केम्ब्रिज विद्यापीठातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या केम्ब्रिज आंतरराष्ट्रीय परीक्षेत यंदा मुंबईकर विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून यात तब्बल १६ मुंबईकर मुलांनी अव्वल ठरण्याचा बहुमान पटकाविला आहे. विशेष म्हणजे देशभरातील ३० विद्यार्थ्यांनी यात चमकदार कामगिरी केली असून यात निम्म्याहून अधिक विद्यार्थी मुंबईचे असल्याने मुंबईचा उंचावलेला शैक्षणिक आलेख स्पष्ट झाला आहे. या परीक्षेत केंब्रिज आयजीसीएसई, केंब्रिज इंटरनॅशनल ‘एएस लेव्हल’, केंब्रिज इंटरनॅशनल ‘ए लेव्हल’ या परीक्षांचा समावेश होता.
केम्ब्रिज विद्यापीठातर्फे नोव्हेंबर २०१३ आणि मे २०१४ ची केम्ब्रिज आंतरराष्ट्रीय परीक्षा घेण्यात आली होती. यात यशस्वी ठरलेल्या मुंबईकर व अन्य भारतीय विद्यार्थ्यांना आऊटस्टॅन्डींग केम्ब्रिज लर्नर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आतंरराष्ट्रीय पातळीवरील या स्पध्रेत अव्वल ठरलेल्या ३० पैकी १५ विद्यार्थ्यांनी हे यश गणिताच्या परीक्षांमध्ये लक्षणीय कामगिरी केल्यामुळे संपादन केले आहे. तर उर्वारित विद्यार्थ्यांनी इंग्रजी, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, अर्थशास्त्र अशा विविध परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळविले असून पुरस्कार विजेत्यांच्या यादीत विविध विषयांमध्ये भारतात सर्वाधिक एकूण गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मे २०१४मध्ये पार पडलेल्या केम्ब्रिज आंतरराष्ट्रीय परिक्षांमध्ये देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता यावे यासाठी विविध सुविधांमध्ये १० टक्के वाढ करून देण्यात आल्याचे भारतातील माध्यमिक शाळा विकास व्यवस्थापक, विनायक सुधाकर यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर
यशस्वी झालेले मुंबईतील विद्यार्थी
* नेहा साबू, बिल्लाबाँग हाय इंटरनॅशनल शाळा, जुहू
* हर्ष दवे, उत्पल संघवी शाळा
* पार्थ दोशी, रुस्तमजी केम्ब्रिज इंटरनॅशनल शाळा
* ध्वनी झवेरी, रुस्तमजी केम्ब्रिज इंटरनॅशनल शाळा
* दृष्टी मेहता, रुस्तमजी केम्ब्रिज इंटरनॅशनल शाळा
* मितांश शाह, धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा
* नविया कोठारी, आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी
* रवि जालान, धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा
* रिहा गोयंका, धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा
* ऋषभ मणी, बिल्लाबाँग हाय इंटरनॅशनल शाळा, ठाणे<br />* तारा रंगवानी, बिल्लाबाँग हाय इंटरनॅशनल शाळा, सांताक्रूझ
* उदयन अडुकिया, आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी
* अनंत कंडोई, जमनाबाई नरसी शाळा
* उत्कर्ष इराणी, बॉम्बे इंटरनॅशनल शाळा
* वैदिक शाह, रुस्तमजी केम्ब्रिज इंटरनॅशनल शाळा
*  अमृता दाते,  पोद्दार इंटरनॅशनल शाळा