30 May 2020

News Flash

वनपीस ड्रेस आणि स्कर्टची फॅशन

प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत.

| August 21, 2015 01:16 am

प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न  viva@expressindia.com या मेलवर पाठवा.

हाय, मी वृषाली. मी २७ वर्षांची असून माझी उंची ५’.४’’ तसेच वजन ६० किलो आहे. माझा वर्ण गव्हाळ आहे. मी ऑटोमोबाइल क्षेत्रात काम करत आहे. मला बाहेरगावी जाण्यासाठी वनपीस ड्रेसेस तसेच स्कर्ट्स वापरून बघायचे आहेत. त्यासाठी मला काही पर्याय सुचवा.

हाय वृषाली,
मुळात तुझी उंची चांगली आहे अन तुझा वर्ण गव्हाळ आहे. या दोन अतिशय उत्तम गोष्टी आहेत. गव्हाळ वर्णावर कोणतेही रंग अगदी छान उठून दिसतात. त्यामुळे कोणतेही आवडते रंग तू बिनधास्त वापरू शकतेस. मला स्वत:ला वनपीस ड्रेसेस आवडतात. त्यांनी खूप छान एलिगंट आणि फेमिनाईन लुक मिळतो. तुझी उंची आणि वजन बघता तू नक्कीच वनपीस ड्रेसेस वापरू शकतेस. वनपीस ड्रेसेस खरेदी करताना काही टिप्स नक्कीच लक्षात ठेव. खूप घट्ट किंवा अगदी सल ड्रेसेस निवडू नको. घट्ट वनपीस ड्रेस अंगाला चिकटेल आणि तू काहीशी ओव्हरवेट असल्याने ते अगदी विचित्र दिसेल. तसेच खूप लूज वनपीस ड्रेस असेल तर त्यात तू अजूनच जाड आणि बेढब दिसशील. तू जो ड्रेस निवडशील तो कमरेपर्यंत फिटेड आणि त्याखाली काहीसा लूज असा असू दे. याशिवाय तू सेमीफिटेड ड्रेससुद्धा निवडू शकतेस. शिफ्ट ड्रेस तुझ्या बॉडी टाईपसाठी एकदम बेस्ट ठरेल. शिफ्ट ड्रेस खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत सरळ असतो. वेस्ट, हिपच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जॉइंट्स त्याला नसतात त्यामुळे पोट पुढे आलंय किंवा वळ्या दिसत नाहीत.
कपडय़ांच्या प्रकाराबरोबरच लेंथ खूप महत्त्वाची आहे. जर तुझे पाय बारीक असतील तर काफ लेंथ स्कर्ट आणि वेस्ट लेन्थ टॉप हे खूपच छान दिसेल. व्हाइट, बेज कलर्समधील लिनन किंवा कॉटनचे वनपीस ड्रेसेस तुला खूप छान दिसतील. तसंच ऑरेंज, हॉट िपक, केली ग्रीन हे कलर्स खूप उठावदार दिसतील. ब्लॅक कलर तर कधीही बेस्ट असतो.
या ड्रेसेसच्या बरोबरीने तू फुटवेअरमध्ये वेजेस किंवा मीडियम हिल्स घालू शकशील. एखाद्या फॉर्मल ऑकेजनसाठी किंवा इतर काही कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार असलीस तर स्टीलेटोज घेऊन जा. एखादा सुंदर नेकपीस किंवा छानसे मोठे कानातले नाही तर डेलिकेट पेंडंट वापरून तू लुक आणखी बहारदार करू शकतेस. एखादा छानसा स्कार्फ किंवा पश्मिना शॉलसुद्धा तू ड्रेसेस बरोबर वापरू शकतेस. त्याच बरोबर नॉर्मल वेअरसाठी तू स्लिम फिट जीन्स किंवा पँट्स वापरू शकतेस. तसंच एखादा मस्त व्हाइट शर्ट आणि त्या बरोबर एखादा टॅन बेल्ट हेसुद्धा तुझ्यावर खूप उठून दिसेल आणि ऑफिससाठी तू हे वापरू शकशील.

एन्जॉय युअर न्यू लुक्स!

अनुवाद : प्राची परांजपे
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2015 1:16 am

Web Title: one peace cloths
Next Stories
1 अभिव्यक्ती स्वातंत्र्याची..
2 सिस्टम
3 मी डोलकर
Just Now!
X