गायत्री हसबनीस

सण आला म्हणजे शुभेच्छा आल्या आणि शुभेच्छांचे स्वरूप म्हणजे भेट ही हवीच. आपल्या प्रियजनांना, मित्रमंडळींना आणि भावाबहिणींना येत्या दिवाळीत भेटवस्तू काय देता येईल, असा प्रश्न तुम्हाला नक्की भेडसावत असेल. आजच्या डिजिटल युगात दिवाळीच्या सणात गिफ्टसाठीचे पर्यायही बदलत आहेत. पर्सनलाइज्ड अथवा कस्टमाइज्ड पर्याय तर आहेतच पण या दोन गोष्टीही झपाटय़ाने बदलत आहेत. घरगुती वस्तू, दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू, मिठाई, कपडे, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अशा विविध भेटवस्तू दिवाळीच्या निमित्ताने सुहृदांना दिल्या जातात. आता तर पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा सध्या ट्रेण्ड आहे. त्यात तुम्हाला विविध प्रकारच्या गिफ्टिंग आयडियाज् मिळतील.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

* मुख्यत्वे जितक्या उपयोगातील वस्तू भेट म्हणून योग्य ठरतील अशा वस्तू या वेळी ऑनलाइनवर भेटवस्तूंच्या कार्टमध्ये सामील झाल्या आहेत. शिवाय यात पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. दिवाळीसारखा मोठा सण असल्याने ई-मार्केटमध्ये एकावर एक मोफत वस्तूंच्या ऑफर्स अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. कस्टमाइज्ड पर्यायात कुशन, डेकोपाज, मग, क्ले दिया, चॉकलेट्स, हॅम्पर आहेत. यात चॉकलेट्सच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची रांग असते. यांची जाहिरातही होते त्यामुळे मिठाई, ड्रायफ्रुट्सपेक्षा चॉकलेट्सचा ट्रेण्ड आहे. यावर तुम्हाला विविध डेकोरेटेड पर्सनलाइज्ड चॉकलेट बॉक्स मिळतील. यांची किंमत ४९९, ५९८, ६९९, ७९९, ९०० रुपये एवढी आहे. तुम्ही डिझायनर ज्वेलरी बॉक्सही ज्वेलरीसोबत देऊ  शकता. त्यात वुडन, ब्रास, पोरसेलिनचे डेकोरेटिव्ह ज्वेलरी बॉक्स आहेत. यांची किंमत ५४९, ४५६ रुपयांपासून १,९९९ रुपयांपर्यंत आहे. कस्टमाइज्ड आणि पर्सनलाइज्ड मग, कप ५०० रुपयांपासून आहेत. सध्या पर्सनलाइज्ड कॅनव्हासही ट्रेण्डमध्ये आहे. फ्रेमप्रमाणे फोटो फीचर करून तो गिफ्ट करू शकता. त्यात ए ३, ए ४ साइज आहे. १,३५०, १,१५० आणि ९२५ रुपये इतक्या रकमेत हे पर्सनलाइज्ड कॅनव्हास मिळतील. परफ्यूम्सही तुमच्या आवडीनुसार भेट देऊ  शकता तसेच पर्सनलाइज्ड परफ्यूम्सही १,१७० रुपयांत उपलब्ध आहेत.

* डेकोपाज (decoupage) म्हणून तुम्ही दिवाळीतही रेडीमेड, हॅण्डमेड, क्राफ्टेड गिफ्ट्स बनवून देऊ  शकता. गिफ्टिंग कव्हर किंवा गिफ्टिंग बॉटल्स म्हणून तुम्ही डेकोपाजचा विचार करू शकता. यात मॉन्टाज, विन्टेज अशा थीम्स आहेत. गिफ्टिंग बॉक्स तुम्हाला २९० रुपयांपासून मिळतील. तसेच वेगवेगळे पारंपरिक चित्रकलेतले पेपर स्टिकरही मिळतील, ते तुम्ही होम डेकोर, स्टेशनरी यांपैकी कुठेही वापरू शकता. यांची किंमत ३७५ रुपयांपासून आहे. कुशन कव्हरही पर्सनलाइज्ड स्वरूपात मिळेल. ४०० ते २,००० रुपये इतकी त्यांची किंमत आहे.

* हॅम्परही यंदा ट्रेण्डी आहेत. ज्यात विविध भेटवस्तू एकाच बॉक्समधून तुमच्या नावाने शुभेच्छा याअर्थी भेट देऊ  शकता. १,५५०, १,७०० आणि १,०५० रुपये या किमतीत हे डेकोरेटिव्ह हॅम्पर उपलब्ध आहेत.

* यंदाही दिवाळीतली मोठी खरेदी म्हणजे भाऊबिजेच्या खरेदीसाठीची झुंबड ई-मार्केटमध्येही पाहायला मिळते आहे. इथेही तरुणाईसाठी पर्सनलाइज्ड गिफ्टिंगला प्राधान्य आहे. आता मुलांना घडय़ाळांचे खूप वेड असते, त्यामुळे गिफ्ट म्हणून पर्सनलाइज्ड वॉच योग्य ठरतील. ५९९, ८००, ९९९, १,२५० रुपये अशा विविध किमतीत पर्सनलाइज्ड वॉचेस मिळतील. बहिणींसाठी तुम्ही विविध क्राफ्टेड ज्वेलरी देऊ  शकता. ज्यात हॅण्ड पेंटिंग आहे आणि त्यात वुडन व ऑथेंटिक ज्वेलरी मिळेल. यांची किंमत ५०० ते १,००० रुपयांच्या दरम्यान आहे. फॅमिली गिफ्ट म्हणून पर्सनलाइज्ड क्लॉक किंवा फ्रेम देऊ  शकता. पर्सनलाइज्ड क्लॉक्स (भिंतीवरील किंवा शोकेसमधील घडय़ाळं) १,६०० रुपयांच्या पुढे मिळतील.

