25 February 2021

News Flash

करिनाची ‘रसिका’

फॅशन किंवा स्टाइलचे धडे आपण अजूनही चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांकडून घेत असतो. सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो;

| July 31, 2015 01:03 am

vv27फॅशन किंवा स्टाइलचे धडे आपण अजूनही चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांकडून घेत असतो. सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.
‘गोरी तेरे प्यार में’, ‘सिंघम रिटर्न्‍स’नंतर ‘बजरंगी भाईजान’ या सलग तिसऱ्या सिनेमामध्ये करीना कपूर पुन्हा एकदा ‘देसी गर्ल’ लुक अवतारात दिसते आहे. मध्यंतरी ‘गब्बर इज बॅक’सारख्या चित्रपटांमध्ये तिने वेस्टर्न लुक कॅरी केला होता, पण या चित्रपटांमध्ये तिने कॅमियो केला होता. ‘बजरंगी भाईजान’ हा पूर्णपणे सलमान खानचा चित्रपट असल्याने त्याचीच सर्वाधिक चर्चा होतेय, हे साहजिकच. करिनाच्या भूमिकेपेक्षा तिने साकारलेल्या ‘रसिका’च्या लुकची चर्चा होतेय.
चित्रपटाची कथा सीमेलगतच्या गावामध्ये घडणारी आहे. त्यामुळे तेथील थंड वातावरण लक्षात घेऊन करिनाचा लुक डिझाइन केलाय. त्यामुळे फुल स्लीव्ह कुर्ता, चुडीदार किंवा सलवार आणि दुपट्टा असा तिचा लुक आहे. बहुतेक डल रंगांचा वापर केला आहे, तरीही एखाद्या ब्राइट रंगाच्या वापराने ‘लुक’ला फ्रेशनेस आलाय. उत्तर भारतात कलमकारी पेंटिंग प्रसिद्ध आहे. नैसर्गिक रंग आणि निसर्गापासून प्रेरणा घेतलेल्या या पेंटिंग्जमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’वर आधारित चित्र पाहायला मिळतात. कलमकारी भारतातील प्राचीन समजल्या जाणाऱ्या कलांपैकी एक आहे, पण आजही तितकीच प्रसिद्ध आहे. या पेंटिंग्जचा तसेच चिकनकारी एम्ब्रॉयडरीचा वापर तिच्या कुर्तीमध्ये दिसतो. करिनाने अँटिक ज्वेलरी घातली आहे. विशेषत: तिच्या नाकातील नथ लुकचा प्लस पॉइंट आहे. काजळ आणि वेव्ही केसांच्या वेणीने तिचा लुक पूर्ण केला आहे.
कुठे आणि कसा कॅरी करता येईल
कुर्ता आणि लेगिंग्ज सध्या ट्रेंडमध्ये आहेत, त्यामुळे करीनाचा हा लुक कोणत्याही ऑकेजनला कॅरी करायला काहीच हरकत नाही. विशेषत: ऑफिसच्या फॉर्मल अटायरला हा लुक साजेसा आहे. चित्रपटामध्ये करिनाने फ्लेअर कुर्ता घातले आहेत. म्हणजे घेरदार कुर्ता. अम्ब्रेला ड्रेसची स्टाइल आता बाजारातून गेली आहे आणि रोज कॉलेज किंवा ऑफिसला घालायला ते सोयीचेही नसतात. पण बस्ट किंवा कमरेपर्यंत फिटेड आणि खाली घेर असलेले हे कुडते एरवी वापरायला काहीच हरकत नाही. विशेषत: पेअर शेपच्या मुलींना कमरेखालचा लठ्ठपणा लपवायला हे कुडते उत्तम आहेत. अर्थात या कुडत्यांना फुल किंवा थ्री-फोर्थ स्लीव्ह आहेत. उंचीने कमी असलेल्या मुलींनी किंवा दंड जाड आहेत त्यांनी शक्यतो अशा प्रकारच्या स्लीव्ह्ज टाळाव्यात. दुपट्टय़ाऐवजी करीनाने शॉल कॅरी केली असली तरी आपल्याकडील उन्हाळा लक्षात घेता, त्या वापरणे सोयीचे ठरणार नाही. त्याएवजी प्रिंटेड कॉटन ओढण्या ट्राय करा. तिची ओढणी घेण्याची पद्धत मात्र ट्राय करायला हरकत नाही. करीनाने वेणी सुंदररीत्या कॅरी केली असली तरी, प्रत्यक्षात या हेअर स्टाइलमध्ये स्त्रिया वयस्क दिसायची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे केसांना वेव्ह्ज देणं किंवा काही फ्लिक्स समोर घेतल्यास उत्तम.
मृणाल भगत -viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:03 am

Web Title: desi look of kareen kapoor
Next Stories
1 व्हिवा दिवा : हर्षदा फाटक
2 दोन आव्हानकथा उलगडणार रौप्यमहोत्सवी व्हिवा लाउंजमध्ये
3 आम्ही ‘नेट’खुळे
Just Now!
X