खुलला खरेदीचा श्रावण

गिफ्टिंगच्या दृष्टीने मेकअप किट, सस्टेनेबल प्रॉडक्ट्स आणि परफ्युम्स तुम्ही भेट देऊ शकता.

गायत्री हसबनीस viva@expressindia.com
पावसाच्या सरी बऱ्यापैकी सक्रिय असल्या तरी आता पाऊस बराचसा कमी झाला आहे आणि सध्या दुकाने-मॉलवरील निर्बंधही शिथिल झाले आहेत. त्यामुळे येत्या फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने घराबाहेर पडून भेटवस्तूंची खरेदी करण्याला हळूहळू उधाण येईलच, नव्हे आलेच आहे! रक्षाबंधनाची तयारी तर जोमात सुरू आहे. एकापाठोपाठ येणाऱ्या सणांच्या निमित्ताने आपल्या दोस्तांना आणि नातेवाईकांना आपण काय भेटवस्तू देऊ शकतो आणि स्वत:साठी काय काय खरेदी करू शकतो? याची तरुणाईत चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या लोकांची आवडनिवड कशी असेल? लोक नक्की खरेदीसाठी कुठल्या कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतील हे तपासून बघण्याची हीच योग्य वेळ आहे.

घडय़ाळांना मागणी

बऱ्याच शॉपिंग ट्रेण्ड्सप्रमाणे घडय़ाळांच्या खरेदीला दागिन्यांच्या खरेदीएवढी क्रेझ निर्माण झाली आहे. आजकालच्या तरुणांना तुमचा आवडता ब्रॅण्ड कोणता? असं विचारलं तर ते ‘डॅनियल वेलिंग्टन’ हाच सांगतील किंवा ‘फास्टट्रॅक’. पूर्वी काहीशी फास्टट्रॅक च्या प्रेमात असलेली तरुणाई आपल्याकडे एखादं ‘टायटन’चं घडय़ाळ असावं अशा स्वप्नात रमायची. आता मात्र ते ‘डॅनियल वेलिंग्टन’चे घडय़ाळच हवे अशी अपेक्षा व्यक्त करताना दिसतात. अर्थातच, या ब्रॅण्डचा र्बगडी रंग आकर्षक आहे, काळा तर त्याहूनही जास्त. ‘डॅनियल वेलिंग्टन’चे ‘विच रोझ गोल्ड वॉच’ तुमच्या खिशाला बऱ्यापैकी परवडू शकेल असे आहे. त्याची किंमत दोन हजारपासून सुरू  होते, तर ‘पेटीट मेलरोझ’ या घडय़ाळाची किं मत बारा हजारांपासून सुरू  होते. मुलांसाठी सिल्व्हर तर मुलींकरता गोल्ड वॉचेसमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. सध्या घडय़ाळांचे झपाटय़ाने बदलत जाणारे ट्रेण्ड्स थोडेसे गोंधळात टाकणारे वाटू शकतील. यासाठी टाटा क्लिक, मिन्त्रा, शॉपर्स स्टॉपसारख्या अधिकृत लिंकवरची खरेदी उपयुक्त ठरेल. तिथे तुम्हाला ‘रियलमी’, ‘बोट’, ‘फॉसिल’, ‘रोडस्टर’, ‘डॅनियल क्लईन’, ‘मॅरी क्लेअर’ या ब्रॅण्ड्सचे अफलातून वॉचेस मिळतील तेही रिझनेबल रेट्समध्ये. तुम्हाला ऑफलाइन खरेदी करायची असेल तर फोर्ट, बांद्रा, लोअर परेल, सांताक्रूझ, कुर्ला, सीवूड्स अशा ठिकाणी खरेदी करू शकता. येत्या रक्षाबंधनाला भावाबहिणीचे नाते अजून खुलवण्यासाठी एखादं स्टायलिश घडय़ाळ नक्की भेट द्या.

ब्युटी प्रॉडक्ट्स

गिफ्टिंगच्या दृष्टीने मेकअप किट, सस्टेनेबल प्रॉडक्ट्स आणि परफ्युम्स तुम्ही भेट देऊ शकता. मेकअपचे बरेच गिफ्टिंग ट्रेण्ड्स हे न्यू इयरला येतात, परंतु यंदा सणासमारंभानादेखील खासकरून येणाऱ्या लग्नसराईच्या निमित्ताने मेकअप ट्रेण्ड्स डोकं वर काढून आहेत. तरुणाईचा हल्ली पर्सनल केअरवर अधिक भर असतो त्यामुळे जेल, लिप बाम, क्लिन्सर, ऑइल, सिरम असे प्रॉडक्ट्सही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. ‘एनरिच’ या ब्रॅण्डतर्फे ‘बॉर्न एथिकल’ मार्फत क्लिन्सर,डेक्रीम, ब्राइटनिंगअंतर्गत नाईट सीरम, पोअर प्युरिफाईंग, स्कीन कम्फर्टिग व युथ रीप्लेनिशचा समावेश आहे, जे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. याशिवाय आयलायनर, लिपस्टिकमध्ये ‘नायका’वर विविध सवलती उपलब्ध आहेत.

