vv32vv31सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला एक नजर टाकूया या व्हिवा सेलेब्रिटी फॅशन गॅलरीमधून..

जॅकलिन फर्नाडिस ही श्रीलंकन ब्युटी तिच्या वेस्टर्न स्टाईलमध्ये पास होतेच, पण आज इंडियन लूकमध्येही तिने पैकीच्या पैकी मार्क मिळविले आहेत. व्हाईट घागऱ्यावर जांभळ्या रंगाचे हायलाईट आणि सोनेरी रंगाची डिटेलिंग अगदी जुळून आले आहे. कानातले झुमके तिचा लुक पूर्ण करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रद्धा कपूर सहसा स्टाइलच्या बाबतीत चुकत नाही. पण तिचा हा इंडियन लुक काहीसा चुकला आहे. गडद अबोली रंगाचा अनारकली आणि त्यावरचा मॅचिंग दुपट्टा हा लुक जमून आलेला नाही. नेटच्या एम्ब्रॉयडरी अनारकलीमध्ये साधलेला ट्रान्सपरंट लुक यावेळी फसला आहे.