पौगंडावस्थेत मुलगी आली की, तिला पहिला प्रश्न भेडसावतो पिंपल्सचा. सोळावं वर्ष धोक्याचं म्हणतात ते मुरुमांच्या बाबतीत अगदी सत्य आहे. मुरुम किंवा अ‍ॅक्ने, पिंपल्स केव्हा होतात? तेल आणि मृत त्वचेच्या पेशी चेहऱ्यांच्या रंध्रांमध्ये अडकतात तेव्हा पिंपल्स येतात. किशोरवयात किंवा प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या वर्षांत ही समस्या जास्त जाणवते. याच काळात, पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरात सर्वाधिक प्रमाणात टेस्टेस्टिरॉनची निर्मिती होते. ज्यामुळे तेलग्रंथींना (सेबम) अधिक तेलाची निर्मिती करण्यास चालना मिळते. या अतिरिक्त तेलामुळे त्वचेची रंध्रे बुजतात आणि मुरुमांची निर्मिती होते. यात रोगजंतूंचीही वाढ होते आणि जर ते इतर पेशींपर्यंत पोहोचले तर त्यामुळे सूज, लालसरपणा आणि पू निर्माण होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संशोधकांनी सिद्ध केले आहे की, मुरुमांचा संबंध आहाराशीदेखील आहे. तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तैलग्रंथींवर होत असतो. त्यामुळे मुरुमांना दूर ठेवायचं असेल तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आजच्या लेखात याविषयीच्या थोडय़ा टिप्स :

More Stories onफॅशनFashion
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to avoid pimples
First published on: 17-07-2015 at 08:42 IST