मी रुरल एरियातून सध्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी पुण्याला आलोय. माझा प्रॉब्लेम हा आहे की मी जेव्हा ग्रुपमध्ये बोलतो तेव्हा खूप नव्‍‌र्हस होऊन जातो. स्पेशली इन अ ग्रुप ऑफ गर्ल्स. मला उमजत नाही की काय बोलावं. मी दिसायला ठीक आहे, पण अनोळखी मुला-मुलींशी कसं बोलावं हे कळत नाही. मी टोटली ब्लँक होऊन जातो. का? अनोळखी माणसं काय बोलतात हे मला नीटसं समजत नाही, मी कन्फ्युज होतो आणि माझं इम्प्रेशन डाऊन होतं. मुलींवर अशामुळे इम्प्रेशन पडत नाही.
-जयपाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिय जयपाल,
ग्रेट! कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी रुरल एरियातून एकदम पुण्यासारख्या शहरात येण्याचा धाडसाचा निर्णय घेतलास तू, जयपाल. या परीक्षांमध्ये रिटर्न एक्झामबरोबरच जी डी (ग्रुप डिस्कशन) आणि व्हायव्हा किंवा तोंडी परीक्षाही असतात, राइट? परीक्षेची तयारी करताना थिअरीबरोबर तुम्ही या अशा चर्चाही करीत असाल. तुझ्या मेलवरून काही गोष्टी जाणवतायत त्या अशा- आपण रुरल एरियातून आलोय म्हणजे आपल्यात मुळातच काही कमी आहे, ज्या-ज्या व्यक्तींशी मी इंटरअ‍ॅक्ट करतो त्या सर्वावर माझं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे, मला लोकांशी कसं बोलावं हे समजत नाही, मुलींशी बोलणं म्हणजे काही तरी खास, वेगळं आणि अवघड आहे, अशा काही धारणा तू सुरुवातीलाच करून घेतल्या आहेस.
ग्रामीण भागांतून आलेल्या बऱ्याच जणांना असा एक कॉम्प्लेक्स मनामध्ये असतो. कारण तिथली बोलण्याची पद्घत, ड्रेसिंग स्टाइल वेगळी असते. शहरातल्या वेगाची, तिथल्या चालूपणाची सवय नसते. दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवण्याइतका काहीसा भोळेपणा अंगात असतो. सगळ्याची खूप भीती वाटत असते, बावचळून जायला होतं. धीर करून काही करायला जावं तर नेमकं कुणीतरी एखादा खवचट शेरा मारतं (खासकरून पुणेरी लोक यासाठी प्रसिद्ध आहेत.) आणि उरलासुरला कॉन्फिडन्स खलास होतो. तुला या सगळ्याची फार काळजी लागून राहिली आहे, कारण तू ज्या प्रकारच्या तयारीसाठी आलायस, त्या ग्रुपमध्ये बोलता येणं ही अगदी बेसिक गरज आहे.
तुला मुलीवर आपलं इम्प्रेशन पडावं असंही खूप तीव्रतेनं वाटतं आहे. मुली म्हणजे आपल्यासारख्या माणूसच आहेत. त्या काही कुठल्या परग्रहावरून आलेल्या नसतात. त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्याचा जितका जास्त प्रयत्न करशील तितकं ते कृत्रिम वाटायला लागेल. आणि कृत्रिमरीत्या केलेली कोणतीही गोष्ट खूप ऑकवर्ड होते, विचित्र दिसते आणि अर्थातच फसते. तू जितका सहज आणि नॅचरल असशील तितका मुलींना आवडशील. मग भले तुझ्या मते तू गावंढळ असशील, तुला इम्प्रेशन पाडता येत नसेल, स्मार्ट नसशील. पण जितका तू स्वत:शी कम्फर्टेबल असशील, ‘आय डोन्ट केअर अ‍ॅटिटय़ूड’ ठेवशील, तितका डिझायरेबल वाटशील मुलींना.
अनोळखी माणसं काय बोलतात, हे तुला का समजत नाही याचं कारण शोधायचा प्रयत्न केलायस का कधी? तुला नीट ऐकू येतंय ना? (याची एकदा ईएनटी डॉक्टरकडून तपासणी करून घे. कधी कधी खूप मळ साचल्यामुळे किंवा लहानपणी कान फुटल्यामुळे ऐकायला प्रॉब्लेम येऊ शकतो.) इंग्लिश समजायला जड जातं का? की असं होतं की त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्याच्या प्रयत्नात तू इतका गुंतून जातोस की त्यांच्या बोलण्याकडे तुझं लक्षच नसतं? आपण कसे दिसत असू, काय उत्तर दिलं की ते प्रभावित होईल, अमुक उत्तर दिलं तर त्यांना काय वाटेल, असं सगळं मनात चालत असल्यानं त्यांचे शब्द कानावर पडतात पण त्यांचा अर्थ मात्र कळत नाही.
किशोरकुमारचं एक गाणं आहे- ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.’ लोक काही ना काही बोलणारच. प्रश्न हा आहे की आपण त्याला प्रमाणाबाहेर महत्त्व देणार का आणि याचं उत्तर ऑब्हियस आहे.
तुला तुझ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट!
It’s not the situation…. It is your reaction to the situation! 

More Stories onमुलीGirls
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to impress
First published on: 28-02-2014 at 01:07 IST