News Flash

डान्सिंग दिवाज्

‘लागा चुनरी में दाग..’पासून ते ‘राधा तेरी चुनरी..’पर्यंत व ‘नाचनाचुनी अती मी दमले..’पासून ते ‘बबली बदमाश..’पर्यंत कुठलेही गाणे असो, ज्यांच्या रक्तातच नृत्य भिनलेले आहे त्यांना

| April 26, 2013 12:01 pm

‘लागा चुनरी में दाग..’पासून ते ‘राधा तेरी चुनरी..’पर्यंत व ‘नाचनाचुनी अती मी दमले..’पासून ते ‘बबली बदमाश..’पर्यंत कुठलेही गाणे असो, ज्यांच्या रक्तातच नृत्य भिनलेले आहे त्यांना भाषेची, पेहरावाची कशा-कशाचीच पर्वा नसते. ते फक्त आणि फक्त नाचण्यात मश्गूल होतात. २९ एप्रिलला असलेल्या डान्स डेच्या निमित्ताने काही नृत्यवेडय़ा कोरियोग्राफर्सशी मारलेल्या गप्पा..

लयम् डान्स अ‍ॅकॅडमीमध्ये गेली दोन वर्षे मी शिकवतो आहे. हिपहॉप, क्रंिपग, पॉपिंग-लॉकिंग, बॉलिवूड, फ्रिस्टाइल हे सगळे वेस्टर्न डान्स प्रकार मी या क्लासमध्ये शिकवतो. कोरियोग्राफर म्हणून करिअर करायला चांगलाच वाव आहे. आजकाल डान्सचे इतके रिअ‍ॅलिटी शोज चालू असतात त्यात त्यांना कोरियोग्राफरची गरज लागते. नुसते रिअ‍ॅलिटी शोज नव्हे तर म्युझिक लाँच असो किंवा कोणाचे लग्न, सगळीकडे डान्स इज मस्ट! आणि चांगला डान्स करायला व बघायला कोणाला नाही आवडणार? चांगला डान्स बसवणे म्हणजे अर्थातच कोरियोग्राफरकडून बसवून घेणे हे आलेच. मुळात नाचाला आजकाल महत्त्व  प्राप्त झाल्यामुळे कोरियोग्राफर म्हणून उत्तम करिअर करता येऊ शकते. – प्रतीक जोशी.

आपण आपल्या कामाबद्दल खूप पॅशनेट असलो तरच ते चांगल्या प्रकारे करू शकतो असे मला वाटते. हेच मी डान्सच्या बाबतीतही म्हणीन. घोर मेहनत आणि त्या जोडीला पॅशन असेल तर आणि तरच या इंडस्ट्रीमध्ये तग धरू शकतो. बऱ्याचदा असे होते की लोकं कोरियोग्राफरच्या बरोबर येणारे ग्लॅमर बघतात पण त्यामागची मेहनत, तिथपर्यंत पोहोचण्याकरता केलेले स्ट्रगल लक्षात घेत नाहीत. म्हणून एकच सांगावेसे वाटते की गेट युवरसेल्फ क्लीअर अबाऊट इट! हे क्षेत्र सध्या खूप डिमांडिंग आहे यात वादच नाही. मी गेली पाच वर्षे डिफरंट स्ट्रोक्स डान्स अ‍ॅकॅडमीमध्ये हिप-हॉप, सल्सा, जॅझ, बॉलरूम डान्स इत्यादी शिकवतो. – ऋग्वेद बेंद्रे

मला डान्स शिकायला व शिकवायला खूप आवडतो. मी गेली पाच वर्षे लयम् या क्लासमध्ये फोक डान्स शिकवतो. या क्षेत्रात टिकायचे असेल तर एका तरी डान्स फॉर्मवर मास्टरी व इतर स्टाईल्सची सर्वसाधारण माहिती असावी लागते, तसेच गाण्यांबद्दल माहिती असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. फोकमध्ये कर्कटम, माडियासारखी लोकनृत्ये बऱ्याच जणांना माहीत नसतात.  या नृत्य प्रकारचा प्रचार व प्रसार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. –ओंकार आंबेडकर

 

आशीष पाटील डान्स अ‍ॅकॅडमीमध्ये मी गेली चार वर्षे शिकवतो आहे. मला वेस्टर्न पेक्षा भारतीय नृत्य प्रकार जास्त आवडतात. भारतीय नृत्यशैली, मग ती शास्त्रीय असो वा लोक नृत्य. माझ्या मते भारतात इतके नृत्यप्रकार आहेत की आपण ते न करता नुसते वेस्टर्न का शिकावे? क्लासिकल व फोक या प्रकारांवर मी माझे लक्ष केंद्रित केले आहे. आपण कोरियोग्राफर म्हणून एखाद्या नृत्यप्रकारावर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. हे फिल्ड करिअरच्या दृष्टीने नक्कीच चांगले आहे. –आशीष पाटील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 12:01 pm

Web Title: dancing divas
टॅग : Viva
Next Stories
1 शब्दांचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर
2 यंग रिडर्स
3 ‘व्हिवा लाऊंज’मध्ये सौम्या स्वामीनाथन