एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

भाषेची एक मोठी गंमतच आहे. शब्दांना हाती धरून शब्दांच्याच माध्यमातून आपण शब्दांविषयीच बोलू शकतो. आजचा शब्द या सदराच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. या सदरातून वेगवेगळे उच्चार जाणून घेताना उच्चाराच्या उच्चाराचा विचार आपण करतो का? हे शब्द, उच्चार, उच्चाराचा उच्चार वाचून साबणाचा कसा फेसच फेस.फेसातून अधिक फेस तयार होतो तसं काहीसं तुम्हाला जाणवत असणार. हा उच्चार इंग्रजीतील pronunciation या शब्दाचा उच्चार कसा करावा अशी आपल्या एका वाचकांची विचारणा होती. त्या ओघात हे सारं आलं.
Pronunciation हा शब्द वाचल्यावर लक्षात येते की किती विविध प्रकारे आपण याचा उल्लेख करतो. पहिला सगळ्यात पॉप्युलर म्हणजे प्रोनाउनसिएशन. दुसरा उच्चार म्हणजे प्रोनॉन्सिएशन आणि तिसरा प्रोनान्सिएशन. या तिघातला फरक सूक्ष्म असला तरी फार वेळा यापैकी एकाचा वापर होतोच. मात्र इंग्रज व अमेरिकन दोघांनीही एकमताने पक्का केलेला उच्चार आहे ‘प्रोनन्सिएशन’. ना नाही, नॉ नाही आणि नाऊन तर नाहीच नाही. ‘प्रोनन्सिएशन’ हे आहे अचूक रूप. अचूक उच्चार.
लहानपणी शाळेत इंग्लिश शिकताना ऐकलेल्या काही शब्दांचा आपल्यावर प्रचंड पगडा असतो. इंग्रजी व्याकरणातील नाउन, अ‍ॅडजेक्टिव्ज हे शब्द तर झोपेतून उठवलं तरी तोंडी येणारे. त्यातल्या नाउनसारख्या शब्दांवरचं प्रेम मग ‘प्रोनन्सिएशन’मध्ये शिरतं आणि आपण बिनधास्तपणे उच्चारतो प्रोनाउनसिएशन..जे चूक आहे. काही शब्द आपल्याला कितीही हवे तसे वळवावेसे वाटले तरी राँग लेन इज राँग. अशा वेळी शब्दाचा अचूक उच्चार शोधणं मस्ट आहे.
या सदराच्या निमित्ताने जे शब्द आपल्याला टोटली नव्या उच्चारासह कळले त्या शब्दांच्या प्रत्यक्ष वापराबद्दल काही जणांच्या प्रतिक्रिया मस्त आहेत. जसं की, आम्ही इतके दिवस ओव्हनच म्हणत होतो. आता अवन हा उच्चार पटकन रुळला नाही तरी ‘ओव्हनमध्ये.. आपलं.. अवनमध्ये ठेव’ असं करेक्शन पटकन होतं.
चलो ये भी सही! कदाचित अचूक उच्चार ओठी रुळायला वेळ लागेल. पण तरी त्यातल्या त्यात आपण आधी चुकून मग आठवून बरोबर बोलण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. या अचूकतेने काय साध्य होईल? किंवा हे सारं कशासाठी? असा प्रश्न मनात येणारच. पण बघा हं! आपण छान मूडमध्ये भेळेवर ताव मारत असतो आणि अचानक दाताखाली मातीची वा वाळूची कचकच लागते. मग मूड पालटतो. काहीतरी बिनसतं. अडकतं. उच्चाराचंपण तसंच आहे. तुमच्या प्रभावी बोलण्यातली कचकच म्हणजे चुकीचा उच्चार. तो काढून टाकून बोलणं प्रभावी करण्यासाठी करेक्ट प्रोनन्सिएशन मस्ट आहे बॉस.

Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
EVM and VV Pat Controversy Occurs Frequently
विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?