03 December 2020

News Flash

‘व्हाइट’ लाइट्स!

यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमधले फेस्टिव्ह आणि वेडिंग कलेक्शनमध्ये नेहमीपेक्षा वेगळे ट्रेण्ड पाहायला मिळाले

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर 

विराट-अनुष्काच्या लग्नापासून सर्वसामान्यांनीही पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड डोक्यावर घेतला आणि वेडिंग-फेस्टिव्हच्या टिपिकल लोकप्रिय रंगांना रामराम ठोकला. पेस्टल शेड्समध्येही अनेक कॉम्बिनेशन्स करून बघितली गेली, अनेक वेगवेगळी फॅब्रिक्स ट्राय केली गेली, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या एम्ब्रॉयडरीजही पेस्टल शेड्ससोबत मॅच केल्या गेल्या. पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड जुना झाला म्हणून यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सादर झालेल्या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये व्हाइट्सची प्रचंड व्हरायटी बघायला मिळाली.

नोव्हेंबर-डिसेंबर महिना म्हणजे सणवार, लग्नसराई यांना सुरुवात होते. नवीन ट्रेण्डनुसार आपल्याही फेस्टिव्ह वॉर्डरोबचे रंग, पॅटर्न्‍स, फॅब्रिक ठरवणं हा एक मोठा टास्क असतो. कधी पलाझो ट्रेण्डमध्ये असते तर कधी स्ट्रेट कटच्या पँट्स, कधी वॉर्म रंग ट्रेण्डिंग असतात तर कधी पेस्टल शेड्स अचानक मार्केटमध्ये येतात. प्रत्येक फेस्टिव्ह सीझनच्या आधी होणारे फॅशन शोज त्या त्या वर्षीच्या ट्रेण्डची कल्पना देऊन जातात. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमधले फेस्टिव्ह आणि वेडिंग कलेक्शनमध्ये नेहमीपेक्षा वेगळे ट्रेण्ड पाहायला मिळाले. हेच ट्रेण्ड्स दिवाळीच्या सणात रंग भरताना दिसले तर नवल नाही!

फेस्टिव्ह म्हटलं की साहजिकच राणी कलर, लाल, केशरी, पिवळा असे रंग आणि त्याच्या कॉम्बिनेशनसाठी इतर रंग हेच समीकरण डोळ्यासमोर येतं. गेल्या काही वर्षांत वेडिंग आणि फेस्टिव्ह कलेक्शनमधल्या रंगांच्या संकल्पना थोडय़ा बदलायला लागल्या आहेत. विराट-अनुष्काच्या लग्नापासून सर्वसामान्यांनीही पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड डोक्यावर घेतला आणि वेडिंग-फेस्टिव्हच्या टिपिकल लोकप्रिय रंगांना रामराम ठोकला. पेस्टल शेड्समध्येही अनेक कॉम्बिनेशन्स करून बघितली गेली, अनेक वेगवेगळी फॅब्रिक्स ट्राय केली गेली, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या एम्ब्रॉयडरीजही पेस्टल शेड्ससोबत मॅच केल्या गेल्या. पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड जुना झाला म्हणून यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सादर झालेल्या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये व्हाइट्सची प्रचंड व्हरायटी बघायला मिळाली. एखाद्या रंगाची पेस्टल शेड आणि लाइट म्हणजेच फिकी शेड यात असलेला फरक समजून घ्यायला हवा. पेस्टल शेड ही त्या रंगाची स्वतंत्र छटा असते जी कलर पॅलेटमध्ये सापडत नाही, तर त्यांचे स्वतंत्र कलर पॅलेट असते. एखाद्या रंगात पांढरा रंग मिसळला म्हणजे ती पेस्टल शेड होत नाही तर ती त्या रंगाची लाइट शेड होते. लाइट शेड अर्थात फिकी छटा ही थोडी पारदर्शक असते आणि मूळ रंगाची ओळख कायम ठेवणारी असते. याउलट पेस्टल शेड मात्र पूर्ण अपारदर्शक, मॅट फिनिश असलेली आणि मूळ रंगापेक्षा वेगळेपण सिद्ध करणारी असते. भडक रंगांचीही फिकी छटा करता येऊ शकते ज्याने त्याचा भडकपणा नाहीसा होत नाही, केवळ रंगाच्या टेक्स्चरमध्ये फरक पडतो. मात्र भडक रंगाची पेस्टल शेड त्याचा भडकपणा कमी करते.

यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये पेस्टल शेड्सना बाजूला सारत लाइट शेड्स आणि चक्क पांढऱ्या रंगाच्या फेस्टिव्ह वेअरचा ट्रेण्ड दिसून आला. एरव्ही हा पांढरा रंग उत्सवात दिसण्याचे प्रमाण तसे कमीच असते. त्यामुळे फॅशन वीकमध्ये सादर झालेला हा पांढराशुभ्र साज आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. फॅ शन डिझाइनरअनुश्री रेड्डी ते गौरांग शाहपर्यंत सर्वानीच नेहमीचे गोल्डन, लाल, पिवळे हे रंग बाजूला सारत पांढऱ्या रंगाच्या जवळ जाणारे आणि काही वेळा पांढरेच फेस्टिव्ह वेअर कलेक्शन रॅम्पवर आणलं. ब्रोकेड, सिल्क आणि शिफॉन या फॅब्रिकमध्ये व्हाइटवर जरदोसी एम्ब्रॉयडरी, बीड्सचं वर्क, हँड पेंटिंग अशा कॉम्बिनेशनमध्ये या वेळचं फेस्टिव्ह कलेक्शन सजलं होतं. लहंगा, साडी आणि इंडो-वेस्टर्न अशा तिन्ही प्रकारच्या आउटफिट्समध्ये पांढरा रंग पाहायला मिळाला. कोणतंही कॉम्बिनेशन न करता केवळ पांढऱ्या रंगात संपूर्ण थ्री पीस इंडो-वेस्टर्न सूट आणि लहंगा असं दोन्ही रॅम्पवर प्रेझेंट केलं गेलं. संपूर्ण पांढऱ्या रंगाला आपसूकच असणाऱ्या प्रसन्नतेचा पुरेपूर अनुभव या वेळच्या व्हाइट फेस्टिव्ह कलेक्शनमधून मिळत होता. पांढऱ्या फॅब्रिकवर गोल्डन एम्ब्रॉयडरीचं कॉम्बिनेशन करून मनीष मल्होत्रानेही त्याच्या या वेळच्या ‘रूहानियत’ या फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये मेन्स आणि विमेन्स दोन्ही कलेक्शन सादर केलं. जे जे फॅशन वीकमध्ये ट्रेण्ड होतं तेच बाजारपेठेत दिसतं हा गेल्या काही वर्षांचा शिरस्ता आहे. किमान तो ट्रेण्ड फॉलो करण्याचा प्रयत्न फॅशनप्रेमींकडून के ला जातोच.

फॅशनवेअरमध्ये रंग आणि पॅटर्न्‍समधला तोचतोचपणा टाळून नवं काही सादर करण्याचे प्रयत्न सातत्याने फॅ शन डिझाइनर्सकडून होताना दिसतो. एखादी गोष्ट ट्रेण्ड झाली म्हणून तेच लोकांनी फॉलो करत राहावं यापेक्षा त्यांनी नवं काही परिधान करावं यासाठी त्यांना साजेल आणि आवडेल अशा स्वरूपात हे क लेक्शन्स सादर के ले जातात. फेस्टिव्ह मूडसाठी काही ठरावीक रंगांचा ट्रेण्ड तर कधीच हद्दपार झाला होता. यंदाच्याफेस्टिव्ह कलेक्शनमध्ये पेस्टल ट्रेण्ड्सचा लोकप्रिय झालेला साचा पुसून टाकून ‘व्हाइट’ हाय‘लाइट’ करण्याचा हा फंडाही फॅशनप्रेमींना त्यातही तरुणाईला खास आवडेल असाच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:05 am

Web Title: article on huge variety of whites in festive collection presented at lakme fashion week abn 97
Next Stories
1 डिजिटली  फॅशनेबल!
2 वस्त्रांकित  : नाना ‘चंद्र’कळा
3 सदा सर्वदा स्टार्टअप : तुलनात्मक बाजार विश्लेषण
Just Now!
X