01 October 2020

News Flash

केसांविषयी बोलू काही…

केसांना तेल लावावं की नाही, शँपूची निवड कशी करावी, हेअर कलरिंगनं केस खराब होतात का, याबाबत अनेक समज - गैरसमज मनात असतात. प्रत्येक वेळी प्रत्येकाकडून

| August 9, 2013 01:04 am

केसांना तेल लावावं की नाही, शँपूची निवड कशी करावी, हेअर कलरिंगनं केस खराब होतात का, याबाबत अनेक समज – गैरसमज मनात असतात. प्रत्येक वेळी प्रत्येकाकडून वेगवेगळी माहिती या संदर्भात आपण ऐकत असतो. हेअर एक्सपर्ट डॉ. अपर्णा संथानम यांनी याच गोष्टींची चर्चा आपल्या नव्या पुस्तकात केली आहे. ‘लेट्स टॉक हेअर’ या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच झालं. त्यानिमित्त केसांबाबतचे काही समज – गैरसमज याविषयी व्हिवानं अपर्णा संथानम यांच्याशी केलेली ही बातचीत.
नियमितपणे केसांना तेल लावणं आवश्यक आहे का?
हो, तेल हे केसांसाठीचं उत्कृष्ट प्री-कंडिशनर आहे. खोबरेल तेल यासाठी चांगलं. तेल केसांच्या आत झिरपतं आणि केसांना आतून संरक्षण देतं. केसांना नियमितपणे तेल लावल्यास केस मजबूत, मऊ आणि प्रदूषणाशी दोन हात करण्यास अधिक सक्षम बनतात.
योग्य तेलाची निवड कशी करावी?
मी स्वत नारळ मुख्य घटक असणारया तेलाची शिफारस करेन. कारण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने संशोधन झालं आहे आणि ते केस तसंच स्काल्पसाठी उत्कृष्ट असल्याचं त्यातून दिसून आलं आहे.
केस निरोगी राखण्यासाठी ते किती वेळा धुतले पाहिजेत?
हे खरंतर तुमची केसांखालची त्वचा कुठल्या प्रकारची आहे तसंच केसांची अवस्था कशी आहे, यावर अवलंबून असतं. त्यानुसार आठवड्यातून एकदा की चारदा हे ठरवता येईल.
दीर्घकाळ एकाच ब्रॅण्डचा श्ॉम्पू वापरणं कितपत हितावह आहे?
शॅम्पूचा ब्रॅण्ड बदलत राहावा. एकाच ब्रॅण्डचा शॅम्पू सातत्याने वापरल्याने स्काल्पवर एक प्रकारचा थर जमू लागल्याने त्वचा सोलवटायला आणि कोरडी पडायला सुरुवात होते. काही महिन्यांतून एकदा बेबी शॅम्पू किंवा सल्फेटमुक्त शॅम्पू वापरावा.
शॉम्पूमधले केमिकल्स केसांसाठी घातक असतात, यात कितपत तथ्य आहे?
सल्फेटसारखे शॅम्पूमधले घटक तसंच स्ट्राँग अॅण्टि-डॅण्ड्रफ शॅम्पूमधल्या घटकांमुळे स्काल्पची त्वचा तसंच केस शुष्क होऊ शकतात. ते खराब व्हायला सुरुवात होते. शॅम्पूमधले घटक जितके सौम्य तितका तो केसांसाठी चांगला.
अॅण्टि डॅण्ड्रफ शॅम्पू तीव्र असल्याने ते नियमितपणे वापरल्यास केसांची हानी होते, हे कितपत खरं आहे?
हे शॅम्पू वारंवर वापरल्याने टाळूची त्वचा कोरडी होतेआणि केस गळायला सुरुवात होते. त्यामध्ये सौम्य शॅम्पूचे गुणही एकत्र केले पाहिजेत.
 कोंड्यापासून सुटका होण्यासाठी कोणते घरगुती उपाय योजता येतील?
दही, मेथीदाणे आणि लिंबाचा रस हे घटक एकत्र करून त्याचा पॅक बनवून तो केसांना लावल्याने टाळूची त्वचा निघण्याचं प्रमाण कमी होतं. आहारात प्रथिनं आणि दह्याचा समावेश केल्यासही हे साधता येईल.
वेगवेगळी हेअर स्टाइल करत राहिल्याने केसांचा पोत बिघडतो का?
नाही, केमिकल्सचा अतिरेकी वापर आणि अतिरिक्त हिटिंगमुळे केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
 हेअर ड्रायरचा वरचेवर वापर केल्याने केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, हे खरं आहे का?
हो, हे खरं आहे. विशेषत हॉट मोड वापरल्यानंतर त्याचा परिणाम केसांवर होतो. केस धुण्यापूर्वी त्यांना तेल लावा. थोडं लिव्ह-इन सिरम लावा आणि हेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करा.
 पर्मनण्ट स्ट्रेटिनग किंवा कलरिंग केसांसाठी घातक ठरू शकतं का?
हो, या सर्व प्रोसिजर्समुळे केसांमधले बंध तुटतात आणि त्यामुळे केस अत्यंत नाजूक बनतात ज्यामुळे त्यांना चटकन हानी पोहोचू शकते. अशा केसांची खूप काळजी घ्यावी लागते.
 केसांना कलर वापरणं सुरक्षित आहे का?
केसांना लावायचे रंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सर्वच रंगांमुळे केस शुष्क बनतात आणि त्यांची आद्र्रता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने ते अतिसंवेदनशील बनतात ज्यामुळे त्यांना चटकन हानी पोहोचू शकते.
 केसांना वेगवेगळ्या शेड्चं कलरिंग चांगलं की वाईट?
क्लोरिनेटेड पूल्स अत्यंत महत्त्वाचे असतात. ते जितके कमी तितकं चांगलं. केस कलर केल्यानंतरही केसांची योग्य ती काळजी घ्यायची असते. केसांना तेल लावणं, सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर्स वापरणं हे कटाक्षाने पाळलं पाहिजे. चांगल्या टेक्श्चरच्या केसांना रंग सहजपणे लागतो तर शुष्क केसांना रंग लागायला वेळ लागतो. सर्व रंगांमुळे केस शुष्क बनत असल्याने त्यांना मॉइश्चरायिझगची गरज असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2013 1:04 am

Web Title: hair care 2
टॅग Ladies,Lady
Next Stories
1 फॅशन पॅशन : व्यक्तिमत्त्व आणि फॅशन
2 खाबुगिरी : एक अनिवार्य चक्कर
3 विष्णूज् मेन्यू कार्ड : पावसाळ्यातल्या पालेभाज्या-२
Just Now!
X