वेदवती चिपळूणकर परांजपे

नव्या वर्षांत पाऊल टाकल्या टाकल्या नवीन गोष्टींचे वेध लागतात. नवीन संकल्प, नवीन प्रोजेक्ट, नवीन काम, नवीन सजावट अशा अनेक गोष्टींनी प्रत्येकाला उत्साह आलेला असतो. हॉटेल्स, दुकानं, मॉल्स सगळयांना नवीन वर्षांत काही तरी नवं करायचं असतं. दरवर्षी सजावट, फॅशन, डिझाईन सगळयाचे ट्रेण्ड बदलतात. दरवर्षी नवीन थीम्स, नवीन रंग ट्रेण्डमध्ये येतात. कधी अचानक पेस्टल तर कधी पांढऱ्या रंगाची चलती येते. मग लग्नातसुद्धा नेहमीचे ब्राइट रंग सोडून पेस्टल शेड्सचे लेहंगा, साडी, डेकोरेशन वापरलं जातं. हे सगळे ट्रेण्ड्स कोण ठरवतं? कसं संपूर्ण मार्केट त्याभोवती फिरतं? याचं काही अंशी उत्तर दडलंय ‘पॅन्टोन कलर ऑफ द इयर २०२४’च्या अनाऊन्समेंटमध्ये!

Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?

‘पॅन्टोन कलर इन्स्टिटय़ूट’ ही १९९९ पासून अस्तित्वात असलेली इन्स्टिटय़ूट गेली अनेक वर्ष ‘कलर ऑफ द इयर’ ठरवते आहे. गेल्या वर्षी ‘विवा मजेंटा’ या रंगाला हा मान मिळाला होता, तर या वर्षी २०२४ साठी ‘पीच फझ्’ हा कलर ऑफ द इयर ठरला आहे. याचाच अर्थ या वर्षी कुठलीही गोष्ट डिझाईन करताना ‘पीच फझ्’ या रंगाचा प्रामुख्याने विचार केला जाणार.

हेही वाचा >>> सत्य संकल्पाचा दाता नारायण

पॅन्टोन इन्स्टिटय़ूटची हा रंग ठरवण्याची प्रक्रियाही अजिबात सोपी नाही. वर्षभरातल्या ट्रेण्ड्सचा अभ्यास करून, पुढच्या वर्षीच्या ट्रेण्ड्सचा विचार करून पॅन्टोन इन्स्टिटय़ूट ही दरवर्षी पुढच्या वर्षीचा रंग ठरवत असते. इन्स्टिटय़ूटचे उपाध्यक्ष लॉरी प्रेसमन यांच्या मते, दरवर्षी नवीन रंग हा त्या वर्षांचा ट्रेण्ड ठरवत असतो. त्या त्या वर्षीच्या मूडवर आधारित हा रंग निवडला जातो. पुढच्या वर्षी कोणत्या रंगाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, कोणत्या रंगाला मार्केटमध्ये उठाव मिळेल, लोकांची मानसिकता काय आहे, यावर ही रंगाची निवड अवलंबून असते. या प्रक्रियेत अनेक डिझाईन कंपन्या, डिझाईन स्टुडिओ, कलर स्टुडिओ सहभागी होतात. कोणत्याही व्यावसायिक उद्दिष्टांशिवाय हे लोक एकत्र येतात आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, लोकांचा कल लक्षात घेऊन, आधीच्या वर्षीचा आणि येत्या वर्षीचा उत्साह लक्षात घेऊन हा रंग निवडला जातो, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >>> फुडी आत्मा : अन्न हे पूर्णब्रह्म!!

या वर्षांसाठी निवडण्यात आलेल्या पीच फझ् या रंगाबद्दल थोडीशी माहिती घेऊ या. पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड गेली एक-दोन वर्ष मार्केटमध्ये दिसतो आहे. घराच्या िभतींपासून ते लग्नाच्या साडीपर्यंत आणि किचनमधल्या मगपासून ते शूजपर्यंत सगळया गोष्टींत प्राधान्याने पेस्टल शेड्स वापरल्या गेल्या. या वर्षी शांतता, उत्साह, फ्रेशनेस अशा गोष्टींना प्रोत्साहित करणारा रंग आणि अशा सकारात्मक गोष्टींचं प्रतिनिधित्व करणारा रंग म्हणून पीच फझ् या रंगाची निवड करण्यात आली आहे. पॅन्टोनचे पार्टनर असलेल्या मोटोरोलाने त्यांचे फोन, करीउमाने शूज आणि अल्ट्राफॅब्रिक्सने त्यांच्या फॅब्रिकमध्ये हे कलर ऑफ द इयर वापरले आहेत. कलर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेले रंग त्या त्या वर्षीचा सर्वांचा मूड दाखवतात. पीच फझ् या रंगात लक्झरी, कम्फर्ट, रॉयल फील आहे. त्यामुळे फॅशन आणि लाइफस्टाइल इंडस्ट्रीला हा रंग फायदेशीर ठरेल. पीच फझ् हा रंग शांतता आणि अंतर्मुखपणा दाखवणाराही आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे नवं वर्ष मन:शांतीचं, आत्मपरीक्षण करण्याचं, स्वत:ला महत्त्व देण्याचं, स्वत:चा विचार करण्याचं आहे. एकमेकांना समजून घेणं, प्रेमाने आणि सहानुभूतीने वागणं, माणसाला माणूस म्हणून वागवणं, या सर्व सामाजिक गोष्टींना नव्या वर्षांत महत्त्व असेल किंबहुना ते असावं म्हणून हा शांतताप्रिय आणि प्रेमळ वाटणारा रंग कलर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आला आहे. या वर्षीच्या कलर ऑफ द इयरचा सर्वात जास्त उपयोग मेकअप इंडस्ट्रीला होणार आहे. हेअरकलर, हायलाइट यासाठी हा रंग यंदा वेगळा उठून दिसणारा ठरेल. ब्लश, लिपस्टिक, नेलकलर अशा विविध सौंदर्य उत्पादनांमध्ये हा रंग या वर्षी दिसून येईल.

पॅन्टोनने या रंगाची निवड करताना ‘रोमॅंटिक, इनोसंट अ‍ॅण्ड स्वीट’ असं या रंगाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मुळातच गोड आणि शांत असा भाव असणाऱ्या या ‘पीच फझ्’च्या भोवतीच नव्या वर्षीचं सगळं रंगविश्व फिरलं तर नवल वाटायला नको!

viva@expressindia.com