पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ सध्या सगळ्यात जास्त पाहायला मिळतो तो दागिन्यांमध्ये. सणासुदीच्या निमित्ताने सजलेल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन आभूषणांच्या बाजारपेठांची सैर ही भल्याभल्यांना मोहून टाकणारी आहे..

गायत्री हसबनीस

सणासुदीचे दिवस म्हटलं की निश्चितच सर्व प्रकारच्या खरेदीला उधाण येते. त्यातूनही दागिन्यांची खरेदी अव्वल! सर्वसाधारणपणे एकत्र खरेदीला गेलो की आपल्या घरातील, इतर मैत्रिणींच्या दागिन्यांची आवड लक्षात येते आणि आपलीही त्यांना कळते. स्वत:ला काय आवडतं हेसुद्धा पाहाता येतं. कुणाला सोन्याच्या चेनसारखे बारीक दागिने आवडतात, तर कुणाला चांदीचे, मोत्याचे किंवा डायमंडचे दागिने आवडतात. ऑक्सिडाईझ्ड दागिन्यांनाही सध्या खूप पसंती मिळू लागली आहे. मग हे दागिने कुठे मिळतील, त्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडे आपापल्या बजेटनुसार शोधकार्य सुरू होते. सध्या बऱ्याच वेबसाईट्सवर आणि मोठय़ा स्टोअर्समध्ये सूटदेखील उपलब्ध आहे. विविध संकेतस्थळांवर सोने, चांदी, मेटल, डायमंड, ऑक्सिडाईझ्ड, हॅण्डक्राफ्ट ज्वेलरी उपलब्ध आहे.

कलरफुल ज्वेलरी

आजकाल बऱ्यापैकी मुलींना कळून चुकलंय की त्यांना मोनोटोनस ज्वेलरी फारशी पसंत पडत नाही, त्यात मॅचिंग ज्वेलरी आणि एकसारख्या डिझाइनच्या ज्वेलरीचा समावेश आहे. बऱ्यापैकी एनमॅच दिसणाऱ्या ज्वेलरी ज्या डिझाईन आणि रंगातही वेगळ्या असतील, अशा दागिन्यांची क्रेझ सध्या वाढते आहे. यामध्ये प्रामुख्याने नेकपीसेस आहेत. क लरफूल इअररिंग्ज आणि ब्रेसलेट्स आता अगदी कॉमन झाले आहेत. त्यामुळे रंगीबेरंगी डिझायनर नेकपीसची मागणी वाढते आहे. विशेष म्हणजे अशा नेकपीसेसमध्ये तुम्हाला सेमी प्रेशियस स्टोन, मोती, मणी, डायमंड, रूबी, ऑक्सिडाईझ्ड आणि हॅण्डक्राफ्टटेड या सर्व थाटामाटात नानाविध प्रकारचे नेकपीस मिळतील. उदाहरणार्थ ऑक्सिडाईझ्ड डिझाइनमध्ये टेम्पल वर्क, हॅण्डक्राफ्टटेड ज्वेलरीमध्ये सेमी प्रेशियस स्टोन वर्क, डय़ूएल कलर मोत्याची माळ इत्यादी. ‘तेज’ (ळी्नँ) या संकेतस्थळावरून तुम्हाला कलरफुल ऑक्सिडाईझ्ड ज्वेलरी मिळतील. विविध डिझाइनच्या कलरफुल ज्वेलरी या विविध ऑनलाईन वेबसाईट्सवर उपलब्ध आहेत. चारशे रुपयांपासून ते सात हजाराच्या घरात या दागिन्यांची किंमत आहे. चारशे रुपयांमध्ये तुम्हाला मल्टिकलर चेनसारखे नेकपीस अथवा चोकर मिळतील. तर सेमी प्रेशियस स्टोन, मोती, बिडेड, कुंदन आणि हॅण्डक्राफ्ट ज्वेलरी हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. थोडा आणखी खर्च करायची तयारी असेल तर पाच हजारच्या आसपास तुम्हाला गोल्डन फिनिशिंग वा गोल्ड प्लेटेड कलरफुल ज्वेलरीदेखील उपलब्ध होतील. ‘जयपोर’ या संकेतस्थळावर अशा ज्वेलरीज उपलब्ध आहेत.

