हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
वाचन आवडणारा प्रत्येक जण आपापल्या परीनं अक्षरजगाला न्याहाळतो. त्यात सटरफटर विषय, अभ्यास, उपयुक्त माहितीपासून ते खाणं, भटकंती करंट अफेअर्सपर्यंत नाना विषयांचा समावेश होतो. ही वाचनभूक भागवण्याकरिता ई माध्यम उपलब्ध झाल्यानं धावत्या काटय़ाशी स्पर्धा करणाऱ्या सगळ्यांच्या ‘मुठ्ठी में’ शब्दांची दुनियाच एकवटली. ईपेपर्सपासून ते ढीगभर विषयांच्या ब्लॉग्जपर्यंत, देशी-विदेशी रिसर्चपासून ते ईबुक्सपर्यंत शेकडो पानांचा मजकूर क्लिकसरशी पुढय़ात आला. शब्दसंख्येची मर्यादा नसल्यानं हा मजकूर सेव्ह केला जाऊ लागला. डिव्हाईसेस भराभर अपडेट केली गेली. पुस्तकांच्या कागदासाठी केलेली वृक्षतोड कणभर कमी झाली. अभिव्यक्तिस्वातंत्र्यामुळं आता मनातलं.. आतलं.. लिहिता आलं.. तरी त्याला काही वेळा हेतू-सहेतूचा खरपूस वास येऊ लागला.. या माध्यमाची सकारात्मक ताकद आपल्या ‘क्लिक ’सरशी वाढवणं आपल्याच हाती आहे. आपापल्या ई-रीडिंगविषयीची मतं काही जणांनी ‘व्हिवा वॉल’शी शेअर केली आहेत.
शलाका चौघुलेप्रवासवर्णनं, ट्रेकिंग आणि इतर वैविध्यपूर्ण विषयांवरचे लेख मी अधिकांशी वाचते. परदेशस्थ मराठी मंडळींनी लिहिलेले ब्लॉग्ज वाचायला मजा येते. एरवी मी पुस्तकंही वाचते. पण दरवेळी पुस्तकं कॅरी करणं शक्य होत नाही. त्याऐवजी मोबाइलवर ब्लॉग्ज वाचणं सोपं जातं. हे खरं असलं तरी पुस्तक वाचण्याचा इम्पॅक्ट नि ते वाचतानाचं फीलिंग शब्दांत सांगणं कठीण.. म्हणूनच घरी असताना मी ऑनलाइन वाचनापेक्षा पुस्तक वाचण्याला प्राधान्य देते. पुस्तक लिहिताना लेखक खूप जबाबदारीनं लिहीत असतो. त्याच्यावर एक प्रकारची सेन्सॉरशिप असते. तर नेटवर लोक खूप ओपनमाइंडेडली लिहितात. तिथं कोणतीही आचारसंहिता नसते. मग काही वेळा थोडं कमर्शिअल पॉइंट ऑफ व्ह्य़ूनं लिहिलं जातं, असं वाटतं.
http://vivektavate.blogspot.in/ – ट्रेकिंग.
http://manasibrid.blogspot.in/ – ललित
http://cooldeepak.blogspot.in/ – पु. ल. प्रेमींसाठी.
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.in/ – ललित लेख
http://vidyabhutkar.blogspot.in/2006/11/blog-post.html – लेख
गायत्री फडणीसट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यानं बरेचवेळा ज्या विषयाबद्दल ट्रेनिंग द्ययचंय, त्या विषयाशी संबंधित माहिती शोधणं महत्त्वाचं असतं. अशा वेळी ई-रीडिंग खूप सोईस्कर नि उपयोगी पडतं. आपलं नेहमीचं काम करता करता एकीकडं आर्टिकल्स, इतरांनी देशविदेशात केलेल्या रिसर्चची समरी, विविध ठिकाणी होणाऱ्या परिषदांचे अहवाल, ट्रेनिंग्ज देणाऱ्या इतर कंपन्यांच्या पद्धती, त्या हाताळत असलेले विषय हे सगळं एका क्लिकवर बघता येतं. ही सेव्ह केलेली माहिती नंतर वाचता येते. निवडक मराठी-इंग्रजी ई-पेपर्स वाचत असल्यानं आमच्याकडं वीकएण्डलाच छापील पेपर येतो.
http://www.mindtools.com/index.html
http://www.12manage.com/
http://www.thehindu.com/
http://epaper.loksatta.com/
मंजिरी पाठकअभ्यासाला असणारी पुस्तकं मी डाऊनलोड करून वाचते. बाकी अवांतर वाचनामध्ये नॉव्हेल्स वगैरे वाचते. बिल गेटसंचं ‘द रोड अहेड’ हे पुस्तक मी आधीही वाचलं होतं नि आता पुन्हा वाचतेय. तसंच ‘रोड लेस ट्रँव्हल्ड’ हे मॉर्गन स्कॉट पीक यांचं पुस्तकही मला आवडलं. गिरिप्रेमी नि सुधा मूर्तीचे ब्लॉग्ज वाचते. प्राची-मंजिरी हा ब्लॉग मैत्रिणीसोबत लिहितेय. एरवी मराठी-इंग्रजी पुस्तकं विकत घेऊन वाचली जात असली तरी ईबुक्स नेटवर लवकर उपलब्ध होतात. त्यामुळं खूपच वेळ वाचतो. पेनड्राईव्हमध्ये चिक्कार डेटा सेव्ह करता येतो. एरवी ज्या कविता पटकन मिळणार नाही, असं वाटतं त्या एका सर्चनं मिळतात. अशी सर्च करताना मिळालेली रे. टिळकांची ‘पांखरा! येशील का परतून?’ ही कविता मला खूप आवडते.
