गेल्या आठवडय़ात ‘व्हिवा’ पुरवणीमध्ये (दि. २६ डिसेंबर) सरत्या वर्षांचा मागोवा घेण्यात आला.  २०१४ वर्ष लक्षात राहील ते मोदी लाटेमुळे झालेल्या अपेक्षित बदलासाठी, यामधून तरुणाईत सकारात्मकता दिसली. पण २०१४ नंतर आता २०१५ चे स्वप्न बघणाऱ्या तरुणाईचा थोडय़ा या दृष्टीकोनातूनही विचार व्हावा..  आय फोन 6 च्या लाँचिंग बरोबर आम्हाला माळीण गावाच्या पुन्हा लाँचिंग होण्यात अधिक रस आहे. स्वच्छ भारत अभियान अधिक बळकटीने होत आहे, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. चित्रपट जगामध्ये विनोदी, करमणूकप्रधान चित्रपटांच्याबरोबरीने ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सारखे समाजाच्या मूळ समस्येला हात घालणारे चित्रपटही यशस्वी होताहेत, ही आम्हाला चांगली गोष्ट वाटते. थोर लोकांच्या जीवन चरित्रावर आधारलेल्या चित्रपटांना अधिक वाव मिळत आहे, तो आम्हा तरुणाईच्या बदलत्या दृष्टिकोनामुळेच! सत्यार्थीनी ज्यासाठी संघर्ष केला त्यासाठी त्यांना २०१४ मध्ये नोबेल मिळाले, पण त्यांचे काम अजून प्रभावी करण्यासाठी आम्ही तरुण २०१५ मध्ये कटिबद्ध राहू. थोडक्यात, भारताला खऱ्या अर्थाने स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनविणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तरुणाईने अग्रेसर राहणे ही २०१५ कडून अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमची मतं, प्रतिक्रिया पाठवा
नवीन वर्षांची सदरं कशी वाटली, आपल्या मनातली गाणी कोणती, आपल्या शंका, आपले विचार, व्हिवा पुरवणीतील लेखांविषयी आपली मतं आमच्यापर्यंत जरुर पोचवा. तुमची पत्र आमच्या viva@expressindia.comकिंवा viva.loksatta@gmail.com  या इ मेल वर पाठवा. पत्रासोबत आपलं एक छायाचित्रही पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये @व्हिवा पोस्ट असं लिहायला विसरू नका.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva post
First published on: 02-01-2015 at 12:58 IST