* या दिवाळीत भेट म्हणून पर्सनलाइज्ड शायनिंग लॅम्प ही भेट देऊ  शकता. या लॅम्पवर तुमची मित्रमंडळी, नातेवाईक आणि तुमच्या पार्टनरचा फोटो फीचर करून तो लॅम्प तुम्ही घरात आणि बेडरूममध्ये वापरू शकता. हे लॅम्प्स फ्लोरोसन्ट असून यावरील फोटो हा दीर्घकाळ टिकून राहणारा आहे. या लॅम्पच्या प्रकाशामुळे तुमचा फोटो हायलाईट होतो. हे लॅम्प्स क्युबिक, सिलेंड्रिकल, टॉवर, आयताकृती आहेत. यांची किंमत अनुक्रमे १,७९९, ९९९, ८७९, १,४९९, ५९९ रुपये इतकी आहे. यात कंदीलही समाविष्ट आहे पण कंदिलापेक्षाही लॅम्प आवडीचे ठरले आहेत.

* या दिवाळीत भेट म्हणून स्टेशनरी, स्मॉल फर्निचरही देऊ  शकता. त्यामुळे उपयुक्त आणि दर्जेदार वाटतील अशा शोभेच्या वस्तू शुभेच्छांसकट द्यायला हरकत नाही. यंदा यावर २० ते ३० टक्के सूट देण्यात आली आहे. ५० टक्के सूट यंदाच्या दिवाळीत कुठल्याही गिफ्टिंग पर्यायांवर नसून ५०% वरील कुठल्याही गोष्टीची खरेदी करण्यापूर्वी प्रॉडक्ट ऑनलाइन कंपन्यांनी ‘शॉर्टलिस्ट’ केले आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे.

* दिवाळीच्या सणात अ‍ॅक्सेसरीज म्हणून गििफ्टगच्या पर्यायांमध्ये वेअरेबल इयरिंग्स, रिंग्स, पेन्डंट, ब्रेसलेट देऊ  शकता. कॅ रटलेन डॉट कॉमवर१४ कॅरेट सोन्यापासून २२ कॅरेट सोन्यापर्यंत स्टड, ड्रॉप इयरिंग्स, इअर जॅकेट्स आणि गोल्डन पर्ल इयरिंग्स मिळतील. ६,१६९, १३,९२६, १४,४५७ रुपयांपासून १७,३५३ रुपयांपर्यंत यांची किंमत आहे. डायमंड आणि सिल्व्हरमध्ये फ्लोरल डायमंड इयरिंग्स, डायमंड सिंथेटिक रुबी इयरिंग्स, रोझ डायमंड इयरिंग्स असे विविध प्रकारचे सिंपल तरी कॅज्युअल इयरिंग्स इथे आहेत. या इयरिंग्स ७,२९२, १९,३०३, १५,४०६, ५२,२१५ रुपये अशा विविध किमतीत मिळतील. व्हाइट डायमंड इयरिंग्स तुम्ही मल्टिकलर आणि ओव्हरसाइज्ड अ‍ॅक्सेसरीजमध्ये घेऊ  शकता. रिंग्समध्येही ब्लुम रिंग्स आहेत, ज्यात येल्लो गोल्डपेक्षा येल्लो डायमंड रिंग आहेत. फॅन्सी कलरमध्ये या रिंग्स असून १८ कॅरेट टू टोन गोल्ड पाहायला मिळेल. यात ३२,००० रुपयांपासून ४४,००० रुपयांपर्यंत रेंज आहे. प्लॅटिनम रिंग कॅज्युअल वेअरमध्ये मोडतायत त्यातही या रिंग्स १६,०३२, १५,०००, आणि ३२,०५६ रुपये अशा विविध किमतीत मिळतील. पूर्ण नेकपीस देण्याऐवजी पेन्डंट फार चर्चेत आहेत किंबहुना यंदा प्रेझेंट म्हणून पेन्डंट तुम्ही देऊ  शकता. यात कॅज्युअल आणि पर्सनलाईज्ड पेन्डंट ट्रेण्डमध्ये आहे, नुसतं गोल्ड नाही तर गोल्ड पर्ल, कट आऊ ट गोल्ड, बटरफ्लाय गोल्ड, एसेन्शियल डायमंड पेन्डंट ट्रेण्डमध्ये आहे. त्यामुळे चेन, मोतींच्या माळांपेक्षा कॅज्युअल पेन्डंट कूल ठरतील. यांची किंमत ४,७५२, ५८८९, ७, ४१२ रुपयांपासून ९,२७७, १०,८२८ रुपयांइतकी आहे. ब्रेसलेटमध्ये ब्रोड, थीन, मंगळसूत्र ब्रेसलेट, डायमंड, गोल्ड, प्लॅटिनम ब्रेसलेट आहेत. ३,३५९ रुपये इतकी त्यांची सुरुवात आहे. मंगळसूत्र ब्रेसलेट ४,०७६ रुपयांपासून मिळेल. १०,०७३, १२,०७८, १३, ४६२ रुपयांपर्यंतसुद्धा हे ब्रेसलेट मिळतील. रोझ ब्रेसलेटही तूम्ही भेट म्हणून देऊ  शकता तसेच प्लॅटिनम ब्रेसलेट मेन्सवेअरमध्ये आहेत, ४,००० ते १०,००० रुपयांपर्यंत ते तुम्हाला मिळतील.

viva@expressindia.com