कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट शिकवणारे सदर. आजच्या लेखात वेगवेगळ्या पेयांसाठी योजलेल्या ठरावीक संगतीच्या ग्लासवेरविषयी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेबलवेरमधल्या कटलरी आणि क्रॉकरीसंबंधी माहिती आपण गेल्या दोन भागांत पाहिली आता ग्लासवेरकडे वळू या. ग्लासवेर म्हणजे जेवायच्या वेळी लागणारं काच सामान. मुख्यत: पेय प्यायचे ग्लास. वेगवेगळ्या प्रकारची पेय त्यांच्या ठरलेल्या ग्लासमधूनच प्यायली जातात. कुठलाही ग्लास कशालाही हा प्रकार फाइन डाइनमध्ये चालत नाही. या ग्लासवेरचे दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं. ‘टम्बलर्स’ आणि ‘स्टेम्स/स्टेमवेर’. टम्बलर्समध्ये बिनादांडय़ाच्या/बिनाबेसच्या ग्लासेसची गणना होते आणि स्टेमवेर हे त्याच्या नावाप्रमाणे, दांडी आणि बेस ( दांडय़ाच्या खालचा गोल, पसरट भाग) असलेले ग्लासेस असतात. या दोन्ही प्रकारांत गणती होणाऱ्या ग्लासेसना ही वेगवेगळी नावं असतात!

टम्बलर्समधल्या ग्लासेसची नावं अगदी मजेदार आहेत : रोली-पोली (मराठी अनुवाद – गोल मटोल असा करता येईल!), पोनी, ओल्ड-फेशंड, हायबॉल, टोम कॉलिन्स इत्यादी. वाइनसाठी आणि बऱ्याच कॉकटेल्ससाठीही स्टेमवेरचा वापर होतो. मार्टिनी, मार्गारिटा ही कॉकटेल्स तर आहेतच पण ज्या ग्लासेसमध्ये ती सर्व होतात. त्या ग्लासेसना पण त्यांची नावं मिळाली आहेत. याशिवाय वाइन प्यायला रेड वाइन ग्लास, व्हाइट वाइन ग्लास असतात. श्ॉम्पेन तर तीन प्रकारच्या ग्लासेसमधून सव्‍‌र्ह केली जाते. श्ॉम्पेन सॉसर, श्ॉम्पेन टय़ुलिप आणि श्ॉम्पेन फ्ल्यूट. शेरी ग्लास, स्नीफटर, कॉकटेल ग्लास हेही स्टेम्सचे प्रकार आहेत. आतल्या पेयाचा रंग नीट दिसावा म्हणून ग्लासवेर बिनारंगाचं असत.
पाश्चात्त्य जेवण पद्धतीत, जेवणाबरोबर वाइन पितात आणि त्यासाठी ग्लासेसची मांडणी टेबलवरच होते. बडा खाना असेल तर टेबलवर पाणी प्यायचा ग्लास, व्हाइट वाइन ग्लास आणि रेस वाइन ग्लास अशी मांडणी असते. क्रॉकरी आणि कटलरी उच्च प्रतीची असली की ग्लासवेर पण तेवढय़ाच उच्च प्रतीचे नको का? हे ग्लासवेर अगदी तलम, पातळ काचेपासून बनवलेले असतात. त्यातही ब्लोन (नळीतून फुंकून केलेले) ग्लास आणि कट ग्लास जास्त पसंत असतात. वॉटरफोर्ड, रिडल, स्वारोव्स्की, बाक्कारात हे उच्च प्रतीच्या ग्लासवेरचे काही नामांकित ब्रॅण्ड्स आहेत.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine dining glassware
First published on: 26-02-2016 at 01:00 IST