या वेळच्या निवडणुकांमध्ये देशाचं भविष्य तरुणांच्या हाती, असं चित्र निर्माण केलं होतं. पण आजची ही तरुणाई नेमकी कशी विचार करते यावर कोणी फारसा विचार केलेला दिसत नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणातून तरुणाईचा दृष्टिकोन समोर आला.
गेल्या काही महिन्यांपासून आपल्याकडे निवडणुकांचे वारे वाहत होते. आज त्याचं फलित तुमच्या हाती एव्हाना पडलं असेल. यावेळच्या निवडणुकांचं भवितव्य तरुणांच्या हातात आहे अशी आरोळी जवळजवळ सर्व स्तरांमधून उठत होती. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी यंदा कॉलेजेसचे उंबरे झिजवले, खेळाची मदाने पालथी घातली, कट्ट्यांवर हजेरी लावली. ऑफिसेस, सोशल नेट्वìकग साइट्स, कॅफेज, मॉल्स जिथे जिथे तरुणांचा वावर दिसेल तिथे तिथे हजेरी लावायला सुरुवात केली होती. त्यांना वेगवेगळे वायदे, वचने देण्यात आली. पण नक्की आजच्या तरुणाला काय हवंय, त्याचे विचार, त्याचा जीवनाविषयीदृष्टिकोन कसा आहे. तो आपल्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतो याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न फारच कमी वेळा करण्यात आला. त्यामुळे कदाचित तरुणाईदेखील काहीशी या निवडणुकांमध्ये अलिप्त राहिलेली दिसून आली. देशातील पुढील पाच वर्षांचे भवितव्य आजच्या या निकालांवर अवलंबून असेल. अशावेळी तरी पुन्हा एकदा या तरुणाईला नक्की काय हवंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यातून तरुणाईचा राजकीय कल तपासण्याचा उद्देश नाही. पण तरुणाईचा विचार करण्याचा कल, त्यांची भूमिका, त्यांचा प्राधान्यक्रम यातून नक्की समोर येऊ शकतो. कारण निर्णय, योजना जरी राज्यकर्त्यांनी घेतले तरी ते पाळायचे की धुडकावून लावायचे याचा निर्णय यांच्याच हाती असणार आहे.
‘आजची तरुण पिढी उनाड आहे. मोबाईलपासून ते लॅपटॉपपर्यंत सर्वकाही हातात मिळाल्याने त्यांना कशाचीही कदर नाही. ते उद्धट आहेत, एकलकोंडे आहेत. त्यांच्या आयुष्यातील ध्येयाबद्दल त्यांच्याकडे सुनिश्चिती नाही.’ असे असंख्य आरोप आजच्या पिढीवर होत असतात. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात हे सगळे आरोप धुवून निघतील अशी माहिती समोर आली आहे.
‘एम टीव्ही’च्या युथ मार्केटिंग फोरमतर्फे दरवर्षी जगभरातील तरुणाईचा कल तपासण्यासाठी असा सव्‍‌र्हे घेतला जातो. यंदाच्या या सर्वेक्षणात भारतातील ३४ महत्त्वाच्या शहरातील १३ ते २५ वयोगटांतील विविध स्तरातील ११ हजार मुलांचा समावेश करण्यात आला होता. या मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत काही ठरावीक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांच्या उत्तरांवरून आजच्या तरुणांच्या वर्तणुकीचे अंदाज बांधण्यात आले.
जागतिक पातळीवरही असं सर्वेक्षण करण्यात आलं. त्याचे रिझल्ट नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. या सर्वेक्षणातून समोर आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजचा भारतीय तरुण आणि जागतिक तरुण यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. उलटपक्षी जगाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांच्या त्यांच्या करीअरविषयक, कुटुंब-मित्रांविषयक संकल्पना सारख्याच आहेत. कदाचित तंत्रज्ञानाच्या विकासाने आज जग जवळ आले आहे आणि हा त्याचाच परिणाम असावा. आजचा तरुण विचार करतो. त्याला खूप प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं शोधण्याचा विचार तो सतत करत असतो. आणि हे प्रश्न विविध विषयाचे असतात. राजकीय नेते शशी थरूर यांचे म्हणणे होते की, ‘आजची तरुण पिढी आम्हाला प्रश्न विचारते. आम्ही काय काम करतोय हे जाणून घ्यायची इच्छा त्यांना असते. याआधी आपले नेते काय काम करताहेत हे जाणून घ्यायची इच्छा खूप कमी लोकांमध्ये होती. पण आज तरुण बोलतोय त्याची मत मांडतोय. ‘माहितीचा अधिकार’, ‘अण्णांचे लोकपालसंबंधीचे आंदोलन किंवा ‘दिल्ली रेपकेस’च्या वेळी झालेले आंदोलन असोत, तरुणांच्या जागरूकतेचे हे फलित आहे.’ या सर्वेक्षणानुसार भारतातील ८० % तरुणांना आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे जाणून घ्यायची इच्छा आहे हे लक्षात आले. जगात हेच प्रमाण ८८ टक्के आहे.
