गेल्या वर्षभरात डिक्शनरीत समाविष्ट झालेले नव्या पिढीचे काही ‘गिकी’ शब्द आणि नव्या संकल्पना. या शब्दांबद्दल आणि या नव्या पिढीच्या या बदलत्या भाषेबद्दल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

WDYT
आजची इ-जनरेशन इतकी फास्टफॉरवर्ड आणि टेक्नोसॅव्ही आहे की, त्यांच्या राहणीमानात, वागण्यातच नाही तर भाषेतसुद्धा बदल होताना दिसतात. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्स आणि सोशल नेटवर्किंगच्या या युगात इंग्रजी ही सर्वमान्य संवादाची भाषा बनली असली तरीही ऑनलाइन चॅटिंग आणि मेसेजिंगकरिता जगभरातली युवा पिढी वापरते ती इंग्रजी वेगळीच आहे. या इन्स्टंट मेसेजिंगची आपली अशी एक भाषा आहे. त्यात अनेक नवी संक्षिप्त रूपं, वाक्प्रचार, संकल्पना आहेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनं याची दखल घेतली. गेल्या वर्षभरात डिक्शनरीत भर पडलेले असेच काही नवे शब्द आणि त्यांचे अर्थ.. माहिती करून घ्यायलाच हवेत WDYT?

Ur fone’s oor. Me coming tomoz. Kept message with dad… ICYMI.
नुकत्याच व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह झालेल्या नेहाच्या आईला नेहाने पाठवलेला हा मेसेज. त्यांना पोरीनं काय लिहिलंय, नेमकं कुठल्या भाषेत लिहिलंय याचा थांगपत्ताच लागत नव्हता. कारण अध्र्याहून अधिक शब्द हे तिने शॉर्ट कटमध्ये लिहिले होते. यालाच आजची जनरेशन मोबाइल लिंगो म्हणते. म्हणजे मोबाइलवर मेसेज करताना, ट्विटरवर अपडेट करताना वापरली जाणारी शॉर्टकटची भाषा. भराभर टाइप करताना हल्ली अनेक शब्द संक्षिप्त स्वरूपात लिहिले जातात. Your  चं Ur होतं, तेव्हा आजकालच्या मुलांची काय ही भाषा आणि काय ते अशुद्ध लिहिता असाच सूर मोठय़ांकडून ऐकायला मिळतो खरा, पण आता यातले काही शब्द चक्क ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये समाविष्ट झालेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी वर्षांतून तीन वेळा अपडेट करण्याची पद्धत आहे. प्रत्येक तिमाहीत काही नवे शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले जातात. २०१४ मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत नव्याने समाविष्ट झालेल्या शब्दांमध्ये मोठय़ा प्रमाणावर या नव्या युगाच्या इंटरनेट सॅव्ही पिढीच्या वापरातले शब्द अ‍ॅड झाले आहेत. वरच्या वाक्यातले fone, tomoz, ICYMI हे नेहाचे शब्द आता डिक्शनरीत दिसतील.
आजची वायर्ड जनरेशन इतकी फास्टफॉरवर्ड आणि टेक्नोसॅव्ही आहे की बदल हे त्यांच्या राहणीमानात, वागण्यातच नाहीत तर बोलण्यात आणि भाषेतसुद्धा होताना दिसतात आणि याची दखल आता ऑक्सफर्ड डिक्शनरीनेसुद्धा घेतली आहे. एसएमएसच्या भाषेमध्ये लोकप्रिय असलेले काही शॉर्ट फॉर्म्स यात आहेतच. शिवाय काही नव्या जमान्याच्या वेगळ्या संकल्पनाही आहेत. काही वाक्प्रचारही आहेत. आजच्या डिजिटल जमान्यात सर्वमान्य भाषा इंग्रजी असली तरी व्यक्त होण्याची भाषा गिकी आहे. मोडतोड केलेलं इंग्रजी असं याकडे न बघता शब्दांचा वेगळा वापर असं बघायला मदत व्हावी आणि नव्या जमान्याशी नाळ तुटू नये, म्हणून हे प्रयत्न केले जात असावेत. म्हणूनच तरुणांच्या बोलीभाषेतील डकफेस, महुसीव, अल डेस्को अशा शब्दांना आता ऑक्सफर्ड डिक्शनरी स्थान मिळाले आहे.
इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅपवरून चॅटिंग करताना कमी वेळात आणि पटापट टाइप करताना शब्दाच्या संक्षिप्त रूपाची गरज भासते आणि ट्विटरसारखी शब्दमर्यादा असलेली सोशल नेटवर्किंग साइट वापरत असाल तर शब्द काटेकोरपणेच वापरावे लागतात. यामध्ये शब्दांची नाही तर कॅरॅक्टर्सची मर्यादा असते. त्यामुळे शब्दांचे शॉर्टकटच वापरले जातात. xlnt, fone, tomoz  हे शब्दसुद्धा आता ऑक्सफर्ड डिक्शनरीचा भाग आहेत. यात मूळ शब्दाची इंग्रजीतील स्पेिलग बदलून लहान करण्यात आली आहे. बोली भाषेतली नेहमीची वाक्य संक्षिप्तरूपात लिहिली जाऊ लागली आहेत. मत्रिणीने किंवा मित्राने WDYT  असं टेक्स्ट केलं तर त्याला त्यानं स्पेिलगमध्ये गल्लत केलीये अशा भ्रमात राहू नका. तुम्हाला ‘व्हॉट डू थिंक’ असं विचारण्याचा तो शॉर्टकट आहे. काही नवीन संकल्पनाही रुजू होत आहेत. सेल्फी म्हणजे काय, हे आता कुणाला सांगायला नको. स्वत:चा फोटो काढताना बऱ्याचदा ओठांचा चंबू करून विशिष्ट पोझ दिली जाते (इंग्रजीत ज्याला पाउट म्हणतात.) या पोझला किंवा फोटोला डकफेस म्हणण्याची पद्धत आली आहे आणि या शब्दाची दखलही ऑक्सफर्डने आपल्या अपडेट्समध्ये घेतली आहे. याशिवाय ऑनलाइन गेमिंगच्या जगातले काही शब्द respawn, permdeath सारखे शब्दही नव्याने समाविष्ट झाले आहेत.
या नवीन संकल्पनांची माहिती करून घायला हवी, नाही तर आजच्या या फास्ट फोरवर्ड जगात स्वत:ला अपडेट केलं नाही तर आउटडेटेड व्हायला वेळ लागणार नाही. तरुणाईच्या फास्ट आणि इन्स्टंट भाषेला आपलीशी करणारी ऑक्सफर्ड डिक्शनरी त्याबाबत प्रमाण मानली पाहिजे.
    
ऑक्सफर्ड शब्दकोशात समाविष्ट झालेले काही नवे शब्द आणि संज्ञा

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New word added for new generation in dictionary
First published on: 26-12-2014 at 01:33 IST