गायत्री हसबनीस

फेस्टिव्हल सीझन हळूहळू जवळ येत जातो, तसं बऱ्याच गोष्टींचा विचार मनात सुरू होतो, ज्यात कपडेखरेदीचा विचार सर्वात अग्रणी असतो. फेस्टिव्हल म्हटलं की एथनिक वेअरचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. दुपट्टा, कुर्ता, लेहेंगा, पायजमा, लेगिंग्स, जॅकेट, शरारा यांचा समावेश बऱ्यापैकी कपडय़ांमध्ये असतो, मात्र यंदा साडी आणि त्यातील विविध वेस्टर्न प्रकार तुम्ही नक्की अजमावू शकता!

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
china sinking
न्यूयॉर्क आणि टोकियोनंतर चीनमधील शहरेही जलमय; जगातील ‘ही’ शहरे पाण्याखाली जाण्याचे कारण काय?
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न

साडी कलेक्शन यंदा खूप मॉडर्न आणि फ्रेश आहे. आताचा साडय़ांचा लुक हा वेस्टर्न असल्याने त्यावर हेवी ज्वेलरी नाही, फार तर सिंगल लेअर आणि एसिमेट्रिकल ज्वेलरी आपण वापरू शकतो. तसं पाहायला गेलं तर पैठणी, नववारी, कांजिवरम साडय़ांना वेस्टर्न लुक देणारे काही प्रकार हमखास पाहायला मिळतात. नववारीबरोबरच पाचवारी आणि सहावारी साडय़ांमध्येदेखील मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहेत. चारही दिशांना वैविध्यपूर्ण साडय़ांचे प्रकार आता सूट आणि पॅन्ट्समध्ये समाविष्ट झाले आहेत. मुघलाई, पेशवाई, जरीच्या साडय़ा, शालू, पैठणी यांच्या ड्रेपिंगच्या पद्धती, प्रिंट्स, फॅब्रिक्स, रंग यांना विविध प्रकारच्या कॅज्युअल वेअरमध्ये आणून यांचे एकत्रित कॉम्बिनेशन्सही केले जात आहेत. उदाहरणार्थ, नववारीची ड्रेपिंग आणि पैठणीचे फॅब्रिकयांना एकत्र करून पॅन्ट आणि जॅकेट व त्यावर पदर असा फंडा वापरला जातो आहे. उत्तरेकडील झारी व बनारसी, दक्षिणेकडील कांजिवरम, पूर्वेकडील तांत साडी आणि महाराष्ट्रातील पैठणी अशा बऱ्याच पारंपरिक साडय़ा वेस्टर्न फ्यूजनमध्ये आल्या आहेत. त्यातून एक वेगळा लुक आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळा साज चढेल. खरं तर यातून साडीला जास्त आरामदायी आणि सहज परिधान करण्याजोगं बनवण्याचा डिझायनर्सचा एक वेगळा प्रयोग आहे. ज्यातून साडीसारखी पारंपरिक वस्त्रं ड्रेप करायला ईझी होतील आणि कुठल्याही वयोगटातील मुलीला सुटेबल असतील.

साडी नेसण्याचे परिश्रमही या फ्यूजन प्रकारांमुळे कमी झाले असून त्याला आधुनिक व कन्टेम्पररी लुकही मिळाला आहे. साडीचे महत्त्व कमी न करता त्याला एक फक्त नवं रूपडं देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे यात जे काही नवेकोरे ट्रेण्ड येऊ पाहात आहेत ते नव्या पद्धतीने सगळीकडे अजमावले जात आहेत. असेच काही प्रकार ‘लिवा’ या ब्रॅण्डने आणले आहेत. त्याबद्दल बोलताना बिर्ला सेल्यूलोझच्या पूजा अग्रवाल म्हणतात, ‘‘साडय़ांमध्ये सध्या विविध प्रकार ज्या गतीने जगासमोर येत आहेत व ओळखले जात आहेत तसे प्रकार मार्केटमध्ये आणणंदेखील तितक्याच वेगाने शक्य झालं आहे. ज्यात पैठणीपासून चंदेरी आणि फुलकारी साडय़ांचाही समावेश आहे. आजही साडीचा वापर फेस्टिव्हल सीझनमध्ये हमखास केला जातो. बनारसी साडय़ांना तशी जोरदार मागणी असते ज्यात गोल्ड-सिल्व्हर ब्रोकेड किंवा जरी आणि सिल्क, एम्ब्रॉयडरीचा समावेश असतो. बनारसी साडय़ांमध्ये यंदा निळा, हिरवा आणि लाल रंग ट्रेण्डमध्ये असेल, ज्यात गोल्डन जरीला विशेष करून महत्त्व असेल. बनारसीसोबत पैठणीही तितकीच ट्रेण्डमध्ये राहील ज्यात केशरी, निळा आणि पॅरट ग्रीन असे रंग ट्रेण्डमध्ये राहतील. या सीझनला या साडय़ांचे वेस्टर्न फ्यूजन ज्यात पॅन्ट साडी, साडी आणि क्रॉप टॉप, साडी आणि जॅकेट असे काही आऊ टफिट्स ट्रेण्डमध्ये राहतील.’’ याच पारंपरिक साडीमध्ये येऊ घातलेले हे आधुनिक प्रकार आधी समजून घेतले पाहिजेत.