८८ टक्के भारतीय तरुणाचा ‘समाजात बदल घडवून आणायचे असतील तर ते मीच घडवू शकतो’, या गोष्टीवर ठाम विश्वास आहे. तो कोणत्याही सुपरहिरो किंवा चमत्काराची वाट पाहत नाही बसत, तर मीच माझं भविष्य आणि समाज बदलू शकतो हा विश्वास त्याच्यात आहे. जागतिक पातळीवरील अभ्यासात असं म्हणणाऱ्या तरुणाईची संख्या किंचित कमी आहे.
मित्रांची जागा कुटुंबातच  
आजचा तरुण आपल्या कुटुंबापासून, नातेवाइकांपासून तुटलाय अशी एक ओरड एकू येते. पण भारतीय तरुणाला आजही कुटुंब महत्त्वाचं वाटतं. ६१ टक्के भारतीय तरुणांनी कुटुंबाला फर्स्ट प्रायॉरिटी दिली. जागतिक पातळीवर हेच प्रमाण ५५ टक्के आहे. फक्त फरक इतकाच आहे की, आज त्यांची कुटुंबाची व्याख्या बदलली आहे. कुटुंबातील आईवडिलांनंतरची नातेवाईकांची जागा आता त्यांच्या मित्रांनी घेतली आहे. ८२ टक्के मुलांना मित्रांबरोबरची स्पर्धा ‘पिअरप्रेशर’ न वाटता ‘पिअर पॉवर’ वाटते.
लग्नापेक्षा करिअर महत्त्वाचं
लग्नापेक्षा ५० टक्के तरुणांना करिअर महत्त्वाचे वाटते. त्यामुळे त्यांना रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत आहे. पण याचा अर्थ ते पार्टनरबाबत गंभीर नाहीत असं नाही. ५१ टक्के तरुण आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्यास प्राधान्य देतात. प्रेमातली फसवणूक आजच्या तरुणाला मान्य नाही. आज जिथे डॉक्टर, इंजिनीअरकडे आदर्श करियर म्हणून पाहिलं जातं तिथे ४६ टक्के तरुणांना एखादी नोकरी करत बसण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात सतत धडपड करण्यात प्राधान्य देतात. तसेच मोठमोठे सॅलरी पॅकेज मिळवण्यापेक्षा ६८ टक्के मुलांना आपल्या कामातून सन्मान हवा आहे. त्यामुळे आपण जे काम करतोय त्यामुळे लोकांनी आपल्याकडे मानाने पहावे अशी त्यांची इच्छा आहे. ६९ टक्के तरुणांचा ठाम विश्वास आहे की पसे त्यांच्यासाठी आनंद विकत आणून नाही देऊ शकत, तर ८० टक्के मुलांनी पशापेक्षा कला, ७९ टक्के मुलांना पशापेक्षा शिक्षण आणि ७६ टक्के मुलांना पशापेक्षा यश जास्त महत्त्वाचे आहे.    
अर्थव्यवस्था स्थिर हवी
आजच्या तरुणाईला आपलं जग सुंदर आणि शांत असावं. गरिबी, भ्रष्टाचार त्यांना नकोय. प्रजासत्ताक राज्यावर त्यांची निष्ठा आहे. ‘आपण समोरच्याला समजून न घेता त्याचा दुस्वास कसा करू शकतो?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. त्यांना एक स्थिर आणि सुरक्षित अर्थव्यवस्था हवी आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराबाबत ते तितकेच जागरूक आहेत. नसíगक संपत्ती कधीतरी संपून जाईल त्यामुळे तिचा जपून वापर करण्यास ते प्राधान्य देतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा तरुण जबाबदार आहे. तो आपल्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहतो आहे. त्याच वेळी पशापेक्षा आनंद महत्त्वाचा असल्यामुळे तो आपल्या आवडीनुसार करियर निवडण्यास प्राधान्य देतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onविवाViva
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly youth need from new government
First published on: 16-05-2014 at 01:13 IST