सौरभ करंदीकर

कुरुक्षेत्रावर ऐन लढाईत अवसान गळालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश केला. ते ऐकूनदेखील परिणाम होईना, म्हणून अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलं. श्रीकृष्णाचं ते ब्रह्मांडव्यापी रूप अर्जुनाला पाहवेना. भगवंतांनी शेवटी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली तेव्हा कुठे त्याला ते दिसू लागलं. त्या सर्वव्यापी, महाप्रचंड रूपाचा हवा तो परिणाम झाला आणि अर्जुन लढायला तयार झाला. महाभारतातली ही गोष्ट आठवते ती यूटय़ूबवर ह्णपॉवर्स ऑफ टेनह्णह्ण नावाची फिल्म पाहताना. कुतूहल वाढवणारी आणि काही प्रमाणात भयभीत करणारी ही फिल्म पाहिल्यावर अर्जुनाची काय अवस्था झाली असेल त्याची थोडीशी कल्पना येते.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

१९७७ साली आयबीएम कंपनीने चार्ल्स आणि रे एम्स या डिझाईनर जोडगोळीला आपल्या ब्रह्मांडाचं दर्शन घडवणारी एक फिल्म बनवायचं काम दिलं. या फिल्मच्या सुरुवातीला एक जोडपं शिकागोमधील लेक मिशिगनच्या काठावरच्या हिरवळीवर पहुडलं आहे. निवेदक सांगतो की आता आपला कॅमेरा उंच उंच जाणार आहे. दर काही सेकंदांनंतर आपण जे पाहत आहोत त्याच्या दसपट भूभाग आपण पाहणार आहोत. वरून जमिनीवर पाहणारा कॅमेरा एक चौरस मीटर अंतर दर्शवतो. कॅमेरा वर जातो तसे शंभर चौरस मीटर दिसू लागतात, मग एक चौरस किलोमीटर प्रदेश दिसू लागतो. हिरवळीवरचं जोडपं हळूहळू दिसेनासं होतं. दहा, शंभर, हजार चौरस किलोमीटर असं करता करता कॅमेरा पूर्ण उत्तर अमेरिका दाखवू लागतो. थोडय़ा वेळातच पृथ्वीचा गोल दिसू लागतो. कॅमेरा काही थांबत नाही. पृथ्वी, चंद्र, मंगळ, बुध, शुक्र, सूर्य दिसू लागतात, काही वेळातच सूर्यमालिकादेखील दिसेनाशी होते, तारेदेखील पळत्या झाडांप्रमाणे मागे पडतात. सूर्यमालिका अदृश्य झाली तरी आकाशगंगेतील तिचं स्थान काही काळ दिसत राहतं. त्यानंतर पूर्ण आकाशगंगा दिसते. निवेदक दर काही सेकंदांनी आपल्या दृष्टिक्षेपात येणाऱ्या अंतराचं मोजमाप सांगत राहतो. आपली स्क्रीन ताऱ्यांप्रमाणे वाटणाऱ्या अनेक आकाशगंगांनी भरते. मानवाची नजर जिथपर्यंत पोहोचली आहे त्या सीमारेषेवर आपला प्रवास थांबतो आणि उलटय़ा दिशेने सुरू होतो. तो एक चौरस मीटपर्यंत. पुन्हा आपल्याला ते जोडपं दिसू लागतं, परंतु कॅमेरा थांबत नाही. तो जवळजवळ येत राहतो. पुरुषाच्या हातावर, हाताच्या पेशींमध्ये शिरतो. रक्तवाहिन्या, रक्तपेशी मागे पडतात, हळूहळू डीएनए प्रथिनं दिसू लागतात, त्यापलीकडे जाऊन आपण अणुरेणूंच्या जगात येतो. इलेक्ट्रॉन मागे पडतात. आपण अणूच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा आकाशगंगांच्या पलीकडचा प्रवास आपल्याला आठवतो. प्रोटॉन आणि क्वार्कसारखे इतर अतिसूक्ष्म कण दाखवल्यानंतर आपला प्रवास थांबतो, कारण मानवाची नजर इथपर्यंतच पोहोचली आहे.

पोटात गोळा आणणाऱ्या या प्रवासानंतर आपण काही क्षण विचारमग्न होतो. ब्रह्मांडाचं स्वरूप काहीसं नियमित, परंतु अनेक प्रकारच्या अनियमिततेनं भरलेलं आहे. मानवाने निर्माण केलेलं, आपल्या सौरमालिकेबाहेर पडलेलं, व्हॉयेजर अंतराळयान सोडलं तर आपली पोहोच ही निव्वळ नजरेची आहे. नुकताच प्रक्षेपित झालेला जेम्स वेब टेलिस्कोप ती दृष्टी अधिक प्रखर करेल इतकंच. अंतराळाचं एक वेळ सोडून देऊ, परंतु अणुरेणूंमधील अवकाशाचा मागोवा मात्र आपल्या आवाक्यात आहे.

