प्रॅक्टिकल फॅशन

फॅशन शो आणि फॅशन मार्केट यांच्यातील साटंलोटं या वेळी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी फॅ शनप्रेमींना मिळाली आहे.

वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com

‘फॅशन शोमध्ये काहीही कपडे घालतात’ किंवा ‘हे असे कपडे कोण घालतं’ अशा प्रतिक्रिया सहजच कोणाकडूनही येत असत. अति- वजनदार घागरा, भरपूर अ‍ॅक्सेसरीज, भडक रंग, आऊट- ऑफ- प्लेस वाटणारे हेड गियर्स, अशा अनेक गोष्टींचा या इम्प्रॅक्टिकल फॅशनमध्ये समावेश होता. तो ट्रेण्ड मागे पडून खूप काळ झाला तरी अजूनही बऱ्याच वेगवेगळ्या डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये अतिरंजित वाटणारे किंवा इम्प्रॅक्टिकल वाटणारे आऊटफिट्स पाहायला मिळतात. मात्र या वेळी ‘लॅक्मे फॅशन वीक २०२१’मधली जवळपास सर्वच डिझायनर्सची शोकेस ही वेअरेबल डिझाइन्सची होती. कमी अ‍ॅक्सेसरीज, अजिबात भपकेदार नसलेले रंग, सहज आवडतील अशी साधी डिझाइन्स अशा पद्धतीच्या कलेक्शन्सवर जोर देत या वेळचा फिजिटल ‘लॅक्मे फॅशन वीक’ साजरा झाला. या निमित्ताने प्रॅक्टिकल फॅशन हा गरजेचा असलेला ट्रेण्ड मार्केट आणि मेंटॅलिटी दोन्ही पातळ्यांवर स्वीकारला जाण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणावर आहे.

गेले दीड वर्ष डिजिटल फॅ शन शोज हेच न्यू नॉर्मल होऊ पाहतंय की काय अशी भीती व्यक्त के ली जात असताना या वेळी प्रत्यक्ष आणि डिजिटल दोन्ही स्वरूपांत पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅ शन वीक २०२१’ने डिझायनर्स आणि फॅ शनप्रेमी दोघांनाही थोडा दिलासा मिळवून दिला आहे. या शोमध्ये नेहमीप्रमाणे नामांकित तरुण ताहिलियानी, गौरव गुप्ता आदी मंडळींपासून निकिता म्हैसाळकर, अनामिका खन्ना, राजेश प्रताप सिंग, मोनिका आणि करिश्मा यांचा ‘जडें’, पंकज अ‍ॅण्ड निधी, पायल जैन आदी सगळ्याच मंडळींनी आपल्या नेहमीच्या शैलीशी प्रामाणिक राहात सिम्पल आणि प्रॅक्टिकल कलेक्शन्स सादर करण्यावर जोर दिला. प्रॅक्टिकल फॅशनचा हा ट्रेण्ड दिसून येण्याची कारणं  वेगवेगळी असू शकतात. सगळ्यात मुख्य म्हणजे अजूनही पूर्णपणे रुळावर न आलेलं फॅशन इंडस्ट्रीचं आर्थिक गणित! फॅशन हा एक व्यवसाय आहे आणि त्यामुळे त्याकडे केवळ ‘शो’ किंवा ‘आर्ट’ म्हणून न बघता आर्थिक दृष्टिकोनातूनही बघण्याची गरज आहे. वेगळ्या डिझाइन्सवर साध्या आणि नेहमीच्या डिझाइन्सपेक्षा अधिक खर्च होतो ज्यात वेगळं फॅब्रिक, वेगळे कारागीर, त्यांची अधिकची मेहनत, अशा अनेक बाबींचा समावेश असतो. फॅशन इंडस्ट्रीचं मार्केट अजूनही पुन्हा उभारी घेऊ शकलेलं नाही. त्यामुळे खर्च करण्याची रिस्क घेताना त्याचे रिटर्न्‍स मिळण्याची शाश्वती सध्या तरी फॅशन इंडस्ट्रीमध्ये कोणालाही नाही. वेअरेबल नसलेली डिझाइन्स वापरणं या कधी काळी बॉलीवूडमध्ये असलेल्या ट्रेण्डचंही अस्तित्व आता दिसून येत नाही. सेलिब्रिटी वेडिंग्जमध्येही आजकाल ट्रॅडिशनल आऊटफिट्स आणि रंगसंगती यांचीच चलती आहे हे पुन्हा एकदा या सीझनमधून सिद्ध झालं. लाल रंगाचा लेहंगा हा या सीझनमध्ये सादर झालेल्या जवळपास सगळ्याच ब्राईडल कलेक्शनचा आत्मा होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अर्पिता मेहता, जे. जे.वाल्या आणि खुद्द तरुण ताहिलियानी यांच्या ब्राईडल कलेक्शनमध्ये लाल रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स आणि डिझाइन्समधले लेहंगे पाहायला मिळाले.

