News Flash

मिल रहे हैं, ब्रेक के बाद…

‘सुट्टी संपताना काय वाटतंय..’ असा लेखाचा विषय मिळाला खरा. पण म्हटलं यावर काय लिहिणार बुवा? कारण खरंच आपल्याला माहीत असतं का की सुट्टी संपताना आपल्याला

| May 31, 2013 12:40 pm


‘सुट्टी संपताना काय वाटतंय..’ असा लेखाचा विषय मिळाला खरा. पण म्हटलं यावर काय लिहिणार बुवा? कारण खरंच आपल्याला माहीत असतं का की सुट्टी संपताना आपल्याला काय वाटतंय ते?  म्हणजे बघा की, सुट्टी सुरू होताना कसं शेवटचा पेपर देऊन झाल्यावर ‘सुटलो..’चं फििलग मनात असतं. जोरदार सेलिब्रेशननं ते जनात दाखवता येतं. मग आपली सुट्टी सुरू होते. ढेर सारे प्लॅनिंग्जपकी काही प्लॅन्स तर जाम क्लिक होतात. त्यामुळं सुट्टीच पाहिजे असं वाटायला लागतं खरं, पण मध्येच ‘आब्रा ऽऽऽ का डाब्राऽऽऽ’ होतं. अर्थात मन काहीतरी वेगळं सांगू लागतं की केवढी ही सुट्टी..
आता कॉलेज कधी सुरू होणार.. अशा वेळी ‘मन तळ्यात.. मन मळ्यात’ची अवस्था न झाली तरच नवल..
कसं आहे ना फ्रेण्ड्स की, आता जॉब करणाऱ्या ताई-दादांच्या काळातली गोष्ट ओके होती. ते कॉलेज संपल्यावर दोन महिने फारसे भेटतच नसत. तेव्हा आपल्यासारखे हातोहात मोबाइल्स अजिबात नव्हते. अगदीच नोट्स किंवा परीक्षेतल्या ‘आयएमपीज’बद्दल विचारायचं झालं तर ते लॅण्डलाइनचा सहारा घेत असत. फार तर पेपरच्या शेवटच्या दिवशीच कुठं वन डे जायचं किंवा कुणाच्या घरी धुमाकूळ घालायचा हे ठरवत नि तसं करत. बाकीची सुट्टी शिस्तीत मामाच्या गावाला जाऊन, फार तर लोणावळ्याला जाऊन आणि सोसायटीतल्या ग्रुपसोबत सुट्टी एन्जॉय करायची आणि मग उत्सुकतेनं रिझल्ट नि मागोमाग कॉलेज सुरू व्हायची वाट पाहायची. आपल्या ताई-दादांच्या नॉस्टॅल्जिक बोलण्यातून या गोष्टी आपल्याला अनेकदा कळतात.  
पण फ्रेण्ड्स, आपुन लोगों की तो बात ही अलग हैं. ‘दीवार’मधल्या डायलॉगची कॉपी-पेस्ट करायची झाली तर ‘अब हमारे पास मोबाइल हैं, टॅब हैं, नेट कनेक्शन हैं, पॉकेट का वेट बढानावाला मनी हैं.. तुम्हारे पास क्या है..’ याचंही उत्तर आपणच देऊन टाकतो की ‘हमारे पास फ्रेण्ड्स भी हैं.’ या मित्रमंडळींसोबत ही सुट्टी आपण फुल टू एन्जॉय करतो. हे फ्रेण्ड सर्कल बऱ्याचदा कॉलेजमधलंच असतं. त्यामुळं आपल्या ताई-दादांसारखं आपण मित्रमंडळींना मिस करत नाही. सुट्टीत आपला कंपू कितीतरी अ‍ॅक्टिव्हिटी करतो. मॅकमधली खादाडी, मॉल्समधली मस्ती, पार्कातल्या राऊंड्स, बीचवरचं भटकणं, शॉर्ट टर्म कोस्रेस करणं, घरादारातली फंक्शन्स अटेंड करणं, आऊटिंग वगरे वगरे. काही वेळा प्रत्यक्ष भेटणं शक्य नसतं तरी एसएमएस, वुई चॅट, सोशल साईट्स असे कमी खर्चीक पर्याय शोधून काढून आपण कॉण्टॅक्टमध्ये राहतोच. त्यामुळं आपला ग्रुप कॉलेजमध्ये कधी एकदाचा भेटतोय, असं फारसं वाटत नाही.    