अणुरेणूंपलीकडच्या सूक्ष्म जगाकडे पाहणाऱ्या, त्याचा अभ्यास आणि त्यावर प्रयोग करणाऱ्या, त्यातील रहस्यांचा उलगडा करू पाहणाऱ्या तंत्रज्ञानाच्या शाखेला ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ असं नाव आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन यांनी या नावाला प्रथम प्रसिद्धी दिली, ती १९५९ मधील आपल्या लेखामध्ये. ह्णनॅनोह्णह्ण या लॅटिन शब्दाचा अर्थ खुजा किंवा अगदी छोटा असा होतो. एका मिलिमीटरचे दहा लाख तुकडे केले तर एक नॅनो मीटर मिळतो. पाण्याचा रेणू एकदशांश नॅनोमीटर आकाराचा असतो. या आकारमानात पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलतात, अधिक बेभरवशाचे होतात हे आपण ‘क्वांटम कम्प्युटिंग’वरील लेखात पाहिलंत.

मूलद्रव्यांचे आणि संयुगांचे नॅनो आकारातील तुकडय़ांचे बदलते गुणधर्म जाणून घेऊन मानवाने या तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार घडवले आहेत. अनेक रासायनिक प्रक्रियांपासून अलिप्त राहणारा सोनं हा धातू नॅनो आकारात मात्र (अचानक जागृत झाल्यासारखा) उत्प्रेरक म्हणून काम करतो. ग्रॅफाइट (आपल्या पेन्सिलींमध्ये सापडणारं) या पदार्थावर प्रक्रिया करून ग्राफिन निर्माण केलं जातं. नॅनो स्वरूपातील ग्राफिन हे ग्रॅफाइटच्या तुलनेत अधिक विद्युतवाहक, तसंच तापमानाला अधिक चांगल्या रीतीने तोंड देऊ शकतं. ग्राफिन सौरऊर्जा देणाऱ्या सोलर पॅनलमध्ये वापरलं जातं, तसंच ते वैद्यकीय क्षेत्रातदेखील उपयोगाचं ठरतं.

शरीरातील विशिष्ट जागेपर्यंत किंवा विशिष्ट प्रकारच्या रोगी पेशींपर्यंत औषधांना नेण्याचं काम नॅनो पार्टिकल आणि नॅनो रोबोट करू शकतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या व्याधींवरील उपाययोजनांमध्ये नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवून आणू शकेल. टायटॅनियम डाय ऑक्साईडचे नॅनो कण सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट किरणांना शोषून घेतात म्हणून त्यांना सन-टॅन लोशनमध्ये वापरलं जाऊ लागलं आहे. इतकंच नाही तर सैन्यदेखील नॅनो कणांनी बनलेली, शत्रूला बेजार करणारी नॅनो डस्ट तयार करण्याच्या मागे आहे. इमारतींना लावल्या जाणाऱ्या रंगामध्ये विशिष्ट नॅनो कण वापरले तर चक्क ती इमारतच सौरऊर्जा निर्मिती करू शकेल का, या शक्यतेवरदेखील संशोधन सुरू आहे.

शास्त्रज्ञांनी नॅनो तंत्रज्ञानाचा पुरस्कार करता करता ह्णनॅनो प्रदूषणाचाह्णह्ण धोकादेखील दाखवला आहे. विविध प्रक्रियांनी निर्माण केले जाणारे अनेक नॅनो कण आपल्या पर्यावरणात कायमस्वरूपी वास्तव्य करतात. त्यातील काही विषारी कण मानवी शरीराला घातकदेखील ठरू शकतात. अतिसूक्ष्म आकाराच्या या धोक्यावर त्या आकाराच्या उपाययोजना निर्माण करणं ही नॅनो तंत्रज्ञांची जबाबदारी आहे. मात्र प्रगतीच्या आणि फायद्याच्या मागे असलेल्या उद्योगधंद्यांना अशा सामाजिक जबाबदारीचा आणि दूरदृष्टीचा अभाव असतो, असं इतिहास सांगतो. अनेक देशांप्रमाणे भारतानंदेखील राष्ट्रीय नॅनो तंत्रज्ञान धोरण आखलं आहे. त्याची अंमलबजावणी होते की नाही यावर युवा पिढीने तरी लक्ष द्यायला हवं.

viva@expressindia.com