पॅन्ट साडी

तसं पाहायला गेलं तर लहानपणी शिवलेल्या साडीसारखीच ही साडी भासते. शिवून रेडीमेड मिळणाऱ्या साडय़ांचा काहीसा हुबेहूब नमुना म्हणजे पॅण्ट साडी आहे असं म्हणायला काही हरकत नाही; परंतु याची रचना ही फार ओपन आहे. यात ब्रोकेड एम्ब्रॉयडरी आणि सिल्कचा कपडा जास्त खुलवता येतो. मसाबा गुप्ता या डिझायनरने मागच्या सीझनलाही काहीसा असाच लुक आणला होता जो या सीझनलाही हमखास पाहायला मिळेल. ब्रोकेडप्रमाणेच फॉइल प्रिंट्सही यात प्रामुख्याने पाहायला मिळतील, कारण क्रेप, सिल्क, कॉटन, सिल्क – कॉटन अशा फॅब्रिकच्या या पॅन्ट साडय़ा असल्यामुळे त्यावर सिल्व्हर कुंदन किंवा चंदेरी आणि सोनेरी प्रिंट्स चांगल्याच उठावदार दिसतात. या फॅ ब्रिकमध्ये फिकट रंगाच्या गडद छटा म्हणजे डार्क पिस्ता, गुलाबी, निळा, पिवळा, राखाडी असे रंग आहेत. वेलवेट रंग तसेच मिडनाइट शेड्सही छान खुलून दिसतात. मेरीगोल्ड प्रिंट्समध्ये सध्या पॅण्ट साडय़ा आहेत. ज्यामुळे क्रॉप टॉपवर पॅण्ट साडी घालताना एकाच प्रिंटचा ऑप्शन खूप स्मार्ट वाटतो. क्रॉप टॉपमध्ये कॉलर, नेट, स्लीवलेस, स्ट्राइप्स, लेस शोल्डर, ऑफ शोल्डर, कोल्ड शोल्डर असे नानाविध प्रकार आहेत. डेनिम पॅण्ट साडीही तुम्हाला यात मिळेल, परंतु फेस्टिव्हल सीझनचा मोह असल्याने विविध डिझायनर पॅन्ट साडीचे पर्याय उपलब्ध आहेत. साडीच्या पदराच्या डिझाईनपासून ते बॉर्डरवरही खूप एम्ब्रॉयडरी आहे. निऱ्यांमध्येही विविध हटके डिझाईन्स उपलब्ध आहेत. त्यातून टाय अ‍ॅन्ड डाय, फ्लोरल, कॉटन, प्लेन सिल्क असे प्रकारही मिळतील. या पॅन्ट साडीवर तुम्ही डिझायनर जॅकेट आणि डिझायनर बेल्टही घालू शकता. जरीच्या किंवा कांजिवरम साडय़ांसाठी चुणीदार आणि पॅन्टही उपलब्ध आहेत. ज्यावर तुम्ही जरीच्या आणि कांजिवरम साडय़ांचा पुरेपूर वापर करून घेऊ  शकता.

