26 February 2021

News Flash

कूल सन ग्लासेस

२०१९ या वर्षी समर अ‍ॅक्सेसरीजमध्ये बदल झाले आहेत.

|| गायत्री हसबनीस

२०१९ या वर्षी समर अ‍ॅक्सेसरीजमध्ये बदल झाले आहेत. प्रामुख्याने सनग्लासेसच्या बाबतीत हे बदल सध्या पाहायला मिळतायेत. यावेळी विविध जॉमेट्रिकल आकारांबरोबरच ब्राईट आणि शेडेड रंगांचे आयवेअर मार्केटमध्ये आले आहेत. डेकोरेटेड, शील्ड आणि ग्रेडियंट पद्धतीचे सनग्लासेस दिसतायेत. त्यामुळे चेहऱ्यावरील वेगळ्या रूपासाठी विविध ओकेजनप्रमाणे सनग्लासेस वापरण्याचा हा ट्रेण्ड ‘आऊट ऑफ द बॉक्स’ ठरलाय.

उन्हाळ्यात कपडय़ांपाठोपाठ जास्त बदल दिसतात ते सनग्लासेसच्या फॅ शनमध्ये. डोळ्यांच्या रक्षणासाठी म्हणून वापरले जाणारे हे सनग्लासेसही फॅ शनेबलच असावेत हा सगळ्यांचा आग्रह असतो.गेल्यावर्षी उन्हाळ्यातील बीच, रिसॉर्ट्स, कॅम्प्स, वेडिंग्स आणि समर आऊटिंगसाठी सनग्लासेस डार्क शेड्समध्ये दिसले होते. यंदा मात्र टूर, पिकनिक, लॉजिंग वगैरे वेगवेगळ्या ओकेजन्सना सूट होतील असे डेकोरेटेड, अल्ट्रा, कॅट – आय असे सनग्लासेस ब्राईट कलर्समध्ये पाहायला मिळतील. यंदा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात टी शर्ट्स, हाफ स्लीव्ह्ज, वन पीस असे आऊ टफिट्स वापरले जातात. त्यामुळे टायनी सनग्लासेस न ठेवता थोडे मोठे सनग्लासेस वापरले जाणार आहेत. टोटरेईझ या आकाराचे सनग्लासेस टॉप लिस्टेड आहेत. विशेषत: तुमच्या रेड कलर आऊटफिटवर या आकाराचे काळ्या रंगाचे सनग्लासेस उठून दिसतील. कॅट – आय शेपचे सनग्लासेसनाही सध्या खूप मागणी आहे. यांच्या लोकप्रिय शेप्समध्येही बदल केले गेले असल्याने त्याचा लूकवर चांगला परिणाम दिसून येतो आहे. नियॉन, फंकी, एस्थेटिक या लुकसह रेड, मरून आणि ऑरेंज असे रंग कॅट – आयमध्ये पहायला मिळतील.

‘रे बॅन’, ‘मस्कॉट’ या मोठय़ा सनग्लासेस कंपन्यांनी राऊं ड, रेक्टॅन्गल, फूल रिम या शेप्सचे सनग्लासेस आणले असून रिमच्या लूकमध्ये गोल्डन, ऑक्टोपस पिंक, एनिग्मॅटिक ब्लॅक, पॅन्थर कलर अशा रंगांची निवड केली आहे. या सीझनला विविध प्रकारच्या सनग्लासेसचा विचार करताना आपल्या समर आऊटफिटला सूटेबल आणि आकर्षक दिसणाऱ्या सनग्लासेसचा विचार व्हायला हवा. कोणते सनग्लासेस मेन्सवेअर आणि वूमन्स वेअरमध्ये जास्त करून आले आहेत हेही तितकेच महत्त्वाचे. यंदा सनग्लासेसमध्ये खुद्द ‘ग्लास’ आणि ‘फ्रेम’ यांचे कॉम्बिनेशन म्हणजे एक वेगळा सनग्लासेसचा प्रकार आला आहे आणि ते माहिती करून घेण्यासाठी यंदा समर कलेक्शनमधून नावारूपाला आलेल्या सनग्लासेसच्या विविध प्रकारांचा विचार करायला हवा.