जगभरातले ट्रेण्डस, जगभरातली मार्केटची स्थिती, देशातली मार्केटची स्थिती, देशातले ट्रेण्डस, चित्रपटांमधले ट्रेण्डस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझायनरची स्वत:ची आर्थिक तयारी आणि ठोकताळे यावर डिझाइन्समध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट अवलंबून असते. या सर्वच बाबींमध्ये ताळमेळ बसत नसल्याने फेस्टिव्ह कलेक्शनमध्येसुद्धा सिम्पल आणि वेअरेबल आऊटफिट्सच दिसली असावीत. मात्र अशापद्धतीने वेअरेबल कलेक्शन्स सादर करताना गेल्या काही वर्षांतील ट्रेण्ड्सचा आधार घेतला गेला. वापरण्यास सहजसोपे आणि दिसण्यास आकर्षक असे कफ्तान्स, क्रॉप टॉप्स आणि वेगवगेळ्या पद्धतीचे बॉटम्स, फ्रिलचे ड्रेसेस, प्रिण्टेड टॉप, पॅण्ट्स आणि ड्रेसेस यांचा मुबलक वापर के ला गेला. टाय अ‍ॅण्ड डायवर भर देत लेहरिया, बांधणी, शिबोरी या पारंपरिक प्रिंट्सबरोबरच फ्लोरल पॅटर्न्‍समधील कलेक्शन मोठय़ा  प्रमाणावर सादर झाले. अनामिका खन्ना, निकिता म्हैसाळकर, पायल जैन, पंकज अ‍ॅण्ड निधी यांनीही  प्रिण्ट्स आणि फ्युजन वेअरवर भर देत प्रॅक्टिकल फॅशन कलेक्शन्स सगळ्यांसमोर आणले. 

डिझायनर्सच्या या प्रॅक्टिकल फॅ शन फं डय़ामागे आर्थिक गणिताच्या बरोबरीनेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेले रिसोर्सेस हेही प्रमुख कारण असावे. लॉकडाऊनच्या काळात फॅशन इण्डस्ट्रीचं चलनवलन पूर्णच बंद झाल्याने अनेक कारागीर, विणकर, इत्यादींनी आपलं काम बंद करून पोटापाण्यासाठी काहीतरी नवीन उद्योग शोधले आहेत. वेगळ्या डिझाइन्ससाठी पैशांसोबतच हे इतर फॅक्टर्सही खूप महत्त्वाचे असतात. इण्डस्ट्री बंद म्हणून कारागिरांचं काम बंद, काम बंद म्हणून त्यांनी वेगळं काम शोधलं आणि आता कारागीर नाहीत म्हणून पुन्हा इण्डस्ट्रीचा वेग मंदावला, अशा वर्तुळात अडकून पडल्यामुळे कदाचित या वर्षीच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या दोन्ही सीझन्समध्ये साधी दिसणारी, कमी रिसोर्सेसमध्ये तयार झालेली आणि सामान्य ट्रेण्डला धरून असणारी प्रॅक्टिकल डिझाइन्स दिसून आली. वेअरेबल फॅ शनलाच ग्लॅमरचा साज चढवत सादर झालेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ची आन आणि शान कायम ठेवण्यात डिझायनर्सना यश आले आहे. सध्या मार्के टमध्ये अशाच ट्रेण्डी आऊटफिट्सची चलती दिसून येते आहे. फॅशन शो आणि फॅशन मार्के ट यांच्यातील साटंलोटं या वेळी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी फॅ शनप्रेमींना मिळाली आहे. अनेक कारणांमुळे या वेळी ‘लॅक्मे फॅशन वीक’मधली जवळपास सगळी कलेक्शन्स आणि सगळी आऊटफिट्स ही मार्केट ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल पाहायला मिळाली. मात्र वेअरेबल फॅशन किंवा प्रॅक्टिकल फॅशनचा हा ट्रेण्ड नेहमीच दिसत राहिला तर तो सकारात्मक बदल ठरेल हे नक्की!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fashion trends practical fashion ideas lakme fashion week zws

Next Story
सुनिताची अंतराळात दुसरी यशस्वी झेप !
ताज्या बातम्या