रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कणसाचा मोसम सुरू होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. पिकनिक स्पॉटला, समुद्रकिनारी, चौपाटीवर तर जागोजागी कणसाच्या गाडय़ा दिसू लागल्यात. भर पावसात भाजलेली कणसे खाण्याची एक वेगळीच मजा असते.
महाराष्ट्रामध्ये भटक्या जातीतील व आदिवासी लोकांचा मका हा मुख्य आहार आहे. पंचमहाल जिल्हय़ातील आदिवासी लोकांचा मका हा प्रिय आहार आहे. अनेक ठिकाणी सर्वसाधारण लोकही दैनंदिन आहारासाठी मक्याचा वापर करतात. मक्याचे रोप तीन-चार फूट उंच वाढत असते. ते ज्वारीच्या रोपाप्रमाणेच असते. मक्याच्या रोपाच्या गाठींमधून नवा अंकुर फुटत असतो. प्रत्येक रोपाला जास्तीत जास्त तीन कणसे लागत असतात. रोपाच्या षेंडय़ाशी एक तुरा येतो. हा तुरा जर पक्ष्यांनी खाऊन टाकला अगर तोडून टाकला, तर कणसामध्ये दाणे भरत नाहीत. मक्याचे दाणे सर्व धान्यांमध्ये मोठे असतात. मक्याच्या दाण्यांचा रंग पिवळा असतो. कित्येकदा लाल दाण्यांचीही कणसे बघायला मिळतात.
मक्याचे पीक तयार व्हायला तीन ते साडेतीन महिन्यांचा वेळ लागतो. मक्याचे दाणे लवकर खराब होतात. मक्याच्या कोवळ्या कणसाला गुजरातीत भुट्टा म्हटले जाते. मक्याची कोवळी भाजलेली कणसे भाजून खूपच स्वादिष्ट लागतात आणि पौष्टिकही असतात. मक्याच्या पिठापासून भाकरी बनवल्या जातात. मक्यापासून पोहे व चिवडाही बनवला जातो. कोवळ्या मक्याची भजी बनवली जातात. मक्यापासूच ढोकळे व वडेही बनवले जातात. पळसाच्या पानावर मक्याच्या पिठापासून बनवलेली भाकरी खूप गोड, स्वादिष्ट व पौष्टिक असते. या भाकरीला पानगी असेही म्हणतात. पंजाबमध्येही मक्याच्या पिठाच्या भाकरी फार प्रसिद्ध आहेत.
मक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तेलाचा अंश असतो. म्हणनूच मक्यापासून तयार केलेल्या पोळ्या खुसखुशीत असतात.
 आजकाल बऱ्याच कंपन्या मक्याचे तेलसुद्धा काढतात. हे तेल पिवळ्या रंगाचे असते व याला कुठल्याही प्रकारचा विशिष्ट वास नसतो. इतर तेलांच्या तुलनेत स्वस्त आहे. पुढील दोन आठवडे आपण मक्यापासून तयार होणाऱ्या थोडय़ा वेगळ्या पदार्थाची मजा घेऊ.

बेबी कॉर्न मसाला
साहित्य : जैन ग्रेव्ही १ वाटी, बेबी कॉर्न ८- १० नग, मीठ, साखर चवीनुसार, जिरे अर्धा चमचा, दही एक चमचा, हळद तिखट चवीनुसार, धने जिरे पावडर १ चमचा, कोिथबीर
कृती : पातेल्यात एक चमचा तेल घेऊन त्यात जिरे घालून तडतडल्यावर जैन ग्रेव्ही, हळद, तिखट, धने-जिरे पावडर बेबी कॉर्न व चवीनुसार मीठ, साखर, एक चमचा दही किंवा िलबू पिळून मिश्रणाला तेल सुटेस्तोवर परतावे. कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करावे.
टीप : १) ही भाजी थोडीशी तिखट करावी. कारण बेबी कॉर्न तसे चवीला गोडसर असतात. बेबी कॉर्नऐवजी तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता.
२) चव बदलण्यासाठी तिखटाचा वापर कमी करून मीरपूड वापरा.

