मी बीई कम्प्लिट केलंय जस्ट आणि सध्या जॉब सर्चमध्ये आहे, पण लवकर जॉब लागत नाहीये, सो खूप डिप्रेशन येतं. आता घरून पैसे मागायला पण नको वाटतं. जॉब लागलेल्या मैत्रिणी शॉपिंग करतात तेव्हा मला पण स्वत:च्या पैशांनी कधी घेणार असं वाटतं आणि डिप्रेस होते. जॉब लागेपर्यंत डिप्रेशन कसं घालवू?
– मानसी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाय मानसी,
इंजिनीअर झाल्याबद्दल काँग्रॅट्स. दहावीपासून सुरू झालेला तुझा स्ट्रगल बारावी, एण्ट्रन्स एक्झ्ॉम, अ‍ॅडमिशन, सबमिशन्स अशी सगळी हर्डल्स पार करून तुला इथपर्यंत घेऊन आलाय.
ग्रॅज्युएशन झालं की, एक काहीसं रिलॅक्स्ड फिलिंग येतं. ‘पुरे बाबा आता शिक्षण. आता मस्तपैकी जॉब, भरपूर पैसे.. ऐष करायची.’ लहानपणापासून ठरवलेलं असतं. स्वत:च्या पायावर उभं राहायचं, स्वतंत्र व्हायचं, पण तो क्षण राऊंड द कॉर्नर आहे, असं वाटता वाटता निसटून जातो. कारण हवाहवासा वाटणारा जॉब मिळालेला नसतो. देन यू आर अ‍ॅट अ लॉस! कारण जॉबशिवाय दुसरं काहीच ठरवलेलं नसतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर’ म्हणतात तसं होतं. तऱ्हेतऱ्हेचे निगेटिव्ह विचार मनात थैमान घालायला लागतात.
शिक्षण झालं की, नोकरी असा सरळधोपट मार्ग न घेता थोडा वेगळा विचार केला तर? उदा. परदेशात बऱ्याचदा एखादं वर्ष ब्रेकइयर किंवा ड्रॉप-इयर म्हणून घेतात. आपल्याकडेही काहीजण असा प्रयोग करतात. या वर्षांत आपल्याला खूप आवड असलेल्या पण शिकत असताना न जमलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या. म्हणजे गिटार शिकायची असेल, चित्रकलेची परीक्षा द्यायची असेल, इन्स्टिटय़ूट्सना भेटी द्यायच्या असतील, वजन कमी करायचं असेल.. या गोष्टी आता नाही केल्या तर कदाचित नंतर कधीच करता येणार नसतात. अर्थात पैशाचा प्रश्न असतोच, सगळी सोंगं आणता येत नाही. त्यासाठी आता आई-वडिलांकडे हात पसरणं जिवावर येतं हे खरंच. यासाठी काही करता येईल? आई-वडिलांवर फार भाग पडायला नको आणि आपल्यालाही फार गिल्टी वाटायला नको. काही मदत करता येईल त्यांना घरात? हीपण एक शिकण्याची संधी म्हणून वापरता येईल? मला माहिती आहे की, हे वाचल्यावर लगेच तुझ्या मनात येईल, ‘ह्य़ॅ, घरची कामं करण्यात कसली आलीयेत स्किल्स? पाण्यात पडलं की पोहता येतं, वेळ येईल तेव्हा जमेलच की, पण आपलं डेली रुटीन असलेल्या कित्येक गोष्टींकडे आपण ढुंकूनही पाहिलेलं नसतं. एक दिवस बिल भरण्यासाठी रांगेत उभं राहिलं की, पेशन्स शिकायला मिळतो, एखादी छान डिश कुक केली की, त्यासाठी आधीची तयारी, प्रत्यक्ष कुकिंग आणि नंतरची आवराआवर.. बाप रे. किती कंटाळवाणी प्रोसिजर! पेशन्स, इन्सल्ट्स पचविणे, कंटाळा आला तरी हातातलं काम शेवटपर्यंत पूर्णत्वाला नेणे अशी कितीतरी, तुला जॉबसाठी अत्यंत आवश्यक असलेली सॉफ्ट स्किल्स शिकण्याचा हा एक परफेक्ट चान्स आहे.
नोकरी, कॉलेज असं काही नसलं की, आणखी एक इश्यू असतो. आपल्या दिवसाला काही शिस्त नसते. केव्हाही उठा, केव्हाही जेवा, कधीतरी आंघोळ करा, उशिरा झोपा, असं कंटाळवाणं रुटीन. डिप्रेशनमध्ये भरच पडते त्यामुळे. सकाळी उठून छान फ्रेश होऊन कामाला लागलं तर मानसी, तुझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळून जाईल बघ. तुला वेळच मिळणार नाही, कुठले निगेटिव्ह विचार करायला. इन फॅक्ट तुला लगेच जॉब न मिळणं ही एक चांगली अपॉच्र्युनिटी मिळालीये तुला तुझ्या कोशातून बाहेर यायची. तुझं क्रिएटिव्ह आणि इंटरेस्टिंग शेडय़ुल बघून तुझ्या मैत्रिणीच तुझा हेवा करायला लागतील. कुणी सांगावं, तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन त्यातली एखादी तुला फॉलोही करील.
तुझ्या नवीन, फ्रेश सुरुवातीसाठी तुला शुभेच्छा! हॅव फन!
”Happiness is not something you find but rather something you create!”

More Stories onमुलीGirls
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depressed not having job
First published on: 21-02-2014 at 01:06 IST