News Flash

‘बाहुबली’ फॅशन

चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.
सणांचे दिवस आले की फॅशन, दागदागिने याविषयी सगळीकडे चर्चा रंगते. पण फार कुणी मुलांच्या फॅशनबद्दल काहीच बोलत नाही. असं कसं चालेल.. त्यांनाही या दिवसांमध्ये मिरवायचं असतंच ना! ‘बाहुबली’ चित्रपटामुळे चर्चेत आलेला राणा डग्गुबतीची एक झलक नुकतीच एका फॅशन शोच्या रॅम्पवर पाहायला मिळाली. नेव्ही रंगाचा कुर्ता त्यावर सफेद पायजमा असा साधा लुक असला तरी, छोटय़ा डिटेलिंगमुळे त्याची ड्रेसिंग उठून दिसते आहे. त्याने कुर्त्यांवर नेव्ही रंगाचेच जॅकेट घातले असूनही या डिटेलिंगमुळे ते लपत नाही.

कसा कॅरी कराल?
सणांच्या दिवसात मुलांची पसंती कुर्त्यांना सर्वाधिक असते. पण ढगाळ कुर्ता आणि पायजमा घालण्याचे दिवस आता गेले. योग्य रीतीने घातल्यास कुर्त्यांमध्येसुद्धा तितकंच स्मार्ट दिसता येतं. फिटेड कुर्ता या वेळी नक्की वापरून पाहा. विशेषत: जिमिंग करणाऱ्या मुलांची पीळदार दंड दाखवण्याची हौस स्ट्रेट स्लिव्हमुळे पूर्ण होते. स्लिव्ह्ज आतल्या बाजूला फोल्ड केल्यावर दिसणारे वेगळ्या रंगाचे किंवा प्रिंटचे कापड, खिशामधला स्मार्ट रुमाल, कफ्स, झकास बटन्स याचं डिटेलिंग असू दे. घरातल्या घरात यातला एखादा प्रयोग कुर्त्यांवर सहज करता येतो. फुटवेअरकडे विशेष लक्ष द्या. कारण हा तुमचा फोकस पॉइंट असेल आणि एक स्मार्ट घडय़ाळ तर हवंच. एवढा सगळा जामानिमा झाल्यावर आणि काय पाहिजे?
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:03 am

Web Title: bahubali fashion
टॅग : Fashion
Next Stories
1 बस नाम ही काफी है
2 व्हिवा दिवा – तेजश्री मेहेर
3 क्लिक : प्रिया बाबर, सातारा
Just Now!
X