यथावकाश रिझल्टचा दिवसही उजाडतो. एकेक सब्जेक्टमधले दिवे पेटतात अथवा विझतात.. आपापला क्लास मिळतो.. त्या रिझल्टचं शेअिरग स्टेट्स अपडेट करून केलं जातं नि उर्वरित जगाला लवकरच कॉलेज सुरू होणार हो.. अशी बातमी समजते. तसा कॉलेजविश्वाविषयीच्या गप्पांना ऊत येतो. अजून काही बोर्डाचा दहावीचा रिझल्ट लागायचा असल्यानं हे होऊ घातलेले कॉलेजिअन्स थोडे टेन्स आहेत. त्यांना त्यांचे सीनिअर्स धीर देताहेत. ऑनलाइन अ‍ॅडमिशनविषयी टिप्स देताहेत. तर बारावीतून एफ.वाय.ला जाणारे आतापासूनच भल्या सकाळी उठून मॉìनग लेक्चर्स अटेंड करण्याची नेट प्रॅक्टिस करताहेत. लेक्चर अटेंड न करण्याचे इरादे जाहीर करणाऱ्या दांडीबहाद्दरांना ब्लॅक लिस्टचा बागुलबुवा दाखवला जातोय. तर सीनिअर्स यंदा कोणत्या मंडळांत अ‍ॅक्टिव्ह व्हायचं नि ज्युनिअर्सना कसं तयार करायचं वगरे बेत आखत असतात. मात्र लास्ट इयरची मंडळी मात्र आताच थोडीथोडी सेंटी होऊ लागतात. आता कॉलेज संपणार ही फिलिंग त्यांना उदास करते. आपल्या कॉलेजनंतर विस्तारणाऱ्या विश्वात आपला निभाव कसा लागेल, असं त्यांना वाटतं. अशा वेळी त्यांचे ज्युनिअर्स त्यांना समजावतात. मग हे बडे-छोटे मिया आपापली कॉलेज एंट्री कशी दणक्यात होईल, याचे प्लॅन्स आखतात. ते मात्र इथं सांगणार नाही, कारण मग सगळं ओम फऽऽऽस्स् होईल.. या प्लॅन्ससोबतच कॉलेजच्या नव्या वर्षांसाठीचे नवे संकल्प आणि खरेदीसाठी घरी मस्का लावणं सुरू होतं. हळूहळू फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोडवरची हजेरी वाढू लागते. लेटेस्ट फॅशन गपगुमान फॉलो करणारे नि हटके स्टाइल करणारे अशा सगळ्यांचीच या स्ट्रीटवर नि मॉल्समध्ये चलती होते.
आपल्या सगळ्या प्लॅन्सचा ‘त्याला’ कसा काय सुगावा लागतो ते कळत नाही.. ‘त्याला’ कोण एसएमएस करतं ते कळत नाही.. पण आपण कॉलेजमध्ये पाऊल ठेवल्यावर तो हमखास आपल्याला वेलकम करायला नि ऑल द बेस्ट म्हणायला हजर असतो. ‘हा’ दरवर्षी नव्यानं मोठय़ा मित्रत्वानं आपल्याला कडकडून भेटतो. ‘पावसा’सारख्या आवडत्या मित्राला भेटल्यावर भटाकडचा कटिंग नि भज्यांचा फडशा पाडणं हे काम ओघानं करावंच लागतं.. हे करतानाच व्यवस्थित अभ्यास करणं आणि करिअर ग्राफ उंचावण्यालाही तेवढंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे, हे लक्षात ठेवायला हवं. सुट्टीतला फन आणि फिटनेस एन्जॉय करता करताच अभ्यासात अजिबात फेऽऽऽफे उडायला नको.. म्हणजे मग सुट्टी संपताना काय वाटतंय.. असे प्रश्न पडणारच नाहीत. सुट्टी नि अभ्यास हे दोन्ही असायलाच पाहिजे, याविषयी मेजॉरिटीचा होकार आहे. तो, अभी हम कॉलेज में मिल रहे हैं, छोटेसे ब्रेक के बाद.. सगळ्यांना ऑल दी बेस्ट.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:40 pm

Web Title: summer vacation is getting over
टॅग : College
Next Stories
1 ‘ई अभिव्यक्ती’चा सेतू..
2 शुभ-रात्र
3 लर्न अ‍ॅण्ड अर्न : राजश्रीचा खो..
Just Now!
X