कॉर्नी ग्रेव्ही
साहित्य : दूध अर्धा लिटर, कोवळी मक्याची कणसे २, बारीक कापलेलं आलं-लसूण २ चमचे, बारीक कापलेला कांदा अर्धा वाटी, बटर २ चमचे, लहानशा हिरव्या मिरच्या ३-४, टोमॅटो प्युरी ५ चमचे, हळद अर्धा चमचा.
कृती : मक्याची कणसे स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करावेत किंवा त्याचे दाणे काढून थोडय़ा दुधाबरोबर हे मिश्रण कुकरमध्ये तीन शिट्टय़ा येईपर्यंत शिजवावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करावे. फ्राय पॅनमध्ये लोणी घेऊन कापलेलं आलं, लसूण, कांदा, हिरवी मिरची परतल्यावर त्यात वरील मिश्रण टाकावे. टोमॅटो प्युरी व चवीला मीठ, साखर घालावी. ही ग्रेव्ही तशीही खायला चांगली लागते.

कॉर्न राइस
साहित्य : बासमती तांदूळ १ वाटी, पाणी २ वाटय़ा, साखर १ चमचा, मीठ चवीनुसार, अमेरिकन कॉर्न १ कप, चीज क्युब २ वडय़ा, पांढरी मिरी पावडर अर्धा चमचा, खारं लोणी १ चमचा.
कृती : मायक्रोव्हेवमध्ये तांदूळ, पाणी, मीठ आणि साखर एकत्र मिसळून उच्च दाबावर (900W/max/100 % )१० मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये ठेवून शिजवून घ्यावे. काटय़ा चमच्याने शिजलेला भात हलक्या हाताने मोकळा करून त्यात कॉर्न किसलेले चीज, मिरी पावडर, बटर आणि लोणी मिसळून घ्यावे. थोडे पाणी िशपडून पुन्हा एकदा झाकनू उच्च दाबावर (900W/max/100 % ) ४ मिनिटे ठेवावे. नंतर तापमान कमी करून वर (900W/max/100 % )  ६ मिनिटे ठेवावे. १० मिनिटांनंतर मायक्रोव्हेवमधून काढून गरम कॉर्न राइस वाढावा.

कॉर्न कबाब (तळलेले)
साहित्य : मक्याचे दाणे जाडसर दळलेले, बटाटा उकडलेला  २ वाटय़ा, मक्याचे पीठ १ वाटी, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोिथबीर यांची पेस्ट ४ चमचे, कसुरी मेथी १ चमचा, धणे-जीरे पावडर २ चमचे, तेल – तळायला.
कृती : फ्राय पॅनमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यात जिरे घालावे. त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण थोडं भाजल्यावर उरलेले सगळे मसाले, कोिथबीर घालून खमंग भाजणे. नंतर हा मसाला मक्याच्या पीठात व बटाटय़ामध्ये मिसळणे. गोलसर चपटे कबाब तयार करून डिपफ्राय करणे. सव्‍‌र्ह करतेवेळी चाटमसाला, पुदिना चटणी व कचुंबर बरोबर सव्‍‌र्ह करा.
टीप : मक्याच्या पीठात तेलाचा अंश असल्यामुळे कबाब खुसखुशीत होतात. त्यामुळे त्यात मोहन किंवा सोडा घालू नये.

कॉर्न नान कटाई
साहित्य : मक्याचे पीठ २ वाटी, पिठी साखर १ वाटी, लोणी पाऊण वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ चिमूटभर. थंड पाणी भिजवायला.
कृती : सर्व जिन्नस लोण्यामध्ये मिसळून जरुरीपुरते थंड पाणी घालावे व छोटे चपटे गोळे करूरुन वर एक एक काजूचा तुकडा लावावा. १८० डीग्रीवर ८ ते १० मिनिटे बेक करावे.

बेक स्पीनॅच कॉर्न
साहित्य : बारीक चिरलेला पालक २ वाटय़ा, व्हॉइट सॉस ३ वाटय़ा, बटर २ चमचे, काळी मिरी पावडर चवीनुसार, चीज, स्वीट कॉर्नचे दाणे १ वाटी
कृती : सर्व सामुग्री एकत्र करुन चीज घालावे. ओव्हन मध्ये ब्राउन होईस्तोवर बेक करुन बेड बरोबर सव्‍‌र्ह करावे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnus menu card corn dishes
First published on: 20-09-2013 at 01:04 IST