भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग इतके व्हायब्रंट आहेत, की या तीन रंगाचा मेक-अपमध्ये वापर करून स्वातंत्र्यदिनाचा हटके लुक पूर्ण करता येईल. ओरिफ्लेम इंडियाच्या मेक-अप आणि ब्युटी एक्स्पर्ट आकृती कोचर यांनी डोळ्याच्या तिरंगी मेक-अपसंदर्भात दिलेल्या काही टिप्स :
सुरुवातीला थोडं कन्सीलर आणि पावडर लावून डोळ्यांच्या वरचा आणि खालचा भाग मेक-अपसाठी तयार करावा. यामुळे डोळ्यांचा मेक-अप उठून दिसेल आणि लवकर खराब होणार नाही. केशरी रंगाची आयश्ॉडो घेऊन ती पापण्यांच्या वरच्या भागात लावावी. ही शेड केवळ आतल्या एक तृतीयांश भागावरच लावायची आणि पसरवायची आहे. त्यानंतर आयश्ॉडोची हिरवी शेड घेऊन ती डोळ्याच्या वरच्या भागात (बाहेरच्या एक तृतीयांश भागात) व्यवस्थित लावावी. डोळ्याच्या कडेपर्यंत ही शेड लागली पाहिजे. रंगाची शार्प लाइन दिसायला नको. आता पांढऱ्या रंगाची आयश्ॉडो घेऊन ती मधल्या भागात हळूवारपणे लावावी. अशा प्रकारे तुमचा तिरंगी आयश्ॉडो मेक-अप तयार झाला. यामध्ये डोळ्यांचा मधला भाग हायलाइट झाल्याने डोळे छान मोठे दिसतात. भुवयांच्या कमानीला थोडं हायलायटरनं उठाव द्या. फ्लफी ब्रश घेऊन रंगाच्या कडा अस्पष्ट करा. तीन रंगांचे तीन भाग दिसता कामा नयेत. ते एकमेकांमध्ये बेमालूमपणे उठून दिसले पाहिजेत. शेवटी भुवयांना अँग्युलर ब्रशच्या साहाय्याने डार्क ब्राऊन आयश्ॉडो लावा. त्यामुळे संपूर्ण डोळ्याचा मेक-अप उठून दिसेल.
यापेक्षा वेगळा लुक हवा असेल तर नेहमी आपण वेगवेगळ्या रंगांच्या आयशॅडो वापरतो तसाच मेक-अप करता येईल. फक्त तिरंग्याच्या तीन शेड यासाठी वापराव्या लागतील.
viva.loksatta@gmail.com