नोव्हेंबर-डिसेंबर महिना आला की फॅशन शो आणि वेगवेगळय़ा फॅशन प्लॅटफॉर्म्सवर नामांकित फॅशन डिझायनर्स, ब्रॅण्ड्सकडून खास विंटर कलेक्शन यायला सुरुवात होते. लॅक्मे फॅशन वीकचा विंटर सीझन होऊन गेला आहे. देशभरातून चार मुख्य राज्यांतून होणाऱ्या ‘ब्लेंडर्स प्राइड ग्लासवेअर फॅशन’ टूरची नांदी झाली आहे. करोनानंतर फॅशन बाजारपेठेत पुन्हा उभं राहण्याच्या दृष्टीने वेगवेगळय़ा फॅशन ई-कॉमर्स साइट्स आणि फॅशन लेबल्सकडून ऑटम-विंटर कलेक्शन्स सादर व्हायला लागले आहेत. ‘अ‍ॅमेझॉन फॅशन इंडिया’ने नोव्हेंबर-डिसेंबरमधील लग्नसराई आणि थंडीचा मौसम लक्षात घेत फेस्टिव्ह आणि ऑटम-विंटर कलेक्शन्स उपलब्ध करून दिलं आहे. ‘रिव्हर’ कलेक्शन नावाने अ‍ॅमेझॉन फॅशन ब्रॅण्डने नामांकित फॅशन डिझाइनर्सच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे प्रिंट, डिझाइन्सचे कलेक्शन मार्केटमध्ये आणण्यास सुरुवात केली आहे. यंदा ‘रिव्हर’चं तिसऱ्या पर्वाचं कलेक्शन उपलब्ध झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टाइलिश, फॅशनेबल कपडय़ांना गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: करोनानंतर मागणी वाढते आहे. हे लक्षात घेत अ‍ॅमेझॉन फॅशनने २०२० मध्ये ‘रिव्हर’ या नव्या फॅशनेबल ब्रॅण्डची सुरुवात केली होती. तिसऱ्या पर्वात फॅशन डिझाइनर्स नरेंद्र कुमार आणि राजदीप राणावत यांनी डिझाइन केलेले कलेक्शन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘गेल्या काही वर्षांत फॅशनेबल कपडय़ांना खूप मागणी आहे. फॅशनप्रेमींना वेगळं, हटके कलेक्शन देण्यासाठी फॅशन डिझाइनर्सनी डिझाइन केलेले कपडे सहज उपलब्ध करून द्यावेत हा आमचा ‘रिव्हर’ कलेक्शनमागचा उद्देश आहे. हे कलेक्शन त्यांना दुकानात किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर सहज उपलब्ध होणं गरजेचं आहे. फॅशन डिझाइनर्सनाही त्यांची डिझाइन्स मोठय़ा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ‘रिव्हर’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे’, अशी माहिती अ‍ॅमेझॉन फॅशन इंडियाचे प्रमुख आणि संचालक सौरभ श्रीवास्तव यांनी दिली.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: November december month fashion on platforms designers from brands winter collection ysh
First published on: 11-11-2022 at 00:02 IST