होम डेकोर

आजचा जमाना आहे तो डेकोरेटिव्ह आयट्म्सचा. त्यामुळे होम डेकोरला पर्याय नाही. अगदी छोटय़ा-मोठय़ा शोकेसपासून गिफ्टिंगचे अनेक पर्याय सध्या खुले आहेत. सध्याचा सणासुदीचा माहौल पाहता घरसजावटीला अनेक जण प्राधान्य देताना दिसतात. रक्षाबंधनाच्या दिवशीही होम डेकोर वस्तूंची गिफ्टिंगसाठी खरेदी के ली जात आहे. छोटय़ा शोकेसचा विचार क रता टेबल डेकोर ते वॉल आर्टपर्यंत अनेक पर्याय आहेत. तर मध्यम किंवा मोठय़ा शोकेसमध्ये वॉल शेल्फ्स आणि मिरर म्हणजे डेकोरेटिव्ह आरसे आहेत. सध्या हॅण्डक्राफ्ट डिझाइनची क्रेझ असल्याने मेटलसारख्या मटेरियलपासून बनवलेल्या होम डेकोरची सध्या चलती आहे. ‘वेदास एक्स्पोर्ट’ यांनी असेच होम डेकोर प्रॉडक्ट्स बाजारात आणले आहेत. येत्या फेस्टिव्ह सीझनला पूजेचा सेटअप ठेवण्यासाठी किंवा अगदी पाहुणे येणार म्हणून घर सजावटीकरता, तुमचे ऑफिस, तुमचे डेस्क सजवण्याकरता हे होम डेकोर तुम्ही घेऊ शकता. याशिवाय, ऑफलाइन खरेदीचे पर्यायही सर्वत्र उपलब्ध आहेत. तरुणाई प्राधान्याने ऑनलाइन खरेदी करत असल्याने मिन्त्रा किंवा एली डेकोरसारख्या वेबसाइट्सवर गर्दी होऊ लागली आहे. होम डेकोरमध्ये अगदी चारशे-पाचशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत वस्तू उपलब्ध आहेत. स्टडी टेबलवरचे साहित्य, तोरणं, दिवे, बॉन्सायचे झाड, डेकोरेटिव्ह प्लान्ट्स, फोटोफ्रेम्स, दरवाजाभोवतीचे लटकन, लॅम्प्स, मातीची भांडी अशी बरीच खरेदी करता येते.

ज्वेलरी

सध्या बऱ्यापैकी युनिसेक्स ज्वेलरीचा ट्रेण्ड आहे त्यामुळे मुलांसाठी वेगळं आणि मुलींसाठी वेगळं असं काहीच राहिलेलं नाही. सगळे जण रुटीन, कॅज्युअल ज्वेलरीला प्राधान्य देतात. उदाहरणार्थ, नोझ रिंग, अंगठय़ा, ईअररिंग्स (ईअरिंग बड्स), चोकर, चेन नेकलेस अशी ज्वेलरी ही टॉप लिस्टवर आहे. गोल्ड, डायमंड किंवा सिल्व्हर दागिने घ्यायचे असतील तर ‘तनिष्क’, ‘कॅरेटलेन’, ‘जिव्हा ज्वेलरी’, ‘फ्लिपकार्ट’, ‘अ‍ॅमेझॉन’ या साइट्सवर नक्कीच स्वस्त आणि लम्प सम किमतीत उपलब्ध आहेत. तर कॅज्युअल आणि हटके ज्वेलरी गिफ्ट करायच्या असतील तर ‘अरबॅनिक’, ‘कॅरेटलेन’, ‘अजियो’ ‘अलिबाबा’, ‘मिन्त्रा’ अशा सर्व साइट्सवर उपलब्ध आहेत. यांची किंमतही रुपये १०० ते रुपये १३,००० पर्यंत अशी आहे. रिलायन्स ज्वेल्सचे ‘आभार कलेक्शन’ सध्या लॉन्च झाले आहे. रक्षाबंधनाला तसेच पुढे येणाऱ्या अनेक सणांसाठी या कलेक्शनमध्ये बरेच पर्याय भेटवस्तू म्हणून देण्यासाठी उपलब्ध आहेत. ‘#रिश्तोंकाधागा’ या संकल्पनेंतर्गत यंदाचे हे नवीन कलेक्शन तरकशी, मॅक्राम आणि विणकाम यांपासून तयार केले आहे. यात फुलांचे गुच्छेदार, नक्षीदार, टॉप अ‍ॅण्ड ड्रॉप, लटकन, झुमके, कुडय़ा आणि चांदबाली अशा पारंपरिक आणि समकालीन डिझाइन्स आहेत. १ सप्टेंबपर्यंत खास ऑफर असून ज्यात सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर २० टक्के सूट आहे.  हे कलेक्शन शोरूम, शॉप-इन-शॉप आणि रिलायन्स ज्वेल्स वेबसाइटवर उपलब्ध आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास पर्सनलाइज्ड प्लान्ट्स

यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही पर्सनलाइज्ड गिफ्टसचा नक्कीच विचार करत असाल, त्यात मग्स, चॉकलेट्स, फोटोफ्रेम्स, टी-शर्टस, राख्या, कूशन्स इत्यादी गोष्टी भेट म्हणून देणार असालच. परंतु सध्या एक वेगळा आणि हटके ट्रेण्ड आला आहे तो म्हणजे पर्सनलाइज्ड प्लान्ट्सचा. तुम्ही पर्सनलाइज्ड प्लान्ट्सच्या माध्यमातून बहिणीवरील प्रेम व्यक्त करू शकता. डेकोरेटिव्ह वासवर ‘सिस’, ‘आय लव्ह माय सिस्टर’, ‘ऑसम सिस्टर’, ‘सुपर सिस्टर’, ‘वल्र्ड्स बेस्ट सिस्टर’ असे स्लोगन्स किंवा तुमच्या आवडती वाक्यं लिहून पर्सनलाइज्ड करून घेऊ शकता. तसे वास आणि प्लान्ट्स हे ऑनलाइनही उपलब्ध आहेत, ज्याची किंमत हजारांच्या घरात आहे. त्यात बांबू, मनी प्लान्ट, जेड प्लान्ट, अग्लेनेमा यांची क्रेझ आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about shopping shopping priority methods online shopping zws

ताज्या बातम्या