फ्रेण्डस्, नवरात्राच्या सेलिब्रेशनची धूम केव्हाच मागं पडल्येय. अनेकांच्या एक्झाम्स नि सबमिशन्स आटोपल्यात किंवा काहींच्या एक्झाम्स सुरू आहेत. आता सगळ्यांना वेध लागलेत ते दिवाळीच्या सेलिब्रेशनचे. मात्र या सेलिब्रेशन मूडमध्येही समाजहिताचा विचार करायला प्राधान्य देणं अतिशय गरजेचं आहे. कारण विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्यांनी सखोल आणि सांगोपांग विचार करून मतदान करायचं आहे. त्यामुळं ही निवडणूक लढवताना महागाई, शिक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, धोरणांचा अभाव, आदी मुद्दय़ांचा प्राधान्यानं समावेश असावा, असं अनेकांना वाटतंय. मतदानावर काहींच्या मते सोशल नेटवर्किंग साइटवरचा प्रचार, मोबाइलवरचे प्रचारकी संदेश, टीव्ही/ वृत्तपत्रादी प्रसारमाध्यमातून होणाऱ्या चर्चा, गट फिलिंग, कुटुंबातील विचारसरणी या बाबींचा प्रभाव नक्कीच असेल. तर काहीजण मात्र या सगळ्याचा विचार करून त्याखेरीज उमेदवाराचं शिक्षण, त्याचं काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही ना असा सखोल विचार करून प्रथम उमेदवार आणि नंतर पक्ष असा विचार करताहेत. केवळ योग्य मतदान करून सरकार निवडून दिलं म्हणजे जबाबदारी संपली, असं होत नाही. तर सुजाण नागरिकांचं कर्तव्यही आपण बजावायला हवं, अशी कळकळही काहींना वाटते.  
या संदर्भातली ही काही प्रातिनिधिक मतं.  

वीरेन वेसुवाला
vv09एका विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी माझं मत मांडतोय. माझ्या मते शिक्षणात परिवर्तन होणं, हा मुद्दा या विधानसभेच्    या निवडणुकांत महत्त्वाचा वाटतो. आजच्या सोशल मीडियाच्या काळात मॅनेजमेंट आणि मीडिया स्टडीज या क्षेत्रात लेस थिअरी अ‍ॅण्ड मोअर प्रॅक्टिकल एक्सपोजरचा फॉम्र्युला आपल्या नेत्यांनी विधानसभेत मांडावा, असं मला कळकळीनं सांगावंसं वाटतं. सोशल मीडियाच्या मदतीनं आपल्या नेत्यांच्या कामाचा अहवाल, त्यांचा आपल्या क्षेत्राच्या विकासाचा अजेंडा काय आहे, या कम्पॅरिटिव्ह अ‍ॅनालिसिसमध्ये फेसबुक नि व्हॉटस् अप या माध्यमाचा सर्वात जास्त प्रभाव आहे, असं मला वाटतं.

श्रद्धा शेलार
vv09rमाझ्या मते या निवडणुकीतही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महागाईचा. महागाई सर्वसामान्य माणसाला जगू देत नाहीये. का म्हणून सरकारी कर्जाचा सामान्य माणसाला भरुदड पडावा? महागाईचं सरकारनं काही तरी करायला हवं, असं म्हणतानाच सरकार तरी काय करणार? हा प्रश्न पडतो हे खरं. त्यावर उपाय म्हणजे योग्य मत देऊन योग्य सरकार निवडल्यास कदाचित आपले अनेक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. मला माझ्या मतावर प्रभावी ठरणारी गोष्ट वाटते, ती म्हणजे फ्रेण्डस् नि फॅमिलीमध्ये होणारं डिस्कशन. त्यात आपण आपल्या जवळच्या लोकांशी मनमोकळेपणानं आपली मतं व्यक्त करू शकतो. आपल्याहून मोठय़ा नि अनुभवी माणसांकडून भरपूर नॉलेज मिळवू शकतो. फक्त इतकंच की, आपण निवडणुकीबद्दल थोडासा इंटरेस्ट दाखवायला हवा. खरंच आपल्याला आपल्या देशाचं-राज्याचं भलं झालेलं बघायचं असेल, तर फक्त सरकार नाही तर आपणही सुजाण नागरिक होऊन, मतदानाद्वारे ही जबाबदारी स्वीकारायला हवी.