लेहेंगा साडी

या साडीत तुम्हाला ब्रायडल आणि फेस्टिव्हल लुकही मिळेल. यामध्ये लेहेंग्याच्या स्टाईल्समध्ये विविध प्रकार आहेत. धोती साडी, सेमी स्टीच्ड लेहेंगा साडी, लेहेंगा आणि क्रॉप टॉप व त्यावर पदर असा काहीसा आगळावेगळा लुकही यात आहे. खरं तर भरगच्च एम्ब्रॉयडरी आणि फॅब्रिकचा योग्य वापर व रंगसंगती यामुळे लेहेंगा साडीला एक वेगळीच चमक येते. गौरांग शहा या डिझायनरदेखील यंदा लेहेंगा साडीचा फंडा आणलाय. त्यात त्याने पैठणी साडय़ांचा वापर केला असून लेहेंग्यावर पेशवाई एम्ब्रॉयडरी आखली आहे, त्यातून वेगळ्या धाटणीच्या लेहेंग्याची स्टाईल समोर येते. एक तर लेहेंग्याला जाड बॉर्डर असल्याने साडीच्या बॉर्डरचा भाग त्याने कमी ठेवला आहे. ज्यामुळे त्याला बऱ्यापैकी कमरपट्टा किंवा लटकनचा लुक देऊन अशी लेहेंगा साडी जास्त मिरवता येते. येथे पदराला नेट, फ्लोरल, रफल, एम्ब्रॉयडरी, ब्रोकेड, बॉर्डर, लेस आणि कटिंग्सचा लुक अगदी एथनिक वाटतो. लेहेंगा साडीमध्ये रेट्रो लुकही यंदा अवतरला आहे. ज्यात बलून आणि फ्लर्सची बॉर्डर साडय़ांवर उमटली आहे. यामध्ये क्रॉप टॉपला चकचकीत लुक दिलाय. उदाहरणार्थ, सिमेट्रिकल आणि एसिमेट्रिक पद्धतीचे डिझाईन्स, शिमर, डायमंड, टिकल्यांची एम्ब्रॉयडरी, ग्लास वर्क आणि ओथेंटिक एम्ब्रॉयडरी आहे. यात पदराचा भाग गुजराती स्टाइलनेही तुम्ही घेऊ शकता.

द हाफ साडी

हा प्रकार थोडासा नवीन आणि आधुनिक आहे. यात प्रामुख्याने साडीचा पदर आणि निऱ्यांचा भाग हायलाइट होतो. यामध्ये कलमकारी साडी, इकत आणि जरी साडी यांचा समावेश आहे. याची रचना अशी की निऱ्यांचा भाग खूप जास्त फुलवला जातो आणि पदराला मोठे केले जाते. क्रॉप टॉपखाली निऱ्यांचा भाग येतो आणि त्यावर लांबसडक पदर दुपट्टय़ाप्रमाणे परिधान केला जातो. या पदराला आणि निऱ्यांना विविध प्रकारच्या बॉर्डर्स आहेत. तसेच निऱ्यांकडच्या फुलोऱ्यात विविध फ्लोरल, पिकॉक, बोटनिकल, फेदर यांच्या कलरफुल एम्ब्रॉयडरी आहेत. हा प्रकार आता हळूहळू रुजतो आहे आणि त्यामुळेच यात विविध प्रकारच्या एम्ब्रॉयडरीला खूप स्कोप आहे.

साडी गाऊन

हा प्रकार जास्त आधुनिक, पण एथनिक आहे. या प्रकारात बऱ्यापैकी आपल्याला शेड्स मिळतील आणि न्यूड व शिमरचा फंडा यातही विशेष करून दिसून येईल. यामध्ये ब्लाऊ जला खूप विविध ढंगात स्टायलिश आपण बनवू शकतो, कारण यात गाऊनसारखी साडीची उंचीही बऱ्यापैकी मोठी असते. त्यातून पूर्ण बॉडी गार्मेटला साडी गाऊनमुळे एक वेगळाच लुक येतो. ब्लाऊजसाठी हाताकडचा भाग कोल्ड शोल्डर आणि रफल्सप्रमाणे ठेवता येऊ  शकतो, कारण त्यातही सिंपल डिझाईन्स वापरले जातात. ब्लाऊजमध्ये ऑफ शोल्डरचे पर्याय अगदी सहज योग्य वाटतील, कारण यंदा फेस्टिव्हल सीझनला ऑफ शोल्डरमध्ये विविध डिझाईन्स पाहायला मिळतील. यात प्रामुख्याने क्रिसक्रॉस, टेम्पल, सिमेट्रिकल आणि कलमकारी डिझाईन्स आहेत. तरुण ताहिलियानी या डिझायनरनेदेखील साडी गाऊ न्स आणले आहेत त्याने एसिमेट्रिकल साडी गाऊन्सवर भर दिला आहे, ज्यात बहुधा सिल्क आणि नेटच्या साडीवर डायमंड आणि मिरर वर्कचा साज आहे. यावरही तुम्ही डिझायनर बेल्ट आणि जॅकेट घालू शकता. साडी गाऊनमध्ये वेगळा टिवस्टही आणता येतो. उदाहरणार्थ, ब्लाऊ जच्या सेंटर, मिडल आणि बॅक या साइडला फ्लोरल, रफल्स, आणि क्लोज लुक आणून प्लेन साडीचा लुक देऊ  शकतो. साडीच्या पदराला येथे हवं तसं ड्रेप करता येईल. मुळात साडी गाऊनची खासियतच अशी आहे ज्यात आपण विविध ड्रेपिंगचे फंडे वापरू शकतो.