गोल्डन इअरिरग्ज

सोन्याच्या कानातल्यांना सध्या जास्त मागणी आहे, कारण सणासुदीच्या काळात लांब आणि भरगच्च कानातल्यापांसून ते छोटय़ा कानातल्यांपर्यंत वेगवेगळ्या डिझाइन्स लोकप्रिय ठरतात आणि यंदाही असे कानातले बाजारात पहायला मिळतील. ज्यांना मोठे कानातले आवडतात त्यांच्यासाठी विविध लेयरचे गोल्डन इअररिंग्ज आहेत, ज्यात रामलीला, चांदबाली, लोंबते कानातले, ब्रायडल, हेवी, राऊंड, ड्रॉप, झुमके, फॅन्सी, मॉडर्न, अ‍ॅन्टिक, ट्रॅडिशनल कानातले आहेत तर लहान आकारांमध्ये सिंपल, लाईट वेट, स्टड, मोती, डायमंड असे कानातले आहेत. सोन्याच्या दागिन्यातला सर्वात भारी प्रकार म्हणजे २४ कॅरेट सोन्याचे दागिने जे अगदीच जास्त किमतीचे असतात, पण तरीही २२ कॅरेट सोन्याचे दागिनेही तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यातही २२ कॅरेट सोन्याचे कानातलेही सहज उपलब्ध आहेत. या कानातल्यांमध्ये ड्रॉप, कटआऊट जेम स्टोन, लॅटिन डायमंड, लीफ डायमंड, पेटिट ब्लू, जॉमेट्रिकल, ब्लूम डायमंड, फ्लोअर डायमंड, पेटल डायमंड असे प्रकार आहेत. हे दागिने बऱ्यापैकी हजारांच्या घरात आहेत म्हणजेच नऊ हजार ते पस्तीस हजार रुपयांमध्ये हे दागिने तुम्हाला खरेदी करता येतील. ‘कॅरेटलेन’ या वेबसाईटबरोबरच इतर वेबसाईट्सवरही हे कानातले उपलब्ध आहेत.

viva@expressindia.com

चोकर  चोकरचा ट्रेण्ड तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल. ट्रॅडिशनल वेअरसाठी खास असे चोकर बाजारात आले आहेत. वर म्हटल्याप्रमाणे चोकरमध्ये मल्टिकलर ज्वेलरी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या चोकरमध्ये गोल्ड प्लेटेड आणि बिडेड डिझाईन्स आल्या आहेत. मध्यभागी गोल्ड किंवा क्रिस्टल प्लेटेड आणि विविध रंगी बिडेड गळ्याचे चोकर अशी ही रचना आहे. रंगांमध्ये गडद लाल, मरून, गडद हिरवा, पांढरा असे रंग आहेत. बिडेड चोकरशिवाय ऑक्सिडाईज्ड चोकर, मोत्यांचे चोकर, कुंदन चोकर देखील उपलब्ध आहेत. हे चोकर बऱ्यापैंकी परवडणाऱ्या किमतीत आहेत. साडी किंवा अगदी वेस्टर्न आऊटफिटवरही तुम्ही हे चोकर परिधान करू शकता. या चोकरवर तुम्हाला साजेसे इअररिंग्ज मिळतील.

चांदीचा ट्रेण्ड चांदीच्या दागिन्यांचाही ट्रेण्ड यंदा जोर धरून आहे, कारण या ट्रेण्डमध्ये कानातले, गळ्यातले, अंगठय़ा, नोझरिंग, ब्रेसलेट्स, बांगडय़ा असे बरेच प्रकार आहेत. प्यूअर ९२५ सिल्व्हर दागिन्यांमध्ये झुमके आहेत. हे झुमके खासकरून ट्रायबल, राजपूती तसेच व्हिक्टोरियन शैलीचे आहेत. सिल्व्हरपासून बनवलेल्या या झुमक्यांमध्ये मोती, मणी, जाळी, डोम आकाराचे, कुंदन, एथनिक, ऑक्सिडाईझ्ड, स्टड, फ्लोरल, थ्री लेअर, स्टर्लिग सिल्व्हर अशा नानाविध प्रकाराचे झुमके सर्व दरात उपलब्ध आहेत. सिल्व्हर नेकलेसमध्ये सिल्व्हर प्लेटेड दागिने आहेत. यात तुमच्यासाठी चोकर, पेंडन्ट आणि चेन, ऑक्सिडाईझ्ड, मिनिमल, लेयर्ड, स्नोफ्लेक, ड्रॉप नेकलेस, घुंगरू स्टाईल आणि कुंदन नेकलेस असे बरेच प्रकार उपलब्ध आहेत, यांची किंमत अडीच हजारांपासून ते पंधरा हजारांच्या घरात आहे. सिल्व्हर अंगठय़ांमध्ये डबल रिंग आणि चेन अशा अंगठय़ा या फेस्टिव सीझनचे आकर्षण ठरणार आहेत. ‘मिया’ बाय ‘तनिष्क’कडून सिल्व्हर मल्टिकलर रिंग्जचं कलेक्शन उपलब्ध आहे, तसंच टटरेईझ सिल्व्हर, राऊंड स्पायनर, प्लॅटिनम सिल्व्हर, एडी – स्टड, सीझेड – स्टड, बोहा, ९२५ स्टर्लिग सिल्व्हर, इन्ट्रीकेट, माक्र्विझ, आणि क्रिस्टल सिल्व्हरच्या अंगठय़ा आहेत. नोझ रिंगमध्ये स्टड सारख्या बारीक सिल्व्हर रिंग्जही आहेत. ब्रेसलेटमध्ये पाहिलंत तर स्वारोवस्की क्रिस्टल ब्रेसलेट, पानांच्या डिझाइनच्या सिल्व्हर बांगडय़ा, फुलांच्या डिझाइनच्या बांगडय़ा, होर्डियम प्लेटेड, हॅण्डक्राफ्टेड ब्रेसलेट्स, माक्र्विझ, डबल चेन ब्रेसलेट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका, लगेच खरेदीला लागा.