हर्षद चौलकर
vv09rrविधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महागाई हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. गरिबांना न परवडणारी महागाई कमी व्हायलाच हवी. तशीच दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची. त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सगळ्या घटकांचा विचार करून आपल्या अन्नदात्याला आत्महत्या करण्यापासून रोखायला हवं. शिवाय शिक्षण आहे तर सारं काही आहे, हा विचार करून गरिबांपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचायला हव्यात. खेडोपाडय़ापर्यंत शिक्षणाचा लाभ सगळ्यांना घेता यायला हवा. कारण सगळ्यांनाच चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. आणखी एक महत्त्वाचा हक्क आहे मतदानाचा. विविध माध्यमांत चालणाऱ्या सगळ्या चर्चा मी ऐकतो, वाचतो, बघतो. पण त्यावर सारासार विचार करूनच मी मतदान करेन.   

सुजया देशपांडे
vv09rrrनिवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकारण्यांची त्रेधातिरपीट उडालेय. स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात पितृपक्षात उमेदवारी अर्ज भरायला कुणी आला नाही. त्यानंतर वर्षांनुर्वष एकत्र असणारे पक्ष क्षणार्धात वेगळे झाले. सत्ता मिळवणं नि मुख्यमंत्रिपद भूषवणं हाच या सर्व पक्षांचा अजेंडा. खरंतर महाराष्ट्र सर्वसंपन्न राज्य. पण त्याचा म्हणावा तितका विकास कधी झालाच नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नि धोरणात्मक त्रुटीमुळं सगळा कारभार लालफितीत अडकला. इथल्या भूमिपुत्रांना स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय, याहून शरमेची बाब काय असावी? शिक्षणक्षेत्राचा उडालेला बोजवारा नि नोकऱ्यांसाठी होणारी वणवण, हे सारं कमी पडलं म्हणून राजकीय पक्ष खिरापतीसारखं आरक्षण वाटून स्वत:ची पोळी भाजायचा प्रयत्न करत आहेत, मूळ विकासाचा प्रश्न बाजूला सारून. वृत्तपत्र-टीव्हीपासून ते सोशल साइट्सपर्यंत सगळीकडं अगदी वीट येईपर्यंत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण महाराष्ट्राच्या सुज्ञ नागरिकांच्या मनातील महाराष्ट्राचा खरा वाली कोण, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

प्रीती पारगांवकर
vv09rrrrrमाझ्या मते एज्युकेशन हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. शिक्षणच सगळ्यांना मार्ग दाखवू शकतं. एज्युकेशन मेकस् ह्य़ुमन वाईज इनफ टू ग्रो टुवर्डस् डेव्हलपमेंट. सोशल नेटवìकग साइटवरचा प्रचार, मोबाइलवरचे प्रचारकी संदेश, टीव्ही-वृत्तपत्रांदी प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या चर्चा, गट फििलग, कुटुंबातली विचारसरणी या सगळ्या गोष्टींमुळं माझ्या मतावर फरक पडणार नाही. मी या सगळ्या गोष्टी ऐकेन, वाचेन, बघेन. पण त्यामुळं माझ्या मताच्या निर्णयात बदल होणार नाही. कारण उमेदवाराला मत देताना, त्याचं शिक्षण किती आहे नि त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही ना, हे तपासणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर त्यानं केलेल्या कामाचा विचार करून मत द्यायचा निर्णय घेईन.

सौरभ आसेगांवकर
vv09rrrrयंदाची निवडणूक चौरंगी होत असल्यानं नक्कीच रंगतदार होणार. कुठल्याही पुरोगामी राष्ट्रीय आकडेवारीत महाराष्ट्राचा वाटा पहिल्या तीन क्रमांकांमध्ये असतो. तरीही महाराष्ट्राच्या भूमिपुत्रावर आत्महत्येची नामुष्की यावी, यासारखं दुर्दैव अजून कोणतं? ही निवडणूक भूमिपुत्रांच्या सशक्तीकरणावर लढवणं, हे या योगे कोणत्याही राजकीय पक्षाचं आपसूकच पहिलं धोरण असावं.
मतदानासाठी योग्य उमेदवाराचा शोध सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केलेल्या पोस्टनं अभावानेच संपतो. प्रथितयश तज्ज्ञांच्या प्रसारमाध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा, तसंच ‘लोकसत्ता’सारख्या नामवंत वृत्तपत्रांतील रविवारच्या पुरवण्यांमधील राजकीय विश्लेषकांचे लेख हेच मला अंतिम निवडीसाठी योग्य वाटतात.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.