फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना. व्हॅलेंटाइन डेच्या आधीचा हा वीकएण्ड आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर घालवण्याचं ठरवलं असेल तर त्याची तयारी कशी करायची?

  • बाहेरगावी फिरायला जाणार असाल तर मॉइश्चरायझर्स, लीप बाम, सनस्क्रीन या गोष्टी विसरू नका. फेस हायड्रेटिंग मिस्ट जवळ ठेवणं चांगलं.
  • प्रवासात कलर्ड लीप बाम किंवा लीप टिंट वापरायला हरकत नाही.
  • दिवसा बाहेर पडणार असाल तर मॅट फिनिश असलेला मेकअप हवा.
  • रोमँटिक डे आऊटसाठी नॅचरल, न्यूट्रल मेकअप हा अशा वेळी चांगला. सॉफ्ट शिमर असलेली पीच, ब्राँझ शेडची आयश्ॉडो आणि थोडं डोळ्यांना ठळक करणारं काजळ एवढा डोळ्यांचा मेकअप पुरे. सॅटिन फिनिशचं लिक्विड फाऊंडेशन किंवा बीबी क्रीम नॅचरल ग्लोसाठी पुरेसं आहे. थोडी लूज पावडर गरज असल्यास लावा आणि लुक पूर्ण करण्यासाठी रास्पबेरी शेडची लिपस्टिक सुंदर दिसेल.
  • सॉफ्ट मॅट ब्लश डे लुकसाठी चांगला. त्यासोबत सॉफ्ट पिंक किंवा पोवळ्याच्या रंगाचा लीप कलर छान दिसेल.
  • रोमँटिक संध्याकाळचा प्लॅन असेल तर किंवा डिनरचा बेत असेल तर स्मज्ड स्मोकी आइज मेकअपमध्ये हव्यात. मॅट ब्राऊन किंवा ब्लॅक शेड त्यासाठी वापरावी. तुम्हाला थोडं ग्लॅमरस दिसायचं असेल तर थोडी शीन किंवा चमकदार रंग त्यावर वापरा.
  • मेटॅलिक्स ही या सीझनची थीम आहे. त्यामुळे थोडे मेटॅलिक रंग मेकअपमध्ये वापरायला हरकत नाही.
  • महत्त्वाची टीप खूप सारा मस्कारा वापरल्याने डोळे मोठे दिसतात. स्मोकी आइज, डोळ्यांना हेवी मेकअप केला असेल तर ओठांना न्यूड मेकअप हवा. ग्लॉसी न्यूड शेडच वापरावी. याउलट डोळ्यांना कमी मेकअप आणि क्लीन लुक असेल तर ओठांसाठी बेरी कलर किंवा गडद लाल असे ब्राइट कलर वापरावेत.
  • हेअरस्टाइल क्लीन लुकसाठी मेसी बन, ब्रीडेड बन अशा हेअरस्टाइल चांगल्या दिसतील. रोमँटिक कँडल लाइट डिनरसाठी स्ट्रेट हेअर लुक क्लीन आणि क्लासी दिसेल. त्याबरोबर स्वीटहार्ट ब्रीड ट्राय करायला हरकत नाही. केसांच्या बटा काढून त्याच्या छोटय़ा वेण्या घालायच्या आणि त्या एकत्र करून लो बन बांधायचा. प्रवास करून जाणार असाल तर पटकन होणारी मेसी बन हेअरस्टाइल उत्तम.

(ओरिफ्लेमच्या ब्युटी एक्स्पर्ट आकृती कोचर यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)

viva@expressindia.com