ट्रान्सपरन्ट सनग्लासेस : हे सनग्लासेस यंदा जोरात झळकताना दिसतील. यात रेट्रो आणि मॉडर्न स्टाईल या दोन्ही प्रकारचे गॉगल्स ट्रान्सपरन्ट लुकमध्ये मोडतात तसेच यात ट्रान्सपरन्ट ग्लासेस आणि फ्रेम आहे. विशेष म्हणजे फ्रेमही ट्रान्सिस्टंट आणि मजबूत आहे तर ग्लासेस हे थिक आणि वॉटर प्रुफ आहेत. यामध्ये पोलराईझ्ड लेन्सेस आहेत. बेबी पिंक, नारंगी, कॅन्डी कलर, ग्रेडियंट कलर यात उपलब्ध आहेत. ग्रेडियंट कलरमध्ये जांभळा आणि काळा रंग जास्त आकर्षक आहे. यात विशेष करून ‘वेफेरअर’ पद्धतीचे सनग्लासेस आहेत. यात दोन्ही मेन्स आणि वूमन्सवेअर उपलब्ध असून ‘फास्टट्रॅक’कडे तुम्हाला हे सनग्लासेस हमखास मिळतील.

ड्ट एम्बलिशमेंट / डेकोरेटेड सनग्लासेस – यामध्ये प्रामुख्याने पॅटर्न सनग्लासेस येतात. ज्यात रिमवर विविध कलरफूल पॅटर्न्‍स असतात. असे सनग्लासेस हे रूटिन वेअरमध्ये आले आहेत. पार्टीवेअर अथवा थोडा शाईनिंग लुक हवा असेल तर डेकोरेटेड सनग्लासेसचा विचार करण्याजोगा आहे. थोडा वेगळा लुक बऱ्याच मुलींना हवा असतो त्यामुळे हा ट्रेण्ड त्यांना उपयुक्त ठरेल. वेस्टर्न रॅम्पवरून हा ट्रेण्ड आला आहे त्यामुळे भारतात विविध मार्केटमधील डिझाईन केलेल्या डेकोरेटेड सनग्लासेसची मागणी यंदा वाढेल. समर पार्टी, क्रुझवर तुम्ही असे सनग्लासेस वापरू शकता. यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे क्रिस्टल सनग्लासेसचा. हे क्रिस्टल डिझाईन मध्यभागी, दोन्ही बाजूला आणि सक्र्युलर साईड्सला असते. यात प्रामुख्याने रिमवर असणारे क्रिस्टल डिझाईन मीडियम आणि स्मॉल शेप क्रिस्टल्समध्ये आहेत. पीच कलर, ब्राऊ न ते अगदी डायमंड कलरपासून यात विविधता आहे. हार्ट शेप आणि बटरफ्लाय सनग्लासेस देखील तितकेच लोकप्रिय आहेत.

ड्ट एविएटर्स – या पद्धतीचे सनग्लासेस हे यंदा मेन्सवेअरमध्ये जास्त उतरले आहेत. मुळात ‘कारेअरा’ सारख्या मोठय़ा ब्रॅण्डने एविएटरमध्ये वैविध्य आणून यातही काळा रंग पुढे ठेवला आहे. ‘विन्सेंट चेस’ या ब्रॅण्डचे सनग्लासेस ब्लू, ब्लॅक, पर्पल, ग्रे अशा रंगात आहेत तर यात ऑलिव्ह ग्रीन, यल्लो आणि ब्राऊ न असे रंगही पहायला मिळतील. यामध्ये मेटल थिक राऊंड फ्रेम असलेले गॉगल्ससुद्धा आहेत. असे सनग्लासेस ऑफिस लुकसाठी सुद्धा योग्य ठरतील.

ड्ट हेक्सॅगॉन शेप्ड – षटकोनी आकाराचे हे सनग्लासेस जास्त क्लासी दिसतात याचे कारण त्याचा आकार आणि मेटॅलिक फ्रेम्स तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा लुक देतात. हे सनग्लासेस युनिसेक्समध्ये उपलब्ध आहेत. यात रेट्रो लुकही आहे ज्यात काळ्या ग्लासेसवर गोल्डन रिम किंवा प्लेन ग्लासेसवर गोल्डन ग्रीन, ग्रे, वाईन बरगंडी, अ‍ॅल्यूमिनिअम अशा रंगाच्या फ्रेम्स आहेत तर दुसरीकडे कॉफी कलर ग्लासेसभोवती शुभ्र पांढऱ्या रंगाचे फ्रेम्स, रेड कलर ग्लास आणि गोल्डन रिम, ऑरेंज कलर ग्लास व ग्लोडन रिम तसंच यल्लो कलर ग्लासवर ट्रान्सपरन्ट गोल्डन असाही फंडा आहे. याशिवाय ऑक्टागॉनल, पॉलिगॉनल आणि स्क्वेअर असे प्रकारही यात आहेत. स्क्वेअर सनग्लासेस हे मेन्सवेअरमध्ये अधिक आहेत. या हेक्सॅगॉन सनग्लासेसमध्ये सर्वात आवडता प्रकार ठरला आहे तो ‘राऊंड स्टीमपन्क’चा. हे सनग्लासेस रॉयल आणि एलिगन्ट दिसतात. यावेळी समरमध्ये हा लुक ट्रेण्डमध्ये आहे आणि खासकरून उन्हाळ्यात लग्नसमारंभात ट्रॅडिशनल किंवा फ्लोरल आऊटफिटवर हे सनग्लासेस नक्कीच मॅच होतील. हे सनग्लासेस ‘अजिया.कॉम’, ‘अ‍ॅमेझोन’वर उपलब्ध आहेत.

