News Flash

लर्न अॅण्ड अर्न : नूपुर नाद

‘स्टेजवर गेल्यावर कोणतंही एक्सक्यूज देऊन चालत नाही. तिथं तुमचं बेस्टच द्यावं लागतं काही झालं तरीही.’ - नृत्यात तल्लीन झालेल्या नूपुर दैठणकरविषयी...

| November 15, 2013 01:10 am

‘स्टेजवर गेल्यावर कोणतंही एक्सक्यूज देऊन चालत नाही. तिथं तुमचं बेस्टच द्यावं लागतं काही झालं तरीही.’  – नृत्यात तल्लीन झालेल्या नूपुर दैठणकरविषयी…
‘तिच्या’ आईचा ‘सूर श्याम रंग’ बॅले बसत होता. ती मुंबईला नि आई पुण्यात होती. त्यात ‘ती’ कृष्ण नि आई शिव झाली होती. त्यातील ‘हरिहर शंकर नमो नम:’ गाण्यात दोघींचं सिंक्रो होणं अतिशय गरजेचं होतं. मोबाइलवर रेकॉर्ड करून ‘ती’ प्रॅक्टिस करत होते. त्याच वेळी कनकताईंच्या ‘विठ्ठला तुझे चरणी’ बॅलेची प्रॅक्टिस असल्यानं ‘तिला’ पुण्याला जायला जमलं नाही. आई नि ‘तिनं’ थेट स्टेजवरच परफॉर्म केलं. आधीच्या ‘राजस’मुळं रसिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यांचं एवढं चांगलं सिंक्रो झालं की, त्यांनी एकत्र प्रॅक्टिस केली नव्हती हे कुणाला सांगून पटलंही नसतं. त्यांचं अंडरस्टॅिण्डग जबरदस्त होतं. ही नादमयी कलाकार आहे, नूपुर दैठणकर!
तिचे वडील डॉ. धनंजय संतूरवादक नि आई डॉ. स्वाती भरतनाटय़म नृत्यांगना आहेत. नूपुरवर घरातल्या कलासमृद्ध वातावरणाचे संस्कार झाले. नकळत्या वयापासून कलाविषयक गोडी निर्माण झाली. इतरांना नृत्य शिकताना पाहणारी नूपुरही नृत्यात रंगली. दहावीत नृत्यविशारद झाल्यावर तिनं घरीच नृत्य शिकवायला सुरुवात केली. पाहता पाहता मुलींची संख्या वाढू लागली. ‘सुदर्शन कलामंचा’तील मुलींसोबतच्या अॅटॅचमेंटमुळं तिथलं शिकवणं तिनं कंटिन्यू केलं. गेली आठ र्वष ती नृत्य शिकवत्येय.
दहावीला चांगले गुण मिळूनही नृत्यालाही तिला वेळ द्यायचा असल्यानं तिनं ‘फग्र्युसन कॉलेज’मध्ये आर्ट्सलाच प्रवेश घेतला. बारावीला फिलॉसॉफीत ती पहिली आली. तिनं एस.वाय.ला असताना नृत्यालंकार पूर्ण केलं. बी. ए.(फिलॉसॉफी)मध्ये तिला डििस्टगशन मिळालं. ‘नालंदा’त शिक्षण घेतलेल्या तिच्या आईनं नुपूरपुढं ‘नालंदा’त शिकायचा पर्याय ठेवला. ‘नालंदा’ची महिती नि महत्त्व नूपुर जाणून होती. टी.वाय.च्या रिझल्टनंतर तिनं ‘नालंदा’त प्रवेश घेतला. तिनं ‘नालंदा’तून एम.पी.ए. (भरतनाटय़म)मध्ये डििस्टगशन मिळवलंय.
‘एचएमव्ही’तर्फे तिच्या आईच्या ‘राजस सुकुमार’ या डान्सड्रामाची व्हीसीडी काढण्यात आली. तेव्हा ती आठवीत होती. दोनशेहून अधिक शोज झाल्येल्या या कार्यक्रमात तिनं कृष्णाची भूमिका केल्येय. सध्या चालू असणाऱ्या ‘तेजोनिधी’मध्ये ती स्वामी विवेकानंदांची भूमिका करत्येय. कनकताईंच्या ‘विठ्ठला तुझे चरणी’मध्ये ती गवळण आली होती. ती फक्त क्लास नि स्वत:च्या परफॉर्मन्समध्येच अडकणार नाहीये. तिचे विविध ठिकाणी सोलो परफॉर्मन्स झाल्येत. एस.वाय.ला असताना तिनं ‘सह्य़ाद्री वाहिनी’वरील ‘दमदमादम’ या डान्स शोचं सूत्रसंचालन केलं होतं.
