होळीच्या रंग-गुलालामध्ये अनेकदा रसायनं मिसळलेली असतात. त्यांचा दुष्परिणाम त्वचा आणि केसांवर होऊ शकतो. हा दुष्परिणाम टाळण्यासाठीचे उपाय सांगताहेत, ओरिफ्लेम इंडियाच्या ब्युटी आणि मेकअप स्पेशालिस्ट आकृती कोचर.

रंगपंचमी खेळायला जायच्या कमीत कमी २० मिनिटं आधी सनस्क्रिन आणि मॉश्चराईझर लावावं. एसपीएफ १५ किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या सनस्क्रिनचा वापर त्वचेच्या संवेदनशीलतेचा विचार करून करावा.
चेहरा आणि हातावर ऑलिव्ह, खोबरेल, बदाम किंवा मोहरीचं तेल लावावं.
केसांना ऑलिव्ह, तीळ किंवा खोबरेल तेलाचा मसाज केल्यास त्यांचा रसायनं, धुळीपासून बचाव होईल. नंतर रंग काढायला सोपं जाईल.
ओठांना लिप बाम लावा.
माफक मेकअप करता येऊ शकेल. हलकीशी आयपेन्सिल वापरता येईल. पण अगदी समरसून रंगपंचमी खेळणार असाल तर मेकअप न केलेलाच बरा.
नखांना नेलपॉलिश लावावं.
आपण वापरत असलेले रंग नसíगक असावेत.
रंगून आल्यावर रंग घालवण्यासाठी वाटेल तो साबण वापरू नका. चेहऱ्यावरही लगेच साबण लावू नका. कारण साबणातल्या अल्केलाइनमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. त्याऐवजी क्लिनसिंग क्रीम किंवा लोशनचा वापर करा. त्यामुळे त्वचा मऊसूत राहील. त्वचेला हलकंसं मालीश करून ती सुती कपडय़ानं साफ करा.
रंग काढण्यासाठी तेलही वापरता येऊ शकतं. तेल लावल्यामुळे रंग तर निघेलच, शिवाय त्वचेचा पोतही नीट राहील.
केस धुवायच्या आधी केसांवर खूप पाणी ओता. म्हणजे कोरडा रंग आणि अभ्रकाचे छोटे तुकडे निघून जातील. त्यानंतर हर्बल श्ॉम्पू हलक्या हातानं डोक्याला, केसांना लावा. मग पाण्यानं केस धुवा.
शॅम्पू केल्यानंतर मगभर पाण्यात िलबाचा रस मिसळून पुन्हा केस धुवा. यामुळे केसांच्या मुळांशी असलेलं अ‍ॅसिड निघून जाईल.
केस मऊसूत राहण्यासाठी आवळा पावडर, उकळत्या पाण्यात घातलेली शिकेकाई पावडरीचाही उपयोग होऊ शकतो. शिवाय मेंदी पावडर, चार चमचे लिंबाचा रस आणि दह्याचं मिश्रण तासभर केसांना लावून नंतर ते धुता येतील.