http://www.direct.com/- सायन्स
http://pubs.acs.org/journal/orlef7
– स्टडीज
http://amitjoshitrekker.blogspot.in/
– ट्रेकिंग
http://www.ataglanceseries.com/, http://www.amazon.com/ – पुस्तकं
सायली चव्हाणमी ईपेपर्स नि जनरल विषयांचे ब्लॉग्ज वाचते. भूगोल या माझ्या अभ्यासविषयाच्या लिंक बघते. अब्राहम थॉमस यांचं एरिअल फोटोग्राफीविषयीची लिंक, Saskia Sassen यांचं Territory, Authority, Rights : From Medieval to Global Assemblages, ‘अर्बन जिओग्राफी ए ग्लोबल परस्पेक्टिव्ह’ हे मिशेल पॅसिन यांचं पुस्तक, लवासा सिटी गाईड इत्यादी पीडीएफ फाइल-पुस्तकं वाचते. जनरल विषयांमध्ये जास्तीकरून पॉलिटिक्सवरचं लिखाण वाचते. आपला अधिकांशी वेळ प्रवासात जात असेल तर किंडलवर पुस्तकं वाचणं सोयीचं ठरतं. द हिंदूसारखा पेपर प्रिंट होऊन दोन दिवसांनी शिळा झाल्यावर आपल्याकडं मिळतो. तो ताजा वाचायला मिळतो.
http://blogs.timesofindia.indiatimes.com/
http://www.thehindu.com/books/
http://epaper.loksatta.com/
http://www.isrj.net/
http://www.deccanchronicle.com/
अजय एन.एक सजग नागरिक आणि माझ्या अभ्यासविषयाचा एक भाग म्हणून मी पॉलिटिक्स आणि करंट नॅशनल अफेअर्सविषयीचे ब्लॉग वाचतो. देशभरात चाललेल्या नानाविविध घडामोडी जाणून घेण्यात मला रस आहे. मग तो सिंधूरत्नचा अपघात असो किंवा इतर काही घटना. या ब्लॉग्जपैकी काही ब्लॉग्ज माजी आयपीएस ऑफिसरनी लिहिलेले आहेत. विषयानुरूप आपापली मतं ते प्रदर्शित करतात. घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई, गरिबी इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या अस्वस्थ भारताची स्पंदनं समजून घ्यायचा मी प्रयत्न करतोय.
http://kiran-bedi.blogspot.in/
http://www.indiblogger.in/blogger/19584/
http://www.oldsaltblog.com/2014/03/two-officers-die-seven-sailors-injured-in-fire-on-indian-submarine-sindhuratna/
मोहित खडकेमी खाणं आणि ट्रॅव्हलिंग या विषयावरचे ब्लॉग्ज अधिकांशी वाचतो. ज्या ठिकाणी आपण स्वत: बऱ्याचदा जाऊ शकत नाही, ती ठिकाणं नि तिथल्या लोकजीवनाविषयी आपली उत्सुकता शमवणारे बरेच ब्लॉग्ज आहेत. एनडी टीव्ही गुडटाइम्सची शोअँकर किम जॅगतिनि ही तिच्या प्रवासाबद्दल आणि हायवे ऑन माय प्लेट या शोचा अँकर रॉकी सिंग आपल्या नॅशनल हायवेलगतच्या धाबे आणि हॉटेल्सबद्दल आपापल्या ब्लॉगमध्ये लिहितात. मोनिका गोवर्धनच्या रेसिपीज चटकन करता येण्याजोग्या असतात. अशा ब्लॉग्जवर लिहिलेल्या काही सोप्या रेसिपीजपैकी काही मीही ट्राय केल्यात. त्यातली डाल-बाटीची रेसिपी मित्रांना खूपच आवडली होती. बऱ्याचदा ब्लॉगर्स आपापल्या दृष्टिकोनातून लिहितात. काही वेळा त्यांचं बोलणं आपल्याला पटत नाही. आपल्याला काही तरी वेगळं एक्स्पेक्ट असतं. उदा. ट्रॅव्हल ब्लॉग्जवर लिखाणासोबत जास्तीत जास्त फोटो अपलोड करावेत, असं वाटतं. कारण त्या ठिकाणाचंच वर्णन जास्त केलं जातं.
http://goodtimes.ndtv.com/blog_more_comment.aspx?blog_id=330&cp
http://goodtimes.ndtv.com/blog_more_comment.aspx?blog_id=370&cp
http://maunikagowardhan.co.uk/
http://anotherpunefoodblog.blogspot.in/