रयोग केला जाऊ शकतो.

कोविडने अनेक व्यवसायांना जोरदार तडाखा दिला आहे. सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय हा याच वर्गात येतो. तीन महिने घरातच अडकून पडलेल्या महिलांना मेकअपचं साहित्य खरेदी करण्याची गरजच पडली नाही आणि ज्यांना ती खरेदी करायची होती, त्यांना ती उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे प्रसाधनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. अन्य देशांत लिपस्टिकची मागणी प्रचंड घटली आहे. भारतातही ती घटण्याची चिन्हं अहेत. त्यामुळे प्रसाधन व्यवसायाच्या आशा आता डोळ्यांच्या मेकअपवर केंद्रीत झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 8:05 pm

Web Title: talking from eyes msr 87
Next Stories
1 बड्या सिताऱ्यांना ‘ओटीटी’चा चस्का
2 ‘जॉन’ पुन्हा एकदा ‘डॉन’!
3 करोना गुरूजींची गुरूदक्षिणा
Just Now!
X