ड्ट मिरर/ अल्ट्रा सनग्लासेस – समरमध्ये यंदा कलरफुल आणि ब्राईट रंगाच्या अ‍ॅक्सेसरीजाच ट्रेण्ड आहे. अगदी कानातल्यांमध्ये देखील टास्सेल मधील बरेच प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत, त्यामुळे अशा कलरफुल इअरिंग्जसोबत डोळ्यांवर मिरर सनग्लासेस ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. आरशाच्या मेटॅलिक ग्लासेसना यंदा भाव चढला आहे. हे सनग्लासेस यू.व्ही. किरणांपासून आपला बचाव करतात. ‘अजिया.कॉम’वर खास ‘एम.टीव्ही रोडिज् मिरर सनग्लासेस’ या नावे अख्खं मिरर सनग्लासेसचं कलेक्शन आहे. अर्थात यात मिरर लेन्स आणि मेटॅलिक फ्रेम्स आहेत. यात रेन्बो कलर मिरर सनग्लासेसपासून डार्क स्काय ब्लू मिरर ग्लासपर्यंत तुम्हाला पर्याय आहेत. रेन्बो कलर मिरर सनग्लासेस तुम्ही व्हाईट फुल स्लीव्ह्ज किंवा स्लीव्हलेस वनपीसवर घालू शकता. यामध्ये शिल्ड सनग्लासेस खासकरून आले आहेत. तेसुद्धा यु. व्ही. किरणांपासून बचाव करतात. यात फ्लॅट आकार आहेत शिवाय पारदर्शक रंग आणि त्यांचे कॉन्ट्रास्ट आहेत.

ड्ट ओव्हरसाईज्ड सनग्लासेस – डोळ्यांचे रक्षण अधिक व्हावे म्हणून ओव्हरसाईज्ड सनग्लासेस ट्रेण्डमध्ये आहेत. यात वूमन्सवेअर जास्त पाहायला मिळतात. फ्लोरल आणि ऑफ शोल्डर टॉपवर असे ओव्हरसाईज्ड ग्लासेस कूल दिसतात. यात तुम्हाला कॅट – आय, आयताकार, बटरफ्लाय, कल्बमास्टर असे टाईप दिसतील. जंपर, पलाझो, क्रॉप टॉपवर असे सनग्लासेस परफेक्ट आहेत. त्यामुळे हा लुक विसरून चालणार नाही. थोडा वेस्टर्न आणि लॅविश लुक हवा असेल तर तुम्ही लाईट टॅबलेट पिंक, कॉन्ट्रास्ट रेड आणि ऑरेंज आणि थंडरस्ट्रोम कलर या रंगाच्या ओव्हरसाईज्ड सनग्लासेसचा विचार करू शकता.

ड्ट सस्टेनेबल सनग्लासेस – यंदा हा प्रकार लक्षवेधी ठरला आहे. इकोफ्रेंडली, सस्टेनेबल सनग्लासेस हे खासकरून बांबू आणि लाकूड यापासून तयार केले आहेत. सेमी – वूडन, ऑथेंटिक वूडन अशा काही स्टाईल्स आहेत. हे १०० टक्के पर्यावरणस्नेही आहेत. खादी, ट्रॅक पॅन्ट्स, थ्री – फोर्थ, टी – बॅक अशा आऊटफिट्सवर हे सनग्लासेस नक्कीच योग्य ठरतील. बांबू सनग्लासेस हे अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. ‘द ट्राईब’ या वेबसाईटवर वूडन आणि ट्राईबल लुकचे सनग्लासेस मिळतील. यात वूडन रिमसोबत मॅन्गो कलर, ब्लॅक आणि स्काय ब्लू – यल्लो कॉन्ट्रास्ट असे ग्लासेस पहायला मिळतील.

यंदा उन्हाळ्यात स्टाईलिश पण आकर्षक असे सनग्लासेस असून कॉन्ट्रास्ट रंगाची निवड यावेळेस योग्य ठरेल. लहान सनग्लासेसपेक्षा मोठय़ा सनग्लासेसची मागणी जास्त आहे. त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी आपल्या आवडत्या सनग्लासेस स्टाईल्सची लिस्ट नक्की तयार ठेवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 7:52 pm

Web Title: cool sunglasses
Next Stories
1 चित्रभाषेत रमणारा श्रीहरी
2 स्त्री
3 भार्गवी चिरमुले
Just Now!
X