घरातून या सगळ्या अॅक्टिव्हिटीजसाठी सपोर्ट मिळाला. मुलांना या क्षेत्रात येण्यासाठी कोणताही फोर्स केला नाही. तिचा लहान भाऊ निनाद इंजिनीअिरगला असून तो पुढं संतूरमध्ये करिअर करणारेय. ‘अभिनव विद्यालया’त तिला विविध प्रसंगानुरूप नृत्य करायची संधी मिळाली. ती म्हणते की, ‘एस.वाय.ला असताना फिलॉसॉफीचा पेपर नि वर्षांतून एकदाच असणारी अलंकारची परीक्षा क्लॅश होत होती. त्यासंदर्भात एचओडींना जाऊन भेटल्यावर त्यांनी अलंकारची परीक्षा दे, मी तुझी परीक्षा नंतर घेते, असं सांगितलं. दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी माझी परीक्षा घेतली. एस.वाय.च्या वर्षांतच ‘दमदमादम’च्या शूटिंगसाठी महिन्यातले चार दिवस पुणे-मुंबई अपडाऊन करावं लागे. या काळात कॉलेजचं सहकार्य मिळालं. कॉलेजमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी तिला सोलो परफॉर्मन्सची संधी मिळाली.’
तिच्या क्लासमधल्या विद्याíथनी नि पालकांनी तिच्यावर विश्वास ठेवला म्हणून ती शिकवू शकली. मुंबईहून आल्यावर मुलींना भेटून तिला एक प्रकारची ऊर्जा मिळायची. मुंबईत राहताना पुण्यातल्या लोकांना आपल्यासाठी खूप अॅडजस्ट करावं लागतंय, हे तिला कळत होतं. मुंबईत यशस्वी व्हायची खूणगाठ तिनं मनाशी बांधली होती. त्यासाठी जीवतोड मेहनत घेत, वेचता येतील तेवढे ज्ञानकण तिनं वेचले. तेव्हा ती पुण्यात फक्त वीकएण्डला यायची. शनिवारी कनकताईंचा मास्टर्स क्लास संपल्यावर थेट पुणं गाठायची. स्वत:चा क्लास घ्यायची. मग आईच्या क्लासमध्ये जाऊन रात्री घरी परतायची. हे शेडय़ुल तिनं दोन र्वष मॅनेज केलं.
घरच्यांचा तिला सपोर्ट होता तरी त्यांच्यावर तिला अवलंबून राहायचं नव्हतं. मुंबईत पेइंगगेस्ट म्हणून राहणं, प्रवास आदी खर्च होतेच. ती क्लास घ्यायला लागल्यावर बाबांनी तिचं वेगळं अकाऊंट काढून दिलं. सेिव्हगची माहिती दिली. त्याचा तिला या काळात उपयोग झाला. डॉ. कनक रेळे नि इतर प्राध्यापाकांचा तिला खूपच सपोर्ट मिळाल्यानं आईसोबत तिला प्रोग्रॅम्स करता आले. आई-बाबांसोबत ‘राजस सुकुमार’च्या शोसाठी दोन सिंगापूर दौरे केलेत. ‘नालंदा’च्या ‘नृत्योत्सवा’त तिला सोलो परफॉर्मन्सची संधी मिळाली. ‘डीडी सप्तगिरी’ या हैदराबाद दूरदर्शनच्या डान्स शोमध्ये नूपुरच्या ग्रुपचा परफॉरमन्स झाला होता.
नूपुर म्हणते की, ‘आतापर्यंत मी कृष्ण, गणपती, शाहीर, स्वामी विवेकानंद आदी पुरुष-भूमिका केल्यात. तेही आव्हानात्मक असतं. त्याला प्रेक्षकांकडून छान प्रतिसादही मिळतो. आता मला त्याच ताकदीची स्त्री-भूमिका करायची आहे. आई-बाबांमुळं आम्हाला अनेक दिग्गजांच्या सहवासात वावरण्याची संधी मिळाली. एचएमव्हीतर्फे काढण्यात आलेल्या ‘राजस’च्या व्हीसीडीचं प्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन झालं. शिवजी मला लहानपणापासून बघत आल्येत. त्यातील गाण्यांवरचा माझा परफॉर्मन्स बघून ते म्हणाले की, ‘ही नक्की नूपुरच आहे का?’ ही एक छान दाद होती. ती सातवीत असताना ‘एचएमव्ही’तर्फे काढण्यात आलेल्या लता मंगेशकर यांच्या ‘अष्टविनायक गीते’ या व्हीसीडीतील ‘गणराज रंगी नाचतो’ची कोरिओग्राफी आईनं केली होती. मी गणपतीच्या भूमिकेत होते. नंतर कळलं की, लतादीदींनी ते गाणं पाहिल्यावर ‘हिचा चेहरा इतका गोड आहे की, ती कृष्णच वाटत्येय,’ असे उद्गार काढले होते.’
तिनं काही ठिकाणी परीक्षक म्हणूनही काम केलंय. यंदा तिच्या ८ विद्याíथनी नृत्याची परीक्षा देणारेत. ती म्हणते की, ‘शिकवताना आईनं पूर्ण स्वातंत्र्य दिलं. माझे क्लास घे, अशी सक्ती केली नाही. त्यामुळं माझी स्वत:ची ओळख निर्माण झाली. मी विशारद-अलंकार केलं तेव्हाचा अभ्यासक्रम बदलल्यानं तो शिकवताना मीही तो शिकले. माझा अभ्यास मुलींना शिकवताना अधिकाधिक पक्का होत गेला. मुलींना नृत्य शिकण्याची आवड असली तरी पेशन्स कमी आहे. त्यांना नि पालकांना नृत्य हे अंगी मुरावं लागतं. ते इन्स्टंट नाहीये, असं मला समजावावं लागतं. मी क्लासच्या गॅदिरगसह विविध ठिकाणी मुलींना स्टेज परफॉर्मन्सची संधी द्यायचा प्रयत्न करते.’
या डिसेंबरमध्ये ती नेटची परीक्षा देणारेय. पीएच.डी.चाही विचार सुरू आहे. कार्यक्रम नि क्लासेस चालूच राहणारेत. तिनं नॅशनल स्कॉलरशिपची परीक्षाही दिल्येय. ती म्हणते की, ‘आईच्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवंदना म्हणून मी नि:शब्द हा डान्सड्रामा कोरिओग्राफ केला होता. त्याचं बाबांनी दिलेलं म्युझिक केवळ इन्स्ट्रमेंटल होतं. पुढंही मला कोरिओग्राफी करायची आहे.’ गेली दोन र्वष ती ‘सिप्ला कॅन्सर अॅण्ड एडस् सेंटरमध्ये कार्यक्रम करत्येय. शारीरिकदृष्टय़ा मरणयातना भोगणाऱ्या या रुग्णांना मानसिकदृष्टय़ा आनंदी ठेवणं एवढंच आपल्या हातात आहे असं, तिला वाटतं. तिथल्याच काही मुलींनी नृत्य शिकण्याची इच्छा प्रदíशत केली. त्या मुली अनाथ असून तिथं राहून शिकताहेत. नंतर नìसगचा कोर्स करून या रुग्णांची सेवा करणारेत, असं तिला कळलं. त्यांना नृत्य शिकवायला तिला आवडेल. तिनं ‘मातोश्री वृद्धाश्रमा’तही पौराणिक कथांचा परफॉर्मन्स केलाय. नूपुर सांगते की, ‘हे परफॉर्मन्स करताना मिळणारा आनंद पशांपलीकडचा असतो. त्यानं एक प्रकारचं समाधान लाभतं. त्या त्या संस्थांच्या डोंगराएवढय़ा कामात खारीचा वाटा उचलल्याचं समाधान लाभतं..’ तालसुरांचं बोट धरून, ध्येयपूर्तीच्या ओढीला, समाजकार्याची जोड देणाऱ्या नूपुरला ऑल द बेस्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:10 am

Web Title: noopur daithankar in learn and earn
टॅग : Dance,Ladies
Next Stories
1 ‘फॉरेन’चा सिनेमा
2 फंक्शनल मेक-अप
3 बाराखडय़ांची क्रीम्स
Just Now!
X