29 September 2020

News Flash

पाच वर्षांत १०९ कोटींच्या बनावट नोटा निदर्शनास

शासनाचे चोख लक्ष असतानासुद्धा संपूर्ण देशातच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. बनावट नोटा चलनात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

| July 26, 2014 01:47 am

शासनाचे चोख लक्ष असतानासुद्धा संपूर्ण देशातच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. बनावट नोटा चलनात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जेथे कुठे व्यवहार होतो, तेथे प्रत्येक नोट तपासून बघितली जाते. असे असतानाही गेल्या पाच वर्षांत १०९ कोटी १२ लाख रुपये मूल्य असलेल्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यामध्ये ५०० रुपये मूल्य असलेल्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याबरोबरच गेल्या एक वर्षांत भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे २ अब्ज, १५ कोटी ३७ लाख २२ हजार ९४४ मूल्य असलेल्या फाटलेल्या व खराब झालेल्या नोटा बदलून देण्यात आल्या आहेत.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत २४ कोटी ८४ लाख ०२ हजार ६६५ रुपये मूल्य असलेल्या ४ लाख ८८ हजार २७३ बनावट नोटा चलनात असल्याचे आढळून आल्यात. यामध्ये ५ रुपये मूल्य असलेली फक्त एकच नोट आढळून आली. तर १० रुपये मूल्य असलेल्या १५७, २० रुपये मूल्य असलेल्या ८७, ५० रुपये मूल्य असलेल्या ६ हजार ८५१, १०० रुपये मूल्य असलेल्या १ लाख १८ हजार ८७३, ५०० रुपये मूल्य असलेल्या २ लाख ५२ हजार २६९ आणि १००० रुपये मूल्य असलेल्या १ लाख १० हजार ०३५ नोटांचा समावेश आहे. यातील १९ हजार ८२७ नोटा रिझव्‍‌र्ह बँकेच्या काऊंटरवर तर ४ लाख ६८ हजार ४४६ नोटा अन्य बँकेमध्ये तपासणीदरम्यान आढळून आल्यात.
१ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१० पर्यंत एकूण ४ लाख ०१ हजार ४७१ बनावट नोटा आढळून आल्यात. त्यामध्ये १० रुपये मूल्य असलेल्या १५९, २० रुपये मूल्य असलेल्या १७५, ५० रुपये मूल्य असलेल्या १३ हजार ५७९, १०० रुपये मूल्य असलेल्या १ लाख ४२ हजार ७८१, ५०० रुपये मूल्य असलेल्या २ लाख ०९ हजार ०९४, आणि १००० मूल्य असलेल्या ३५ हजार ६८८ नोटांचा समावेश आहे. या नोटांचे मूल्य १५ कोटी ५१ लाख ९७ हजार १४० रुपये एवढे आहे. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ या कालावधीत एकूण ४ लाख ३५ हजार ६०७ बनावट नोटा आढळून आल्यात. या नोटांचे मूल्य १९ कोटी ०१ लाख १० हजार ४१० एवढे आहे. यामथ्ये १० रुपये मूल्य असलेल्या १३९, २० रुपये मूल्य असलेल्या १२६, ५० रुपये मूल्य असलेल्या १० हजार ९६२, १०० रुपये मूल्य असलेल्या १ लाख २४ हजार २१९, ५०० रुपये मूल्य असलेल्या २ लाख ४६ हजार ०४९ आणि १००० रुपये मूल्य असलेल्या ५४ हजार ११२ नोटांचा समावेश आहे.
१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत एकूण ५ लाख २१ हजार १५५ बनावट नोटा आढळून आल्या. १० रुपये किंमतीच्या १२६, २० रुपये मूल्य असलेल्या २१६, ५० रुपये मूल्य असलेल्या १२ हजार ४५७, १०० रुपये मूल्य असलेल्या १ लाख २३ हजार ३९८, ५०० रुपये मूल्य असलेल्या ३ लाख ०१ हजार ६७८ आणि १००० मूल्य असलेल्या ८३ हजार २८० नोटांचा समावेश आहे. या नोटांचे मूल्य २४ कोटी ७० लाख ८७ हजार २३० रुपये एवढे आहेत. तर गेल्या पाच वर्षांत आढळून आलेल्या बनावट नोटांचे एकूण मूल्य १०९ कोटी १२ लाख ०७ हजार ०३५ रुपये एवढे आहेत. या नोटांचे मूल्य २४ कोटी ७० लाख ८७ हजार २३० रुपये एवढे आहेत.
माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात गेल्या पाच वषार्ंत किती बनावट नोटा आढळून आल्या व तसेच गेल्या एक वर्षांत किती फाटल्या नोटा बदलवून दिल्यात, या दोन प्रश्नांची माहिती मागितली होती. ही माहिती मुंबई येथील भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेतील केंद्रीय जनसंपर्क अधिकारी बी.पी. विजयेंद्र यांनी त्यांना उपलब्ध करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:47 am

Web Title: 109 crore fake currency notes found in last five years
टॅग Fake Currency,Fraud
Next Stories
1 आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर शेतकरी नेते नाराज
2 ‘विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचवा’
3 ‘रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात आणण्यासाठी प्रयत्न करावे’
Just Now!
X