समृद्ध अभिनेत्रीबरोबरच अमृता सुभाषमध्ये माणूस म्हणून असलेली समृद्धी व्हिवा लाउंजमधून उपस्थितांना जाणवली. उपस्थितांपैकी काही तरुणांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..
‘ती फुलराणी’मधल्या मंजुळाची एक झलक दाखवताना अमृता इतकी खरी वाटली, की मंजुळाचं व्यक्तिमत्त्व त्या एकाच प्रसंगातून उलगडलं. अमृताच्या अनुभवकथनातून स्वप्नांना आणि भावनांना नवी उभारी मिळाल्यासारखं वाटलं.
सरिता कोकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनयाचा वारसा मिळालेला असला तरी एक चांगली अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी वेगळा स्ट्रगल करावा लागतो हे अमृताच्या अनुभवांमधून कळलं. ३०० स्क्रीन टेस्ट्सनंतरही एकही जाहिरात मिळू शकली नाही आणि तरीही निराश न होता तिने मोठा पल्ला गाठला. अपयशाला सामोरं जाण्याची तिची ताकद बघून प्रेरणा मिळाली. अमृताच्या अनुभवातून ‘एनएसडी’मधल्या वेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमामागचे उद्देश कळले.
संकेत सुभेदार

एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भूमिका थोडीशी बाजूला सारत अमृता सुभाषने अगदी सहजतेने प्रेक्षकांसोबत संवाद साधला. व्हिवा लाउंजच्या निमित्ताने अमृताला ऐकणं ही उपस्थितांसाठी पर्वणीच ठरली. ‘यश’ या शब्दाची आशयगर्भ व्याख्या नेमक्या शब्दात अमृताने मांडली. त्यातून या कलाकाराचा दृष्टिकोन समजला. ट्रली ऑस्सम…!
प्रतीक्षा अहिनवे

अमृता सुभाषला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’मुळे मिळाली. अभिनय, गाणं, तिचं तरल व्यक्तिमत्त्व आणि व्यासपीठावरचा मनमोकळा वावर याची एक ‘मॅशअप’ झलक या कार्यक्रमातून दिसली. तिने शेअर केलेले अनुभव आणि सल्ले हे आयुष्यात पुढे खूप उपयोगी ठरणार आहेत. तिने सांगितलेला श्रीमंतीचा निकष, यशाची व्याख्या अगदी मनापासून पटली.
शीतल नलावडे

‘स्वप्न पाहात राहा, स्ट्रगल तर सर्वानाच करावा लागतो’ हे अमृताच्या बोलण्यातून जाणवलं. लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या निमित्ताने आम्हा सर्वानाच अमृताने ‘फुलराणी’ – मंजुळाचीही भेट घालून दिली. तिच्या उत्स्फूर्त, दिलखुलास गप्पांनी खूप वेगळा अनुभव दिला.
पूजा भोर
अमृताचं मनस्वी बोलणं मला भावलं. एक चांगला माणूस होणं हेही एक प्रकारे शिकणंच आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा स्वत: माणूस म्हणून डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं आहे, हे तिच्या बोलण्यातून ठसलं.
ऐश्वर्या आपटे

मी ‘यूपीएससी’ची तयारी करीत असल्याने मी ‘लोकसत्ता’ची नियमित वाचक आहे. आणि अमृता सुभाषची खूप मोठी चाहती आहे. या कार्यक्रमासाठी मी कोल्हापूरहून आलेय. अमृताचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मला भावला.
पृथा िभगार्डे

मी सध्या संगीतविशारद करतेय. अमृताची गाणी मी पहिल्यापासून ऐकत आहे. तिचं क्षणात ‘मंजुळा’ होत ‘ती फुलराणी’मधलं गाणं सादर करणं आवडलं. याच्या आधीही ‘व्हिवा लाउंज’ला मी उपस्थित होते. या वेळी आवडत्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष भेटण्याची, तिच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
रुचिरा विरजे

‘ती फुलराणी’मधल्या मंजुळाची झलक दाखवताना अमृताने दाखवून दिलेली तिची सकारात्मक दृष्टी भावली. तिच्या आजवरच्या प्रवासातून कठीण परिस्थितीतही आयुष्य कसं फुलवायचं हे कळलं. मनमोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमातून खूप काही समजलं आणि अनुभवायला मिळालं.
सम्राज्ञी तांबे-पवार

व्हिवा दिवा

स्वप्नाली चव्हाण

व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा. निवडक फोटोंना प्रसिद्धी देण्यात येईल. केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत. सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा.

 

 

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with amruta
First published on: 04-09-2015 at 01:15 IST