गायत्री हसबनीस

फेब्रुवारी अर्थात प्रेमाचा महिना. वेगळं त्याबद्दल काहीच सांगायला नको. भेटवस्तू, फुलांचा गुच्छ, चॉकलेट्स, एखादी डायमंड रिंग वगैरे वगैरे. त्यामुळे यांचा बाजारात काही प्रवेश नसेल असे मुळी होणारच नाही. त्यामुळे तरुण अवलींना आपल्या लाडक्या व्हॅलेंटाइनला या वर्षी काय बरं द्यायचं असा जर कोणता प्रश्न भेडसावत असेल तर व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ई-बाजारापासून सगळीकडेच तुम्हाला विविध पर्याय दिसतील. यंदाच्या काही खास गुलाबी प्रेमाच्या भेटवस्तूंवर एक नजर टाकू या.

* व्हॅलेंटाइन वीक सुरू झाल्याने सगळीकडे रोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, किस डे, हग डे असे नानाविध दिवस साजरे होतायेत. त्यामुळे या दिवसांना अनुसरून विविध प्रकारच्या भेटवस्तू खरेदी करण्याजोग्या आहेत. रोझ डेसाठी तुम्ही रेड रोझेसचा गुच्छ घेऊ  शकता, ज्याची किंमत ई-बाजारात ३७७ रुपयांपासून सुरू होते. रोझ डेला एक खास वैशिष्टय़ आणि वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही गोल्डन रोझचा विचार करू शकता, १८६ रुपयांपासून गोल्डन रोझ बुके  मिळेल. नुसतेच रेड रोझ नाही तर त्यासोबत चॉकलेट केकही देण्यासारखा आहे, ज्यात तुम्हाला रोझ बुके आणि केक कॉम्बो १,०६९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. लाल गुलाबांपेक्षा पिंक रोझेससुद्धा खूप भावतील. तसेच आपल्या पार्टनरला आवडतील म्हणून सिलिकॉन व्हॅलेंटाइन रोझ बुकेही देऊ  शकता ज्याची किंमत आहे १,११३ रुपये. फक्त गुलाबी रंग आणि तशी फुलं कशाला? त्याव्यतिरिक्त गोल्डन आणि सिलिकॉन रोझप्रमाणे तुम्ही पर्पल ऑर्किडचा बुकेही देऊ  शकता, त्याची किंमतही बाजारात ६९५ रुपये एवढी आहे.

* चॉकलेट डे, रोझ डेपेक्षा टेडी डे, किस डे आणि हग डेची क्रेझ असते. तेव्हाही विविध भेटवस्तू देऊन आपल्या पार्टनरला इम्प्रेस करू शकता. व्हॅलेंटाइन बुकेबरोबर टेडी किंवा अन्य वस्तूही भेट म्हणून देऊ  शकता. ९९५ रुपयांत व्हॅलेंटाइन बुके प्लस टेडी तुम्ही देऊ  शकता. किस डे गिफ्टही तुम्हाला १,२९९ रुपयांत उपलब्ध आहे, ज्यात रेड रोझ बुके, दोन टेडीबेअर आणि एक स्वीट्स बॉक्स खास कपल्ससाठी आहे. १,९९९ रुपयांत तर रोझेस प्लस ब्लॅक फॉरेस्ट केक, प्लस टेडी असं गिफ्ट देऊन आपल्या मित्र-मैत्रिणीला खूश करू शकता. त्याशिवाय किस डेच्या निमित्ताने ‘किस ऑफ रोझेस’ असा बुके देऊ  शकता जो ४९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. एक वेगळा पर्यायही आहे. हार्ट शेपचा रेड रोझ बुके तुम्ही नक्कीच देऊ शकता, जो १,१४५ रुपये किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे आता जास्त उशीर करून चालणार नाही. लव्ह कार्डसमध्येसुद्धा स्कॅ्रपबुक, कोट बुक, पॅशन कार्ड, रिबिन्स कार्ड देऊ  शकता. जे ई-बाजारात ९९, ४९९, ५९९ अशा विविध दरांत उपलब्ध आहेत.

* प्रत्येकजण असाही विचार करतो की आपण आपल्या पार्टनरला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने काही उपयुक्त वस्तू देऊ  शकतो का? तर हा तुमचा विचार अगदी बरोबर आहे. उपयुक्त म्हणण्यापेक्षा अगदी वापरण्यायोग्य अशी कोणतीही वस्तू तुम्ही नक्कीच देऊ  शकता. म्हणजे मुली मुलांना स्मार्ट व पर्सनलाईज्ड गिफ्ट सेट देऊ  शकतात. यात स्मार्ट वॉच, स्मार्ट पेन, स्मार्ट की-चेन, स्मार्ट होल्डर अशा अ‍ॅक्सेसरीज देता येतील. हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला ४९९ रुपये या किमतीत मिळेल. ‘पार्क एव्हेन्यू’कडून यावेळी स्पेशल व्हॅलेंटाईन गिफ्ट पॅक्स आले आहेत त्यापैकी ३७८ रुपयांचा स्पेशल मेन्स अ‍ॅसेन्शियल किट मिळेल, हा कीटही तुम्ही नक्कीच भेट म्हणून देऊ  शकता. ‘वाईल्ड हॉर्न’कडून ब्लॅक मेन्स वॉलेट आले आहे ज्याची सुरुवात १,१६९ रुपयांपासून आहे. यंदा पर्सनलाईज्ड गिफ्टमध्येही मग, कुशन्स, लाइट्स, फ्रेम्सपासून सर्व काही उपलब्ध आहे. २७५, ६८०, १,१५० रुपये अशा विविध किमतीत या भेटवस्तू मिळतील.

मुलंही मुलींसाठी उपयुक्त भेटवस्तू देऊ  शकतात. ‘अलाना’कडून चॉकलेट्स आणि रोझेससह पॅम्पर कॉम्बो पॅक मिळतो आहे जो तुम्ही तिला देऊ शकता. या पॅकमध्ये चॉकलेट लीप स्क्रब, रोझ आणि ग्रुव (ॠ१५ी) सीड फेस मिस्ट, जिरॅनियम फेशियल बॉडी सोप, वाईल्ड रोझ बॉडी बटर असे नानाविध प्रॉडक्ट मिळतील. या प्रत्येक प्रॉडक्टची किंमत १५० रुपयांपासून सुरू होऊन पूर्ण गिफ्ट हॅम्पर १,२७५ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. तिच्यासाठी तुम्ही अ‍ॅक्सेसरीजमध्ये बॅग्स आणि इयरिंग्सही देऊ  शकता. ‘टॉनिक’कडून बॅग्समध्ये स्लिंग बॅग्स मिळतील ज्यांची किंमत १,००० रुपयांपासून सुरू आहे तर इयरिंग्समध्ये ब्राईड, ब्रिडेड, रेड हुडेड अशी वैशिष्टय़े असलेल्या लिव्हिंग कोरल इयर ड्रॉपलेट्स आणि इयर हुक्स ४९९ रुपये एवढय़ा किमतीच्या पुढे मिळतील. ‘तिच्या’साठी आणि ‘त्याच्या’साठी विविध भेटवस्तू प्रेमाची भेट म्हणून देण्यासाठी बाजारात आल्या आहेत. त्यामुळे यंदा ई-बाजारात चांगली पर्वणी खरेदीसाठी चालून आलीये. मग खास व्हॅलेंटाइनच्या खरेदीसाठी बाजारात चक्कर मारायलाच हवी!

viva@expressindia.com